वेळेत चिठ्ठी मिळाली असती तर अल्बर्ट आइन्स्टाइन बनारस विद्यापीठात प्राध्यापक असते

काशी हिंदू विश्वविद्यालय अर्थात बनारस हिंदू विद्यापीठात आइन्स्टाइन प्राध्यापक म्हणून नोकरी करत असते, पचायला जड जातय नं. गेलच पाहीजे. अल्बर्ट आइन्स्टाइन जगभरातल्या ऑफर असताना तो भारतात कशाला येईल. ते पण प्राध्यापक होण्यासाठी…? 

भिडूंनो, गोष्ट शंभर टक्के खरी आहे. खुद्द पंडीत मदन मोहन मालवीय यांनी आइन्स्टाइन सोबत पत्रव्यवहार केला होता आणि तो पण भारतात येण्यासाठी बनारस विश्व हिंदू विद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी तयार झाला होता. 

झालेलं असं की काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापनेकडे पंडीत मदन मोहन मालवीय राष्ट्रनिर्मितीचे कार्य म्हणून पहात होते. विश्वविद्यालयाची स्थापना करत असताना जगभरातले उत्तम लोक आपणाकडे असावेत त्यांनी इथे ज्ञानदानाचं काम करावं अशी त्यांची इच्छा होती. याच हेतूने पंडीत मदन मोहन मालवीय जगभरातील तत्वज्ञ, साहित्यिक, संशोधक यांना पत्र पाठवून विद्यापीठाचा परिसर पाहण्याची विनंती करत असत. 

या सर्व पत्रव्यवहारातील महत्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा आजच्या सारख्या फास्ट कुरियर सेवा नव्हत्या. सर्व पत्र ही जहाजातून जात असत. सहाजिक एखाद्याला पाठवलेले पत्र त्याच्या पत्यावर जाण्यासाठी सहा महिने ते वर्षभराचा वेळ जात असे. 

बनारस विद्यापाठीत आइन्स्टाइन यांनी शिकवण्यासाठी यावं अशी इच्छा पंडित मदन मोहन मालवीय यांची होती. त्यातूनच त्यांनी २९ ऑक्टोंबर १९३१ रोजी हे पत्र लिहलं. 

खालील फोटोत आपण हे पत्र पाहू शकता. 

Screenshot 2020 08 04 at 12.34.19 PM

मात्र हे पत्र आइन्स्टाइन यांच्याकडे कधी पोहचले यांची नेमकी तारिख उपलब्ध नाही. मात्र याला उत्तर म्हणून आइन्स्टाइनचे पत्र मिळाले ते १९४० सालात म्हणजे तब्बल ९ वर्षानंतर… 

१९४० साली विद्यापीठाच्या नावाने आइन्स्टाइनचे पत्र आले. यामध्ये बनारस विद्यापीठात शिकवण्यासाठी मी येण्यास तयार आहे अस आइन्स्टाइने कळवलं. 

त्यावेळी विद्यापीठाचे तत्कालीन कुलपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि पंडीतजी हे दोघेही बनारसमध्ये उपस्थित नव्हते. त्यांना निरोप पोहचवण्यात आला. तेव्हा आइन्स्टाइन यांना पून्हा पत्र पाठवण्यात आले. 

या पत्राला काही महिन्यानंतर आइन्स्टाइनचे उत्तर आले. त्यामध्ये त्याने सांगितलं की,

मी सध्या अमेरिकेत गेलो असून प्रिंस्टन विवि यांच्याशी जोडला गेलेलो आहे. याच दरम्यान त्यांनी अर्नेस्ट रुदरफोर्ड आणि आर्थर एडिंगटन यांच्याशी देखील संपर्क केला होता. फक्त पत्रव्यवहार वेळेत पूर्ण झाले असते तर आइन्स्टाइन बनारस विद्यापीठाचे प्राध्यापक असते. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.