यापूर्वी ५ वेळा आर्यन खान आपल्या कारनाम्यांमुळे बातम्यांच्या हेडलाईन मध्ये झळकला होता..

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसबी)  छापेमारी केली. आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अनेकांनी ते सर्वजण पार्टीचा भाग असल्याची कबुली दिली आहे. तर काही जणांकडे ड्रग्स सापडल्याचेही बोललं जात आहे. यामुळे एनसीबीने आर्यन खानसह दोघांना अटक केली आहे.

आर्यन खानने क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आले होते असा दावा केला आहे. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिल्याचे त्याने एनसबीला सांगितले. 

आर्यन खान हा काही पहिल्यांदा चर्चेत आला नाही. यापूर्वी देखील तो ५ वेळा चर्चेत आला होता.  

१) डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कार

आर्यन खान तसा पहिल्यांदा चर्चेत आला तो चित्रपटांसाठी दिलेल्या आवाजामुळे. २००४ मध्ये ‘द इनक्रेडिबल्स’चं हिंदी व्हर्जन ‘हम है लाजवाब’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदाच आपला आवाज दिला होता.  तसेच या चित्रपटाकरिता आर्यन खानला सर्वोत्तम डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला होता. त्याने ‘हम है लाजवाब’ मध्ये तेज या करेक्टरचा आवाज डब केला होता. यासाठी त्याने शाहरुख खानची मदत घेतली होती.

२) कल हो ना हो मिम्स 

शाहरुख खान आणि सैफ अली खान हे दोन्ही अभिनेते मुख्य भूमिकेत असणारा  ‘कल हो ना हो’ या चित्रपट चांगलाच गाजला होता. आर्यन खान आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान जे जवळचे मित्र आहेत. एका पार्टीदरम्यान त्या डोंघांचे फोटो व्हायरल झाले होते.  त्यानंतर अनेकांनी दोघांना ‘कल हो ना हो २ बनविणार का असा प्रश्न विचारून त्यावर मिम्स तयार केले होते. यानंतर आर्यन बराच प्रकाश झोतात आला होता.

३) प्रत्येकवेळी अभिनयाची तुलना होईल त्यामुळे आर्यन अभिनेता होण्यात उत्सुक नाही 

छोट्याशा गावातून येऊन आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुख खानाने बॉलीवूडमध्ये आपला जम बसविला आहे. त्याची ओळख सुद्धा बॉलीवूड किंग अशीच आहे. मात्र मुलगा आर्यन यांच्या चित्रपटातील पदार्पणा बाबत एका मुलाखतीत स्वतः शाहरुख खान ने सांगितले की,आर्यन हा अभिनेता होण्यास उत्सुक नाही. तसेच त्याने स्वतः आपल्याकडे अभिनेता होण्यासाठी काय आहे हे जाणावे. तसेच त्याने अभिनय न करण्याचा प्रमुख कारण म्हणजे, दर वेळी त्याची तुलना माझ्याशी करण्यात येईल. त्यामुळे त्याला ते नको आहे.

४) शाहरुख खान सोबत २०१९ मध्ये पुन्हा एकदा डबिंग 

मध्यला बऱ्याच दिवसा नंतर २०१९  मध्ये आर्यन खानला आपल्या वडिलांसोबत काम केले. ‘लायन किंग’ चित्रपटात दोघांनीही आपला आवाज दिला होता. शाहरुखने मुफासा तर आर्यनने सिंबा या पात्राला आपला आवाज दिला होता. या चित्रपटाचं नंतर त्यांची चर्चा झाली होती. तसेच पुन्हा एकदा आर्यन खानच्या पदार्पणा बाबत बोलण्यात येत होते.

५) अमिताभ बच्चनच्या नातीशी नाव जोडण्यात आले होते 

आर्यन खानला सोशल मिडीवर चांगले फॉलोवर्स आहेत. मध्यंतरी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिच्याशी जोडण्यात येऊ लागले होते. मात्र नंतर ते   दोघे चांगले मित्र असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे आर्यन खान हा बातम्यांचा हेडलाईन मध्ये झळकला होता.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.