२१ वर्षाच्या दुर्लभ कश्यपनं फेसबुकवरुन मर्डरची सुपारी घेऊन गॅंग तयार केली होती….

आजवर अनेक गुन्हेगार, डॉन, भाई अशा लोकांबद्दल आपण वाचलं असेल ऐकलं असेल. काहींनी आपल्याच मायभूमीत राहून आपला व्यवसाय वाढवला तर काहींनी देश सोडला तरीही व्यवसाय वाढवला. त्यावेळी सोशल मीडियाचा काही वापर नसायचा. पण आजचा किस्सा अशाच एका तरुणाचा आहे ज्याने सोशल मीडियाचा वापर करून जबरदस्त दहशत बसवली होती.

फेसबुक तर बरेच जण वापरत असतात. फोटो अपलोड करणे, पोस्ट शेअर करणे, लिहिणे हि काम करण्याऐवजी उज्जैनच्या दुर्लभ कुमारने फेसबुकला त्याचा अड्डा बनवला होता. फेसबुकवरून तो सुपारी घ्यायचा आणि त्यानुसार काम करायचा. हा दुर्लभ कुमार आणि त्याची गॅंग काय मॅटर आहे जरा डिटेलमध्ये बघू.

दुर्लभ कुमार हा उज्जैनमध्ये आपल्या आईवडिलांसोबत राहत असे. आई उज्जैनच्या क्षीरसागर क्षेत्रामध्ये माजी शिक्षिका म्हणून काम बघायच्या. वडील मुंबईत नोकरी करत होते आणि नंतर ते इंदोरला शिफ्ट झाले. दुर्लभ हा मांजरींचा शौकीन होता. कायम संभ्रमात आणि रागीट दिसणारा तो असायचा.

वय वर्षे २०-२१ असताना तो उज्जैनमधल्या कुख्यात डॉन बनला होता. फेसबुकचा वापर असाही असू शकतो हे फक्त यालाच कळलं होतं. फेसबुकवर तो उघडपणे पोस्ट टाकायचा, त्याने केलेली एक पोस्ट अशी होती कि,

कुख्यात बदमाश + हत्यारा + पीवर अपराधी कौनसा भी कैसा भी विवाद करना हो तो मुझे संपर्क करे….!

आपल्या फेसबुक अकाऊंटवरून तो शस्त्रांसोबत फोटो टाकत असे, धमकी आणि दहशत निर्माण करण्याचे तो फोटो आणि स्टेट्स टाकत असे.

त्याच्या अकाउंटमुळे लोकांमध्ये दहशत पसरू लागली होती. दुर्लभ कश्यपचं फेसबुक अकाउंट बघून इतर युवक त्याचे चाहते बनले होते. त्याच्या पोस्टला बघून युवक त्याची गॅंग जॉईन करू लागले होते. अशा प्रकारे या दुर्लभ कश्यपच्या गँगमध्ये १००-१५० युवक भरती झालेले होते. या टोळीच्या साहाय्याने दुर्लभ खंडणी, हाणामारी, हफ्ता वसुली, लुटपाट असे गुन्हे करू लागला.

त्यावेळचे पोलीस अधिकारी सचिन अतुलकर यांनी या गॅंगमधले २४ युवक अशा गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवताच हि मुलं दुर्लभ कश्यपच्या गॅंगमधली आहे म्हणून कबूल झाली होती.

कश्यपच्या टोळीचा एक ठराविक ड्रेसकोड होता. गॅंगमधल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर गोल लाल रंगाचा ठिपका. डोक्यात भडक काजळ आणि गळ्यामध्ये काळा कपडा किंवा मफलर असा हा युनिक कोड म्हणून दुर्लभ कश्यप आणि त्याच्या गॅंगमधल्या युवकांची ओळख होती.

गॅंगमधल्या लोकांनी दुर्लभ कश्यपची फेसबुक आयडी चालवण्यासाठी एक स्पेशल टीम बनवलेली होती. या अकाऊंटवरून अनेक धमकावणीच्या पोस्ट पडत असायच्या. आता इतकी दहशत बसवल्यावर त्याचा अंत कुठेतरी होणारच होता.

दुर्लभ कश्यपच्या टोळीने उज्जैनमध्ये जो धुमाकूळ घातला होता तेव्हा त्याच्या प्रतिस्पर्धी टोळ्यांनी त्याचा बदला घेण्याचं ठरवलं. लॉकडाऊनमध्ये वाढलेला हिंसाचार उफाळून आला होता. २० सप्टेंबर २०२० रोजी रात्री २ वाजता उज्जैनमधल्या हेलावाडी भागात एका चहाच्या दुकानावर दुर्लभ कश्यप आणि त्याची गॅंग आलेली होती. त्याचा जुना प्रतिस्पर्धी शाहनवाज आणि शादाबसुद्धा तिथे आलेले होते.

जुन्या दुष्मनीतून आलेला राग दुर्लभ कश्यपने थेट पिस्तूल काढून शहनावाजवर चालवलं. हे दृश्य बघून शाहनवाज आणि शादाबच्या टोळीने चाकूने भोसकून दुर्लभ कश्यपची हत्या केली. या हत्येने एकच गोंधळ  झाला,बराच काळ हाणामारी आणि पळापळी झाली नंतर सगळीकडे शांतता पसरली.

दुसऱ्या दिवशी पोलीस आले आणि पुढे चौकशी चालू राहिली. पण दुर्लभ कश्यपची दहशत आणि फेसबुकवरून त्याने सुरु केलेलं प्रकरण धडकी भरवणारं होतं. त्याच्या हत्येने अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.