बच्चनच्या सांगण्यावरून राष्ट्रपती भवनाचा नियम बदलण्यात आला होता.

बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ कोणी वर्चस्व केलं असेल तर अमिताभ बच्चन. रेडिओच्या ऑडिशनला गेलेला अमिताभ बच्चन आवाजावरून रिजेक्ट झाला होता मात्र त्यानंतर त्याने आपल्या कामाच्या जोरावर रेडिओ, टीव्ही सगळीकडे आपलं नाव केलं. आपल्याकडे बऱ्याच आधीपासून फॅशन आहे कि सेलिब्रिटी, खेळाडू यांनी राजकारणात जायचं म्हणजे जायचं.

बॉलिवूडच्या या महानायकाने १९६९ मध्ये सात हिंदुस्थानी या सिनेमातून अमिताभने आपल्या फिल्मी करियरची सुरवात केली. गेली पाच दशके बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा अमिताभ बच्चन हा आज घडीला सुद्धा सगळ्यात बिझी स्टार आहे. या काळात अनेक हिट सिनेमे बच्चनने दिले. 

बिग बी हा त्या निवडक लोकांमधला आहे ज्याने राजकारणात सुद्धा आपले हात आजमावले. राजकारणात तो भलेही जास्त काळ टिकला नाही पण या काळात एक मोठी घटना घडली जी बच्चन होता म्हणून शक्य झाली. नाहीतर ती कधीच शक्य झाली नसती. दीर्घकाळापासून चालत आलेला राष्ट्रपती भवनचा एक नियम अमिताभने बदलायला लावला होता.

१९८४ साली इलाहाबादमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या. त्या दरम्यान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चनने आपल्या जन्मभूमी इलाहाबादमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बिग बी अमिताभ बच्चनच्या विरोधात उभे होते उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री हेमवंती नंदन बहुगुणा.

इथं हे सांगणं गरजेचं आहे कि त्यावेळी हेमवंती नंदन बहुगुणा यांना हरवणं मुळीच सोपं नव्हतं. संपूर्ण युपीमध्ये त्यांच्या नावाची चलती होती. शिवाय माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांचीच हवा होती. पण अमिताभ बच्चनची लोकांमधली क्रेझ इतकी प्रचंड होती कि हेमवंती नंदन बहुगुणा या तब्बल पावणे दोन लाख मतांनी पराभूत झाल्या. अमिताभ बच्चनने हा मोठा धक्का दिला होता. 

निवडणूक जिंकल्यानंतर संसद सदस्याच्या रूपाने बिग बी अमिताभ बच्चन जेवण करण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेले. राष्ट्रपती भवनाच्या टेबलवर जेवणाची थाळी ठेवलेली होती. त्या थाळीवर अमिताभ बच्चनची नजर गेली.  त्या थाळीवर देशाचं राष्ट्रीय प्रतीक असलेलं अशोक स्तंभाचं चिन्ह होतं.

थाळीवर ते अशोक स्तंभाचं चित्र अमिताभ बच्चनला आवडलं नाही. उलट बच्चनला हा देशाचा आणि अशोक स्तंभाचा अपमान वाटला. देशाविषयीचं प्रेम अमिताभ बच्चनने दाखवून दिलं. यावर काहीतरी उपाय करावा म्हणून बच्चनने एक महत्वाचं पाऊल उचललं. अमिताभने हि गोष्ट थेट संसद भवनात मांडली कि राष्ट्रीय प्रतीकं असलेली चिन्हे जेवणाच्या थाळीवरून हटवण्यात यावीत. 

बच्चनने हि घटना संसद भवनात मांडली म्हणल्यावर त्यावर चर्चा तर होणारचं. बऱ्याच संसद भवनातील सदस्यांनी अमिताभच्या निर्णयाला सहमती दर्शवली. बहुमताने अमिताभचा हा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला आणि तो पुढे अंमलात देखील आणण्यात आला.

काही दिवसानंतर एक नवीन कायदा लागू करण्यात आला. या कायद्या अंतर्गत राष्ट्रपती भवनातील सगळ्याच थाळ्यांवरून ते अशोक स्तंभाचं चित्र काढून टाकण्यात आलं.

या आदेशाचं पालन सुद्धा तात्काळ झालं. हि गोष्ट फक्त आणि फक्त अमिताभ बच्चनचं करू शकतो अशा चर्चा झाल्या. कारण अमिताभ बच्चनचा वावरच तितका प्रभावी होता.

राजकारणात गेलेला बच्चन नंतर मात्र राजकारणांच्या राड्यात रमला नाही. लवकरच त्याने राजकारणाच्या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजकारणात येणं हि एक आयुष्यातली मोठी घोडचूक झाली हे बच्चनला समजलं आणि तो राजकारणापासून विलग झाला.

राजकारणातून बाहेर पडून अमिताभ बच्चन सिनेमात चांगलाच रमला. पुढेही आपला दबदबा किती आहे हे त्याने अभिनयातून दाखवून दिलं. आज घडीला भले भले हिरो घरी बसले आहेत कामाविना मात्र अमिताभ बच्चन हा आज सुद्धा सगळ्यात बिझी नट आहे हे त्याचं आजवरचं यश आणि संघर्ष सांगून जातो. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.