३३ देशात बंडाची चर्चा झाली…शिंदेंच्या या दाव्याला आधारच नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. बुधवारी शिंदे यांनी शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा आपण लोकप्रिय असल्याचे सांगितले. तसेच  जून महिन्यात जेव्हा बंड पुकारण्यात आला होता तेव्हा जगातील ३३ देशांमध्ये गुगल सर्च मध्ये टॉप वर होतो असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

खरचं पाकिस्तानसह जगातील देशांमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव गुगल सर्चमध्ये होते का. असा प्रश्न अनेकांकडून करण्यात येतो. एकनाथ शिंदे यांच्या हे गुगलच्या टॉप ५ सर्च मध्ये असल्याची पहिल्यांदा चर्चा झाली ती २४ जून २०२२ रोजी.

माध्यमांनी बातमी दिली की,

शिवसेनचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. याचे पडसाद देश – विदेशातही उमटत आहेत. नेटीजन्स याबाबत सर्च करत आहेत. जगातील ३३ देशात एकनाथ शिंदे टॉपवर आहेत. 

गेल्या तीन दिवसांत जगातील ३३ देशांमध्ये ५ नेत्यांची माहिती शोधण्यात आली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. पाकिस्तानातील ५४ टक्के, सौदी अरेबियातील ५७ टक्के, मलेशियामध्ये ६१ टक्के आणि नेपाळमधील ५१ टक्के लोकांनी शिंदे यांच्याविषयी माहिती शोधली असल्याची बातमी दिली होती.

मात्र बातमीचा सोर्स एकाही माध्यमांनी दिला नव्हता. याबाबत अधिक जाऊन घेण्यासाठी बोल भिडूच्या वतीने सायबर एक्सपर्ट आणि आयटी तज्ञ् यांच्याशी संपर्क करण्यात आला. 

याबाबत बोल भिडूशी बोलतांना आयटी तज्ञ् दीपक शिकारपूर म्हणाले की,

 एकनाथ शिंदे बातम्यांमध्ये अचानक दिसत असल्याने लोकांनी गुगलवर जाऊन सर्च केल होत. एखाद्या व्यक्तीला, जागा कुठून सर्च होते हे फक्त गुगल सांगू शकते. गुगल आपल्याला एकूण किती जणांनी सर्च केलं हे सांगत. कुठल्या देशातून किती लोकांनी सर्च केलं हे फक्त गुगल माहिती देऊ शकत.

प्रायव्हसी पॉलिसी मुळे गुगल हे जाहीर करत नाही. गुगल आपली माहिती कोणालाही देत नाही. ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर कुठून सर्च झालं आणि किती जणांनी केलं ही माहिती फक्त गुगल देऊ शकत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती लोकांनी सर्च केलं असेल पण ज्यांनी बातमी दिली ते पुरावा देऊ शकत नाही. 

फक्त एकट्या गुगलकडे हा सगळा डेटा आहे. हा डेटा गुगल पोलिसांना देऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्याबाबतचा डेटा अशा प्रकारे मिळाला असावा. तसेच मोठं मोठ्या कंपन्या अशा प्रकारचा डेटा गुगलकडून मिळवून त्याद्वारे अनॅलिसिस करू शकतात.   

सायबर क्राईम इन्वेस्टिगेशन एक्सपर्ट नचिकेत दांडेकर यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की, 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३३ देशात गुगल सर्च मध्ये टॉप वर हे गुगल ट्रेंड वरून सांगितलं जात असेल. मात्र गुगल ट्रेंडचा डेटा मुख्यतः ५ गोष्टींवरून घेण्यात येतो. पहिलं म्हणजे वेब सर्च, इमेज सर्च, न्यूज सर्च, गुगल शॉपिंग, युट्युब सर्च यावर घेण्यात येतो. 

गुगल ट्रेंड मध्ये किती लोकांनी, कुठून, काय सर्च केलं हे सगळं समजते. एकनाथ शिंदे यांना पाकिस्तान मधून ५४ टक्के लोंकानी सर्च केलं ही आकडेवारी माध्यमांनी दिलीआहे. हा आकडा माध्यमांनी  कुठून घेतला हे सांगणं कठीण आहे. तसेच माध्यमांनी सोर्स दिला नसल्याने टक्केवारी त्यांना कुठून आणि कशी मिळाली हे सांगता येत नाही. अशा प्रकारे माहिती फक्त गुगल देऊ शकत. 

सायबर एक्सपर्ट अतुल कहाते यांनी बोल भिडू बोलतांना सांगितले की, 

गुगल ट्रेंड वरून किती लोकांनी सर्च केलं आहे याची माहिती मिळते. तर दुसरीकडे ट्विटर वर सुद्धा ट्रेंडिंग टॉपिक दाखवलं जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत माध्यमांनी गुगल सर्च बद्दल जी माहिती दिली ती दोन्हीची एकत्र करून त्या आधारे दिली असणार आहे. 

गुगल ट्रेंड मध्ये  कुठल्या देशातून किती टक्के लोकांनी हे सर्च केलं आहे हे नाही समजत. कधी जास्त सर्च केलं एवढंच सांगू शकतो. सर्च बाबतीचा सगळा डेटा गुगलकडे असतो. तो कसा मिळतो याबद्दल माहिती घ्यावी लागेल. किंवा ऍडव्हान्स टूल्स वापरून ती डेटा मिळवता येतो का हे पाहायला हवं.     

सायबर एक्सपर्ट अर्पित दोषी यांनी बोल भिडू बोलतांना सांगितले की, 

एखादी गोष्ट सर्च करत असतांना गुगलचा अल्गोरिदम सेट असतो. त्यामुळे कुठून सर्च होत आहे याची माहित मिळते. एका दिवसात, मागच्या ७ दिवसात, १५ दिवसात किती लोकांनी, कुठून काय सर्च केलं याची माहिती मिळते. टॉपिक वाईज, सिटी अशी सगळी माहिती मिळू शकते.  

गुगल ट्रेंड वरून कुठून सर्च करण्यात आले हे समजते. ३३ देशांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुगलच्या टॉप सर्च मध्ये आले हे गुगल ट्रेंड पाहूनच सांगितलं गेलं असेल.   

 हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.