पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ‘या’ नर्स मुळे इंग्लंड आणि जर्मनीमध्ये राडा झाला होता.

आज आपण एका अशा स्त्री बद्दल बोलणार आहोत जी व्यक्ती १९ व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मन आणि इंग्लंड असह दोन्ही देशांना चांगलीच माहिती होती. तिच्यामुळे पहिल्या महायुद्धात मोठी ठिणगी पाडली होती. दोन्ही देशामध्ये आधीच घनघोर युद्ध चालू होते त्यात दोन्ही देशांच्या वादाचे आणखी एक निमित्त म्हणजे एडिथ नावाची एक ब्रिटीश नर्स.

एडिथ कॅव्हेल हि एक ब्रिटीश नर्स होती. बेल्जियमची राजधानी ब्रेसेल्स मध्ये एका बर्केंडेल मेडिकल इन्स्टिटयूट मध्ये ती काम करायची.

तिच्या शौर्यांमुळे तसेच ‘देव, देश आणि वैद्यकीय धर्मासाठी’ लढणारी एडिथ तिच्या देशवासीयांसाठी ‘जोन ऑफ आर्क’ च होती. स्थानिक वर्तमानपत्रातून तिची तशी इमेजही रंगवण्यात आली होती.

एडिथ म्हणजे ‘स्त्रीत्वाचे थोर आणि उज्ज्वल रूपच’ असे त्या काळी मानले जायचे. अशा स्त्रीला ठार मारणाऱ्या जर्मन सैनिकांबद्दल राग आलाच पाहिजे अशी भावना हि त्या काळी ‘शेरलॉक होम्स’कार आर्थर कॉनन डॉयल यांनी त्यांची भावना व्यक्त केली.

आणि त्याच्या १० च दिवसानंतर मॅंचेस्टर गार्डीयन या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरचा मथळा होता, “नर्स एडिथची क्रुर हत्या”.

अशा एडिथ ला मारणारया जर्मनांना त्या काळचे सैतान ठरविण्यात आले होते.

पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला एडिथ हि ब्रिटन आणि जर्मनीमधील वादाचा मुख्य मुद्दा बनली होती. का ? कशामुळे ? तिने असे काय केले कि, जर्मनांनी तिला ठार मारले होते, हे आपण बघूया..

जर्मनांनी बेल्जियम वर आक्रमण केले, त्यावेळी ती इंग्लडमधील नॉरफोक या गावी आपल्या आईला भेटण्यासाठी आली होती. युद्ध सुरु झाल्याचे तिला समजले होते तरी ती ब्रेसेल्स ला आपल्या कामाच्या ठिकाणी पुन्हा गेली. एखादी दुसरी कुणी व्यक्ती असती तर न जाण्यातच शहाणपणा मानला असता प्रांती एडिथ ने स्वतःचे कर्तव्य म्हणून ती कामावर रुजू झाली.

परंतु ती यायच्या आधीच ती काम करत असलेल्या रुग्णालयावर रेड क्रोसने त्यावर ताबा मिळवला होता.  तिथं आता जखमी सैनिकांवर उपचार चालू होते. त्यात जर्मन,फ्रेंच,ब्रिटीश, बेल्जियम सैनिकही होते. या सर्वच सैनिकांवर ती कसलाही राग मनात न बाळगता उपचार करत असायची.

पण तरीही मनातली देशभक्ती तिला शांत बसू देत नव्हती.

अशातच २३ ऑगस्ट १९१४ रोजी बेल्जीयममध्ये ब्रिटीश आणि जर्मन सैनिकांत जोरदार लढाई झाली. या लढाईनंतर अनेक ब्रिटीश सैनिक शत्रूंच्या गोटात अडकले होते. खेड्यापाड्यात ते लपून राहत होते. त्यातले २ सैनिक लपून-छपून कसेबसे एडिथ च्या हॉस्पिटल मध्ये पोहचले. आणि एडिथ ने हि मोठा धोका पत्करून त्या दोघांना तिथे ऍडमिट करून घेतले.

त्यात मोठीच रिस्क होती कारण काही दिवस आधीच जर्मनांनी ब्रसेल्स मध्ये पत्रकं लावत इशारा दिला होता कि, “जो कुणी इंग्रज किंवा फ्रेंच सैनिकांना आपल्या घरात आश्रय देईल, त्याला भयानक शिक्षेला सामोरे जावे लागेल. मात्र एडिथ ला स्वतःच्या जीवाची काही पर्वा नव्हती.

तिने दवाखान्याच्याच एका खोलीत जर्मनांच्या तावडीतून निसटलेल्या त्या सैनिकांना आश्रय दिला होता. इतकेच नाही तर तिने काही बनावट कागदपत्रे बनवली आणि त्यांना स्वदेशात पळून जाण्यासाठी मदतही केली

त्यानंतर बऱ्याच सैनिकांना जर्मनांच्या तावडीतून असंच पळून जाण्यात  तिने मदत केली आणि शेवटी  तिच्या ह्या सगळ्या हालचाली जर्मन गुप्तचरांना कळल्याच आणि ती ३ ऑगस्ट १९९५ ला पकडली गेली. 

तिच्यावर खटला भरण्यात आला मात्र या सर्व घडामोडीत ब्रिटीश सरकार तिच्या मदतीला जावू शकले नाही. त्यात अमेरिकेने हस्तक्षेप केला आणि जर्मनीवर राजकीय दबाव टाकला, परंतु अमेरिकेच्या वजनाचा इथे काही एक परिणाम झाला नाही.

परंतु एडिथही स्वतःच्या बचावासाठी काहीच प्रयत्न करीत नव्हती.

शेवटी तिने गुन्हा काबुल केला आणि जर्मन न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शेवटी तिला जर्मन लष्कराच्या फायरिंग स्क्वोडने गोळ्या घालून ठार मारले आणि सगळ्या ब्रिटनमध्ये तिच्या मृत्यूमुळे खळबळ माजली होती. अर्थातच ती एक ब्रिटीश होती आणि तिचे वडील तेथील धर्मगुरू होते आणि तिने केलेल्या कार्याची दखल ब्रिटीशचे लोकं तिला एक सेनानी म्हणायचे, कारण त्यांच्यासाठी एडिथ एक हुतात्मा होती. 

कारण ती शत्रूंच्या गोटात राहून, त्यांच्या नाकावर टिच्चून तिच्या देशाच्या सैनिकांना मदत होती.

हे हि वाचा भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.