इजिप्तच्या एकमेव लोकशाहीवादी नेत्याचा कोर्टात साक्ष देताना अंत झालाय.

काल म्हणजेच १७ जून २०१९ ला इजिप्तचे माझी राष्ट्रपती मोहम्मद मोरसी कोर्टात साक्ष देतांना कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मोहम्मद मोर्सीवर गेली सहा वर्ष खटला चालू होता. मोरसीला इजिप्त मधला एकमेव लोकशाहीवादी नेता म्हंटलं गेल त्यामागे इजिप्त राज्य क्रांतीचा इतिहास आहे .

मोहम्मद मोरसीचा जन्म नाईल नदी लगतच्या खोर्‍यातला. तो इंजिनिअर झाला त्याने अमेरिकेतून पीएचडी ही मिळवली. त्यानंतर इजिप्त मधे परत आला. १९८५ साली तो विद्यापीठात काम करू लागला. पुढील पंधरा वर्ष तो शिक्षणक्षेत्रा बरोबरच “मुस्लिम ब्रदरहुड” मध्ये ही कमालीचा सक्रीय झाला. मुस्लिम ब्रदरहुड ही ९१ वर्षा पुर्वी इस्लामिक चळवळ आहे जी सबंध अरब देशांमध्ये पसरलेली आहे.

सन २००० साली मोरसी पहिल्यांदा इजिप्तच्या संसदेत अपक्ष उमेदवार म्हणुन निवडुन आला. मुस्लिम ब्रदरहुडला तेव्हा उमेदवार देण्यास बंदी होती. त्याने संसदेचा सदस्य म्हणुन एक टर्म पूर्ण केली.

मध्ये बारीक मोठ्या प्रमाणात चळवळ होत राहिली ,पण तिचा उद्रेक व्हायला एक दशक लागले. २५ जानेवारी २०११ ला  इजिप्शियन राज्यक्रांतीची सुरवात झाली. हा विद्रोह तत्कालीन राष्ट्रपती होसनी मुबारक यांच्या जुलमी राजवटी विरोधातला होता. होसनी मुबारक सर्वात जास्त काळ म्हणजेच तीस वर्ष राष्ट्रपती होते. या उठावात समाजातील सर्व घटकांनी भाग घेतला. धरणे आंदोलन, मोर्चे, अहिंसावादी मार्गाने, असहकार पुकारून ह्या सर्व प्रकारे लोकांनी त्यांचा विरोध व्यक्त केला.

हे सर्व दाबण्याचा पोलीस अणि प्रशासन दोघांकडून सर्व प्रयत्न झाले. पोलिसांनी बळाचा प्रयोग केला आंदोलक अणि पोलिसांमध्ये संघर्ष टोकाला गेला. ह्यात ८४६ लोक मृत्यूमुखी पडले तर  ६००० जखमी झाली. याच्या बदल्यात आंदोलकांनी देशभरात नव्वद पोलीस स्टेशन जाळली.

आंदोलन चिघळलं सामान्य लोक या पोलिसांच्या अत्याचाराला, जुलमी राजवटीला, भ्रष्टाचाराला, बेरोजगारीला, महागाईला कंटाळले होते. लोकांना होसनी मुबारक अणि त्याचे भ्रष्ट सरकार नको होते मुबारकला हरवण्याची मागणी जोर धरू लागली.

आंदोलनाच्या शेवटी ११ फेब्रुवारीला अखेर मुबारकला पायउतार व्हावे लागले. या नंतर सहा महिने सैन्याने देश चालवला. ह्याच काळात मुस्लिम ब्रदरहुडने इजिप्त मध्ये झालेल्या निवडणुकीत इजिप्त ची सत्ता मिळवली. इजिप्शियन लोकांनी मोहम्मद मोरसी यांना राष्ट्रपती केले.

मोहम्मद मोरसी यांनीही सत्तेत येताच काही विचित्र निर्णय घेतले. त्यांनी घटनेत बदल करून स्वताचा कार्यकाळ वाढवून घेतला. त्यांचे निर्णयात कोर्टाने ही कोणताच हस्तक्षेप करू नये हा ही नियम त्यांनी काढला. मोरसी आल्यानंतर इजिप्त चं परराष्ट्र धोरण ही नाट्यमय रित्या बदललं. इजिप्त चे अमेरिकेशी संबंध सुधारले.

हे सर्व घडत असतानाच इजिप्त मधे मोरसी स्वतःला कायद्याच्याही वर समजत आहेत अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. लोक हिंसक होऊ लागले. लोकांनी मुस्लिम ब्रदरहुड चि कार्यालयं पेटवायला सुरवात केली.

२०१३ च्या उन्हाळ्यात तर, मोरसींच्या विरोधात एक मोठा आंदोलन झाले. ताहिरीर चौकात हजारो लोकं मोरसी विरोधात नारे देत जमा झाली. लोकं परत एकदा सैन्याच्या हातात देश देण्यास तयार होती पण त्यांना मोरसी नको होता.

त्यानंतर मिलिटरी कॉप कौन्सिल ज्यात संरक्षण मंत्री, विरोधी पक्षनेते ही होते या कौन्सिलने मोरसीला काढून टाकले. मिलिट्रीने त्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या प्रेसिडेंटला अंतरिम राष्ट्रपती बनवले. ह्या निर्णयाचा निषेध म्हणून मुस्लिम ब्रदरहुडने उठाव केला. हे सर्व उठाव सत्तेच्या माध्यमातून मोडले गेले. या उठावात ही ८१७ लोकं दगावली.

इजिप्शियन कोर्टाने मोरसीला मृत्यु दंड सुनावला हा निकाल पाहून अॅॅमेनेस्टी इंटरनॅशनल ह्या मानवतावादी संस्थेने हस्तक्षेप केला अणि कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा मागे घेतली.

हा खटला कोर्टात सहा वर्ष चालू राहिला. दरम्यानच्या काळात मोरसी जेल मध्ये होता. त्याला लोकांना भेटण्यास बंदी घातली गेली, कुटुंबाशी ही बोलू दिले नाही, त्याला डायबेटिस होता तरीही कोणी डॉक्टर त्याला मिळाला नाही. तो खूपच खंगला होता.त्याला कोर्टातही काचेच्या कोठडीत उभा केला जाई. काल आपली साक्ष देत असताना मोरसी खाली पडला इस्पितळात त्याला मृत घोषित करण्यात आले.

मुस्लिम ब्रदरहुडचं म्हणण की मोरसीचा मृत्यू नसून त्याचा सरकारने खून केला आहे.

इजिप्त मध्ये क्रांती घडवणारा लोकशाहीवादी नेता म्हणुन उदयास आलेल्या मोरसीचा काल असा अंत झाला. अनेक इस्लामिक राष्ट्र आजही अस्थिर आहेत फक्त नावं बदलतात सत्तेचा हा खेळ सर्वत्र सारखाच चालू आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.