ईदी अमिनच्या हुकूमशाहीमुळे भारतीय लोक युगांडातून नाहीसे झाले…

जगात बहुतांशी ठिकाणी भारतीय लोकं विखुरलेले आहेत. अनेक देशात भारतीय रहिवासीसुद्धा दिसून येतात. अशाच एक देश होता युगांडा. युगांडात मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांची संख्या होती. पण एका सनकी हुकूमशहा सैनिकामुळे तिथली भारतीय लोकांची संख्या कमी कमी होत गेली. असंही म्हटलं जात कि त्या क्रूर हुकूमशहामुळे भारतीयांना युगांडातून हाकलून लावण्यात आलं होतं. जाणून घेऊया कोण होता हा हुकूमशहा.

युगांडात या हुकूमशहाबद्दल बऱ्याच गोष्टी प्रचलित आहे जस कि तो माणसाचं रक्त प्यायचा, विचित्र पद्धतीने बदला घ्यायचा. असा हा क्रूर हुकूमशहा होता ईदी अमीन. युगांडामध्ये ईदी अमीन सत्तेवर येण्या अगोदर तिथे आशियायी लोकांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य होतं. युगांडाच्या सिनेमागृहांमध्ये भारतीय सिनेमे दाखवले जायचे. 

७० च्या दशकात युगांडाची राजधानी कंपालामध्ये राहणारे जास्तीत जास्त लोकं हे भारतीयचं होते. तिथल्या रस्त्यांना नावं सुद्धा भारतीय मूळ लोकांचेच देण्यात आलेले होते. पण ईदी अमीन सत्तेवर आला आणि भारतीय लोकांचं वास्तव्य धोक्यात आलं. ईदी अमीनच्या सत्तेत भारतीयांवर जुलूम होऊ लागले.

आता हा इतके राडे करणारा ईदी अमीन नक्की कोण होता ? ईदी अमीन दादा हा १९७१ ते १९७९ पर्यंत युगांडाच्या सैन्याचा लीडर होता. अमीन १९४६ मध्ये  ब्रिटिश औपनिवेशिक रेजिमेंट ‘किंग्स अफ़्रीका राइफ़ल्स’  मध्ये भरती झाला होता. यानंतर ईदीने युगांडाच्या सैन्यात मेजर जनरल आणि कमांडर पदं मिळवली. देशाच्या प्रमुख पदावर असताना अमिनने स्वतःला फिल्ड मार्शल पद देऊन टाकलं.

२५ जानेवारी १९७१ ला युगांडामध्ये सत्तापालट झाला मिल्टन ऑबेटोला सत्तेवरून काढत ईदी अमीन राष्ट्रपती झाला. अमिनच्या सरकारमध्ये मानवी अधिकारांचा दुरुपयोग, राजनैतिक खेळ्या, जातीवाद, हत्या, पक्षपात, भ्रष्टाचार अशा अनेक घटना घडल्या. जागतिक दर्शक आणि मानवी अधिकाऱ्यांच्या मते ईदी अमिनच्या काळात जवळपास १ लाख ते ५ लाख हत्या घडल्या होत्या. 

ईदी अमीन १९७५-७६ मध्ये आफ्रिकी एकता संघटनेचा अध्यक्ष बनला. हि संघटना बनवण्यामागे उद्देश हा होता कि आफ्रिकेच्या विविध राज्यांमध्ये एकतेचा संदेश जावा. १९७७-७९ च्या काळात संयुक्त राष्ट्राने मानवी अधिकाराच्या यादीत युगांडाला सुद्धा सामील केलं होतं. याच काळात ईदी अमिनने स्वतःला महामहिम आजीवन राष्ट्रपति, फ़ील्ड मार्शल, वीसी, डीएसओ, एमसी अशा पदव्या घोषित करून टाकल्या.

आंतरराष्ट्रीय सर्व्हेच्या मते युगांडामध्ये ईदी अमिनच्या काळात बऱ्याच लोकांचे प्रेत सडलेल्या अवस्थेत शहरांमध्ये सापडले होते. याच काळात युगांडातल्या अनेक स्मशानांचा शोध लागला. खरंतर ईदी अमीन हा क्रूर होता त्याच्या या कारस्थानांविरुद्ध कोणीही बोलायला तयार नव्हतं. अमीन असा शासक होता ज्याने देशाला पुढे नेण्याऐवजी स्वतःच्या देशातल्या नागरिकांना संपवण्यातच धन्यता मानली. 

ईदी अमिनच्या शासनकाळात आरोग्यमंत्री असलेले हेनरी केयंबा यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं त्याचं नाव होतं अ स्टेट ऑफ ब्लड ; द इनसाईड स्टोरी ऑफ ईदी अमीन. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय कि,

एकदा अमीन शहरातल्या एका शवगृहात गेला, जिथे त्याच्या दुश्मनांची प्रेतं ठेवण्यात आलेली होती. यानंतर ईदी अमीनने त्याच्या दुश्मनांच्या प्रेताच रक्त प्यायला सुरवात केली. युगांडातल्या काकवा जनजातींमध्ये मानवी रक्त पिण्याची प्रथा आहे. अमीनसुद्धा काकवा समाजातून होता.

१९७७ साली अमिनची क्रूर पध्दतीपाहून त्याच्याविरुद्ध बंड सुरु झालं होतं. युगांडातील लोकांमध्ये असंतोष पसरू लागला होता. १९७८ मध्ये टांझानियाच्या कंगेरा या प्रदेशाला जिंकण्याच्या नादात युगांडा टांझानिया युद्ध हे ईदी अमिनच्या सत्तेचं नष्ट होण्याचं प्रमुख कारण झालं.

यानंतर अमीन लिबिया आणि सौदी अरेबियामध्ये जाऊन निर्वासितासारखा राहू लागला. १६ ऑगस्ट २००३ रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये ईदी अमिनचा मृत्यू झाला. या घटनेने युगांडाने मोठा सुटकेचा निश्वास टाकला होता. भारतीयांना अमिनच्या जुलमाने युगांडात वास्तव्य करू दिल नाही पण त्याच्या मरण्यानंतरही तुरळक लोक म्हणा किंवा अगदीच बोटावर मोजण्याइतके लोक युगांडात दिसतात. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.