त्या एका घटनेमुळे ‘आतंक ही आतंक’ च्या सेटवर अमीर खानला घाम फुटला होता…

आज ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये एका ‘वेगळ्याच’ नावाने देखील फेमस झाला होता. अलीकडे इमरान हाश्मी रुपेरी पडद्यावर आल्यानंतर भारतीय प्रेक्षकांना किसिंग शॉटचे कौतुक राहिले नाही आणि इमरान हाश्मी हा ‘किसिंग बॉय’ म्हणून प्रेक्षकांच्या लक्षात राहिला!

परंतु हीच ‘उपाधी’ एकेकाळी आमिर खान ला देखील मिळाली होती. कारण त्या काळात आमिर खानच्या सिनेमात चुंबन दृश्य हमखास असायचे! परंतु एका किसिंग शॉटच्या वेळेला आमिर खानला अक्षरशः घाम फुटला होता! काय होता हा किस्सा?

तत्पूर्वी आमिर खान आणि किसिंग शॉट यांचे कसे जवळचे जवळचे नाते होते ते पहा. आमिर खान यांचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश १९८४ साली आलेल्या ‘होली’ या केतन मेहता यांच्या चित्रपटातून झाला. या चित्रपटात आमिर खानची नायिका होती किट्टू गिडवाणी.

किट्टू सोबत आमिर खानचा या चित्रपटात एक किसिंग सीन होता.

आमिर खान पहिले पासूनच थोडासा ‘शाय’ प्रवृत्तीचा असल्याने किसिंग शॉट देतानाचा त्याचे नवखेपण या चित्रपटात दिसून येते. त्यानंतर आमिर खान आपल्या होम प्रोडक्शन ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात त्याने अभिनेत्री जुही चावला किस केले होते. नंतर आमिर खानवर किसिंग बॉय हा शिक्का बसू लागला आणि त्याच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटांमध्ये किसिंग शॉट मस्ट झाला.

रूप सुंदरी माधुरी दीक्षित त्याची ‘दिल’ या सिनेमात नायिका होती. या चित्रपटात देखील एक किसिंग सीन होता. (‘दिल’ मधील हा सीन बघून अनेकांचे ‘दिल’ तुटले होते असे म्हणतात!) आमिर खानने करिष्मा आणि करीना या दोघीं सोबत किसिंग सीन दिलेले आहे. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटातील करिष्मा कपूर सोबतचा त्याचा शॉट खूप गाजला होता.

अलीकडे ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात त्याने करीना कपूर सोबत चुंबन दृश्य दिले होते. चुंबन दृश्य आणि आमिर खान यांची जणू जोडी जमली होती.

परंतु तुम्हाला माहित आहे का एका चित्रपटाच्या किसिंग सीनच्या वेळी आमिर खानला अक्षरशः घाम फुटला होता. हा सिनेमा होता १९९५ साली आलेला ‘आतंक ही आतंक’. या सिनेमात रजनीकांत देखील होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दिलीप शंकर. या सिनेमात आमिर खान ला अभिनेत्री पूजा बेदी हिला किस करायचे होते.

आमिर खान अशा प्रकारच्या शॉट मध्ये आता बिनधास्त झाला होताच पूजा बेदी चा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे दिलीप शंकर यांनी हा शॉट आणखी इन्टिमेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इतक्या इन्टिमेट पद्धतीने हा शॉट घेण्याच्या सूचना केल्या की त्या सूचना ऐकूनच अमीर आणि पूजा बेदी यांना भीती वाटली. दिग्दर्शकाने हा ‘किस’ अधिक इंटीमेट यावर भर दिला.

आमिर आणि पूजा बेदी यांना रिटेक वर रिटेक द्यावे लागले. आमिरला अक्षरशः घाम फुटला. शॉट झाल्यावर दोघेही खूप नर्व्हस झाले. यानंतर आमिर खान आणि पूजा बेदी दोघेही खूपच अपराधीपणाने वागत होते. त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा ‘टेन्स’ आला होता.

आमिर खान ने सांगितले ,”या शॉट नंतर आम्ही दोघेही एकत्र होतो परंतु एकमेकांशी एकही शब्द बोललो नाही कारण अशा प्रकारचा वाईल्ड किस आम्ही यापूर्वी कधीच शूट केला नव्हता.

शेवटी वातावरणात थोडासा तणाव निवडावा म्हणून मी पूजा बेदीला आपण चेस खेळूया असे सांगितले.” आणि दोघांनी चेस खेळायला सुरुवात केली. चेस खेळता खेळता वातावरण हळूहळू नॉर्मल होत गेले. परंतु या ‘किस’ची दहशत आमिर खानने खूप घेतली होती हे नक्की!

आमिर खान आणि पूजा बेदी यांच्यातील हे प्रदीर्घ चुंबन दृश्य जर पडद्यावर खरोखरच आलं असतं तर बॉलीवूडमधील कदाचित सर्वात इंटिमेट किस म्हणून त्याला मान्यता मिळाली असती! परंतु या सेन्सॉर बोर्डाने या ‘किस’वर मोठा आक्षेप घेतला. दिग्दर्शक दिलीप शंकर यांनी हर तऱ्हेने समजावून सांगितले की हा सीन चित्रपटाच्या साठी किती गरजेचा आहे. परंतु सेन्सॉर बोर्डाने त्यांचे काही एक ऐकले नाही आणि त्यावर कात्री चालवली!

– भिडू धनंजय कुलकर्णी 

– हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.