शाळेतल्या पोरींसमोर स्टाईल मारायची म्हणून विवेक ओबेरॉय संजूबाबाला शाळेत घेऊन गेला होता

विवेक ओबेरॉय हा हिरो प्रत्येकाच्या काळजाचा विषय आहे, म्हणजे जर तुम्हीं शूट आउट ॲट लोखंडवाला हा सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला कळेल की माया भाई काय चीज होता.

पोलीस आयेंगा ना बत्ती लगाके तो बोलने का माया भाई आया था..!

आता हा एकच डायलॉग झाला असे अनेक डायलॉग शूटआऊट ऍट लोखंडवाला मध्ये विवेक ओबेरायच्या तोंडून ऐकायची मजाच वेगळी आहे आणि या सिनेमात विवेक ओबेरॉयला फोडणारा एक पोलीस अधिकारी होता तो होता बॉलिवूडचा बाबा अर्थात संजूबाबा. या दोघांमध्ये होणारे शेवटचे फाईट अंगावर काटा आणते. दोघांचीही रांगडी एक्टिंग आणि हा पूर्ण सिनेमा या दोघांनी खाऊन टाकला आहे. या सिनेमात विवेक ओबेराय हिरो आहे पण भूमिका ही गुंडाची आहे आणि संजय दत्त पोलिस ऑफिसर आहे.

पण आजचा किस्सा आहे की संजय दत्ता मुळे विवेक ओबेराय हिरो बनला होता. तर जाणून घेऊ या नेमका किस्सा काय होता. 

विवेक ओबेरॉय त्यावेळी शाळेत होता. तेव्हा तो अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये बोर्डिंग शाळा शिकत होता.एके दिवशी जयपुर मध्ये विवेक ओबेराय चे वडील सुरेश ओबेरॉय हे एका सिनेमाच्या शूटिंगसाठी आले होते. विवेक ओबेरायला याबद्दल काहीही माहिती नव्हतं.

विवेक ओबेराय ला सरप्राईज देण्यासाठी त्याचे वडील सुरेश ओबेरॉय अचानक त्याच्या शाळेत पोहोचले. आपल्या वडिलांना समोर बघून विवेक ओबेराय सोबतच शाळा सुद्धा हैराण झाली. हा तर एकच धक्का झाला होता अजून पिक्चर बाकी होता.

सगळी शाळा तर हैराण तेव्हा झाली जेव्हा लांब केस वाढवलेला संजय दत्त कार मधून बाहेर आला. खरंतर सुरेश ओबेरॉय आणि संजय दत्त दोघे मिळून एका शुटसाठी आले होते. जयपुर मध्ये आले असतानाच सुरेश वगैरे यांनी मुलाला सरप्राईज देण्यासाठी संजय दत्त ला घेऊन शाळेत धडक मारली.

आता संजय दत्तला बघून सगळेच वेडे झाले पण विवेक ओबेराय शुद्धीवर होता. त्याने संजूबाबाला रिक्वेस्ट केली की दहा मिनिटांसाठी त्याने रस्त्याच्या पलिकडे असलेल्या मेयो गर्ल्स कॉलेज पाहण्यासाठी त्याच्यासोबत यावे. जेव्हा विवेक ओबेरॉय संजय दत्त ला घेऊन गर्ल्स कॉलेज च्या गेट वर आला तेव्हा वॉचमनचा तोंड बघण्यासारखं होतं. तो सुद्धा गांगरून गेला होता.

संजय दत्तला समोर बघून गर्ल्स कॉलेजच्या मुली अक्षरशा वेड्या झाल्या. त्यादिवशी विवेक ओबेराय एखाद्या राजा सारखा भासत होता. संजय दत्त सोबत आणल्यामुळे तो तिथे मुलींसाठी स्टार झाला होता. संजय दत्त बिग स्टार आणि विवेक ओबेराय मिनी स्टार. हा प्रकार झाल्यानंतर विवेक ओबेरॉय शाळा बुडवून संजय दत्तचे सिनेमे पाहायला जायचा.

पुढे जाऊन संजय दत्त आणि विवेक ओबेरॉय यांनी आपली जुगलबंदी शूट आउट ॲट लोखंडवाला या सिनेमात दाखवली आणि प्रेक्षकांना ती जबरदस्त भावली. असा हा किस्सा ज्यात संजूबाबा मुळे विवेक ओबेराय शाळेतल्या मुलींचा समोर हिरो बनला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.