पत्नीने घटस्फोट दिला म्हणून किडनी परत मागणारा डॉक्टर….

जगभरात अनेक खतरनाक किस्से घडत असतात. काही खरंच भयानक असतात तर काही किस्से ऐकून , वाचून हसू फुटतं. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनेपैकी आजची घटना जी जगभरात गाजली होती. या जोडप्याने सुरवातीला मस्त थाटात लग्न केलं खरं पण मध्ये वाद उद्भवला आणि एक तिसरीच भानगड सुरू झाली तर जाणून घेऊया नक्की काय किस्सा होता.

1995 मध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमधून पदवी घेतलेल्या रोन्कोन्कोमा येथील 49 वर्षीय डॉक्टर रिचर्ड बटिस्टा यांनी 31 ऑगस्ट 1995 रोजी डॉनेल बटिस्टा सोबत लग्न केलं. या जोडप्याला पुढे 3 मुलं झाली. लग्नाआधी रिचर्ड बटिस्टा यांना असं कळलं होतं की डॉनेल बटिस्टा यांना किडनीचा त्रास आहे तेव्हा त्यांचं लग्न लांबणीवर पडलं होतं. आता यावर उपाय काय म्हणून शेवटी रिचर्ड बटिस्टा यांच्या डोक्यात एक आयडिया आली.

आपल्या होणाऱ्या बायकोला रिचर्ड बटिस्टा यांनी आपली स्वतःची किडनी देऊ केली आणि किडनी ट्रान्सप्लँट पार पडली. बायकोचा जीव वाचवणे हे तेव्हा महत्वाच काम रिचर्ड बटिस्टा यांना वाटलं होतं आणि मोठ्या खुशीने त्यांनी आपली एक किडनी देऊ केली होती. लग्न लांबणीवर न पाडण्याचं रिस्क पाहता किडनी देणं रिचर्ड यांना जास्त सोयीस्कर वाटलं.

पण नंतर या दोघांमध्ये गृहकलह वाढला आणि मॅसापेक्वा येथील 44 वर्षीय डॉनेल बतिस्ता यांनी जुलै 2005 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या घटनेमुळे रिचर्ड बटिस्टा चिडले आणि त्यांनी केस दाखल केली की मला माझी किडनी हवी आहे. किडनी देणं जमत नसेल तर दीड लाख डॉलर मला भरपाई म्हणून मिळावे. हा अजब प्रकार ऐकून न्यायालयसुद्धा कोमात गेलं की नक्की आता यावर बोलायचं काय ?

शेवटी न्यायालयाने निर्णय दिला की जर किडनी परत हवी असेल तर डॉनेलला डायलिसिसवर जावं लागेल यात तिचा जीव जाण्याचा धोका जास्त आहे, अवयवदान हे एक कायदेशीर काम आहे त्यात तुमची भांडण हे एक वेगळं प्रकरण आहे. एखादा अवयव तुम्ही दान केल्यावर त्याबदल्यात तुम्हाला काहीही मिळत नाही त्यामुळे किडनी किंवा पैसे मिळेल याची काहीही आशा बाळगू नका.

असा हा वाद जगभरात गाजला होता की घटस्फोट मागे घे किंवा मला माझी किडनी परत दे. न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य करावा लागल्याने रिचर्ड यांना दुसरा पर्यायच नव्हता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.