हॉटमेलच्या शोधामुळे ‘ सिलिकॉन व्हॅलीचा बादशहा ‘ म्हणून सबिर भाटिया ओळखला जाऊ लागला होता..

श्रीमंतीच्या मार्गावर चालणारे मोजकेच लोक असतात. जगात कोणत्या गोष्टीची कमी आहे हे त्यांना अचूक कळतं आणि त्यावर काम करून ते नवीन आणि अचाट काहीतरी निर्माण करत असतात. आता सेम तू सेम ह्याच हायवेवर एका भारतीयाने उडी घेतली आणि असा शोध लावला कि थेट जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

सबीर भाटिया.

आता या भिडूने शोध लावला तो इतका जबरदस्त होता कि बिल गेट्सलासुद्धा त्याचा मोह झाला.

बऱ्याच आयटी क्षेत्रात सबीर भाटियाने लावलेला शोध मोठ्या प्रमाणावर मागणी मध्ये होता पण बाजी मारली ती बिल गेट्सने.

आधी हा सबीर भाटिया नेमका कोण आहे हे पाहू. सबीर भाटिया आज घडीला भारतीय आणि अमेरिकन देशातला मोठा बिजनेसमन आहे. पंजाबमधल्या चंदिगढमध्ये सबीर भाटियाचा जन्म झाला. वडील भारतीय सैन्यात होते आणि आई सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ अधिकारी होत्या. बँगलोरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर सबीर भाटियाने उच्चशिक्षणासाठी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला.

सबीर भाटिया ऍप्पल कंपनीत हार्डवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. इतक्या भव्यदिव्य कंपनीत काम करत असताना सबीर भाटियाला एक आयडिया सुचली. ई-मेलला इंटरनेटवर टाकून कुठल्याही ठिकाणाहून आणि कधीही आपल्याला आपले मेल पाहता येऊ शकतील असा शोध त्यांनी लावला आणि त्याला नाव दिले हॉटमेल. दुसऱ्या कुठल्याही वेब ब्राऊजरवरून ग्राहक आपले मेल चेक करू शकत होता. हॉटमेल मुले नवीन सॉफ्टवेअर अपलोड करण्याचा त्रास कमी झाला.

४ जुलै १९९६ साली हॉटमेल सुरु झालं. हॉटमेलच्या शोधात सबीर भाटियाला मदत केली ती जॅक स्मिथ या त्याच्या मित्राने. दोघांनी मिळून हॉटमेल जगासमोर आणलं. ६ महिन्यातच हॉटमेलची ग्राहक संख्या हि १० लाखाच्या वर गेली. २ वर्षात तब्बल १ करोड ग्राहक हॉटमेलने कमावले.

त्याच वेळी इंटरनेट आणि मेल क्षेत्रात बिल गेट्सचा इंटरेस्ट वाढला. एके दिवशी बिल गेट्सच्या ऑफिसमधून सबीर भाटियांना फोन आला. बिल गेट्स जागतिक पातळीवर मायक्रोसॉफ्टचा झेंडा लावण्याच्या तयारीत होते. फोन करून भाटियांना बोलावून घेण्यामागचा उद्देश एवढाच होता कि बिल गेट्स हॉटमेल विकत घेणार होते. कारण हॉटमेलचे १ करोड ग्राहक मायक्रोसॉफ्टकडे वळले जातील.

सुरवातीला सबीर भाटियाला नवल वाटत राहीलं कि बिल गेट्ससारखा माणूस आपल्याला बोलावतो आहे. सबीर भाटियाला माहिती होतं कि हॉटमेलकडे एक कोटी ग्राहक आहे पण हॉटमेल फ्री असल्याने कंपनीचं नुकसान होत होतं. खरंतर हॉटमेल हे सबीर भाटियांसाठी लाकूड जाळून कोळश्याचा धंदा टाकल्यागत झालं होतं कारण यातून कामे कमी आणि तोटा जास्त होत होता.

आता जशी हॉटमेलची ग्राहकांची संख्या वाढत होती तसं नुकसानही जास्तच होत होतं. बिल गेट्सने १६ करोड डॉलरचा प्रस्ताव भाटियांपुढे ठेवला. म्हणजे प्रत्येक ग्राहकावर १६ डॉलर. भाटिया इतक्या कमी सौद्यात आपला शोध विकणार नव्हता. त्यामुळे ते मीटिंगमधून उठून जाऊ लागले तेव्हा त्यांच्या मित्राने जॅक स्मिथने सांगितले कि २० करोड डॉलरमध्ये ठरवत असेल चांगलं होईल.

पण भाटियाला हॉटमेलचं महत्व माहिती होतं त्यांनी बिल गेट्ससमोर ७० करोडचा प्रस्ताव ठेवला.

पण सुवर्णमध्य म्हणून ४० करोड डॉलरमध्ये हॉटमेल मायक्रोसॉफ्टने विकत घेतलं.

सबीर भाटियाने हॉटमेलच्या माध्यमातून सगळ्यात सुलभ आणि जलद मेल सेवा सुरु केली होती. 

सबीर भाटिया आणि बिल गेट्सच्या या कराराने जागतिक पातळीवर बरीच चर्चा झाली. सबीर भाटियाला ४० करोड डॉलर मिळाल्याने त्याला तेव्हा सिलिकॉन व्हॅलीचा बादशहा म्हणून ओळख मिळाली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.