या दोन कार्यकर्त्यांनी डकवर्थ लुईसचं गणित आखून भारताचा पेपर कठीण केलाय…

भारत विरुद्ध बांगलादेश मॅच आत्ता सुरू आहे. भारतानं १८४ रन्स करत १८५ चं मोठं आव्हान बांगलादेश समोर ठेवलं.

१८५ रन्सचा पाठलाग करताना लिटन दासनं बांगलादेशला खतरनाक स्टार्ट करुन दिला. अर्षदिपला ३ चव्वे, भुवीला एक सिक्स दोन फोर मारणाऱ्या लिटनचा कॅच किपर कार्तिककडून सुटलाही. पहिल्या ३ ओव्हर्समध्येच बांगलादेशचा स्कोअर ३० रन्स होता. त्यानं २१ बॉलमध्ये मारलेल्या टॉप क्लास फिफ्टीमुळं बांगलादेशला फ्लायिंग स्टार्ट मिळाला. पॉवरप्लेमध्ये भारताचा स्कोअर होता १ आऊट ३७ होता, तिथं बांगलादेशनं विकेट न गमावता ६० रन्स मारले होते. यात नजमुल शांतोचा वाटा फक्त ४ रन्सचा होता.

७ ओव्हर्स पूर्ण झाल्या आणि पावसाला सुरुवात झाली, तेव्हा बांगलादेशचा स्कोअर होता नॉटआऊट ६६ रन्स.

स्क्रीनवर लगेचच आकडे दिसले आणि डकवर्थ लुईस मेथडनुसार पार स्कोअर ४९ रन्स दाखवला.

हा पार स्कोअर ठरवण्यासाठी भारताचा स्कोअर गुणिले बांगलादेशकडे असलेली साधनं भागिले भारताकडे असलेली साधनं असा फॉर्म्युला असतोय. जर बांगलादेशची एक विकेट पडली असती तर पार स्कोअर ५३ असता आणि ३ विकेट्स पडल्या असत्या पार स्कोअर ६५. थोडक्यात ही साधनं म्हणजे काय तर विकेट्स आणि ओव्हर्स.

हे गणित कशामुळं लागलं तर डकवर्थ लुईस नियम. हा नियम कसा अस्तित्वात आला याचाही एक किस्सा आहे.

१९९२चा क्रिकेट वर्ल्डकप.

इंग्लंड-दक्षिण आफ्रिकामध्ये सेमी फायनल सुरु होती. दक्षिण आफ्रिकेला जिंकायला १३ बॉल मध्ये २२ रन हव्या होत्या. एवढ्यात वरूण देवाची कृपा झाली. धो धो पाऊस सुरु झाला. त्याने मॅचची १२ मिनिटे घेतली. तेव्हाच्या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला टार्गेट बदलून देण्यात आले. नवे टार्गेट होते १ बॉलमध्ये २१ रन. दक्षिण आफ्रिका हरली. त्यांच्यावर अन्याय झाला हे सगळ्या जगान बघितल होतं.

इंग्लंड मध्ये रेडियोवर क्रिस्तोफर मार्टिन जेकीन्स कोमेंट्री करताना म्हणत होता,

“कुठे तरी कोणी तरी बसलं आहे जे यापेक्षा काही तरी चांगली आयडिया घेऊन येतील. “

एक संख्याकशास्त्रज्ञ ही कोमेंट्री ऐकत होता. त्याने विचार केला की आपणच आपलं गणिती डोकं लढवून का हा नियम शोधून काढू नये? त्याने आपल्या मित्राला सोबत घेऊन व्यवस्थित गणिती आकडेमोडीचं संशोधन करून एक नियम बनवला. त्याला त्या दोन्ही गणिततज्ञांची नावे देण्यात आली,

डकवर्थ आणि लुईस.

या दोघांनी बनवलेल्या नियमाच्या आधारेच मग पाऊसाचा व्यत्यय आलेल्या मॅचचे रिझल्ट बदलू लागले. आधी हा फॉर्म्युला सगळ्यांना ओपन होता. यात बॅटिंग करणाऱ्या टीमकडे किती ओव्हर्स आणि किती विकेट्स शिल्लक आहेत, ही गोष्ट महत्त्वाची ठरते.

भारतानं आपल्या इनिंगमध्ये पूर्ण २० ओव्हर्स खेळून काढल्यात, तर बांग्लादेशनं फक्त ७. साहजिकच बांग्लादेशकडे १३ ओव्हर्स आहेत आणि हातात १० विकेट्स. याच आधारे कॉम्प्युटर प्रोग्रॅममध्ये ही आकडेवारी टाकून डकवर्थ लुईसचं गणित आखता येतं. जितक्या जास्त ओव्हर्स आणि विकेट्स हातात असतील तितकं आव्हान कमी होत जातं, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमनं आपल्याकडच्या साधनाचा वापर केलेला नसतो.

 एका ठराविक वेळेनंतर जर पाऊस थांबला नाही, तर ओव्हर्स कमी व्हायला सुरुवात होते आणि अर्थातच पार स्कोअरच्या पुढे असेल तर बॅटिंग टीमला याचा फायदा होतो.

डकवर्थ लुईस हा नियम सर्रास वापरण्यात येत असला, तरी तो पूर्णपणे योग्य नाही असा दावा करण्यात येतो. कारण क्रीझवर असणारे बॅट्समन, त्यांची क्षमता आणि वातावरणात होणारे बदल या सगळ्या गोष्टींमुळे मॅचवर फरक पडतो आणि हा नियम सगळीकडे सारखाच लागू होत नाही अशी तक्रार करण्यात येते.

पण असं असलं तरी आयसीसी आजही याच नियमावर ठाम आहे, ज्याचा कधी एका टीमला फायदा होतो तर कधी तोटा..

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.