इलॉन मस्क एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाला वन टू वन येण्याची भाषा करतो हा चेष्टेचा विषय नाहीये

युक्रेन रशिया युद्ध जेवढी वाटलं होतं त्यापेक्षा जास्त लांबलंय. ह्यात रोज नवीनच ट्विस्ट येतायेत. आता या युद्धात सगळ्यात जास्त हवा करतोय इलॉन मस्क. जेव्हा युक्रेनला इंटरनेटची गरज होती तेव्हा आपल्या स्टारलिंक कंपनींचं इंटरनेट पुरवत त्यानं या युद्धात एंट्री मारली. एका अख्या देशाला त्यानं जगाशी कनेक्ट करून दिलं. त्याच्या त्या कामाची लै हवा झाली. झाली म्हणण्यापेक्षा मस्कनं पण त्यानं केलेल्या मदतीचं बरोबर मार्केटिंग केलं असं म्हणलं तर चालेल.

मग पुढं जाऊन त्यानं आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनाच आव्हान दिलंय.

वन टू वन फाइट करू आणि पणाला काय असेल तर युक्रेन. अगदी पुतीन यांना समजेल अशा टोनमध्ये आणि भाषेतपण म्हणजेच रशियनमध्ये इलॉन मस्कने ट्विट केलंय.

 

झाली इथूनच सुरवात झाली. आता वर वर तर अशी फाईट होण्याची जरापण शक्यता नाहीये. मात्र लोकांनी विषय जोरदार चघळला आणि विषय मागे राहिला. gif टाकून मिम बनवून विषय जोरदार चघळला. काहींनी तर पुतीन यांच्या वयाची आणि उंचीची तुलना करून मस्क अवघ्या १० सेकंदात जिंकेल असं निकाल पण जाहीर करून टाकला.

 

पण खरी फाईट आधीच चालू आहे. देशाच्या अर्थव्यस्थेवढी नेट वर्थ असलेले या कंपन्या आता देशांच्या  बरोबरीने उभा राहू लागल्यात. अमेरिकेतल्या एका एका उद्योगपतीची संपत्ती एकाद्या देशाच्या इकॉनॉमी एवढी आहे.

जर मस्कची कंपनी एक स्वतंत्र देश असती तर ती जगातली सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत ही कंपनी टॉप -२० मध्ये असती.

बर अशी एवढी गडगंज नेट वर्थ असेलला इलॉन मस्क एकटाच नाहीये. उदाहरणार्थ Appleच घ्या.

Appleचं मूल्य $२.२ ट्रिलियन इतकं आहे. आणि फक्त सात देश आर्थिकदृष्ट्या या कंपनीच्या पुढे आहेत.

आता मायक्रोसॉफ्टकडे लक्ष वळू  $१.८ ट्रिलियन मुल्यांकन असतानारी कंपनी कॅनडाच्या बरोबरीने पैस कमावते.  फक्त नऊ देशांकडेच  मायक्रोसॉफ्टपेक्षा जास्त पैसा आहे. त्याचबरोबर अल्फाबेट जी गुगलची पॅरेंट कंपनी आहे आणि  झुकरबर्गची मेटा जी फेसबुक, इंस्टाग्राम चालवते यांचंही मूल्यांकन ट्रिलियन डॉलरच्या पार आहे.

आता फक्त इथं  पैशांचा विषय नाहीये तर या पैशाच्या जीवावर त्यांच्याकडे असेलेल्या पॉवरचा आहे. मार्केटमधल्या ताकदीच्या जीववर देशांची धोरणं बदलण्याच्या त्यांच्या क्षमतेचा आहे. पैसे कमवूनही करोडोंची टॅक्स चोरी करण्याचा आहे. लोकांचा डेटा जमा करून त्यांची चॉइसेसवर  परिणाम करण्याचा आहे. म्हणून मस्कचं हे ट्विट मस्करी करण्यापलीकडे सिरीयस होण्याचा विषय आहे.

म्हणूनच या कंपन्यांना युरोपातून जोरदार विरोध होऊ लागलाय. त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले जातायेत. मात्र आपली लोकं मात्र या कंपन्या फुकटात सेवा देतायत काही स्वस्तात सर्विसेस देतायेत म्हणून खुश आहेत. त्यामुळं तुम्हाला जे फुकटात दिलं जातायेत त्यामागे किती प्रॉब्लेम आहे ते एकदा बघाच.

तर जास्त वेळ नाही घेत अवघ्या ४ पॉईंट्समध्ये यांचे कारनामे सांगतो.

पहिला आहे

 प्रायव्हसी 

आता तुमच्यापैकी काही जणांना प्रायव्हसी  हे श्रीमंतांचे चोचले आहेत असेल तर तुम्ही जरा जास्तच कॅज्युअल घेताय. त्यामुळं इशू नीट बघा. तुम्ही काय लाईक करताय, तुम्ही कोणाला फॉलो बॅक करताय आणि तुमच्या फेसबुकवरील इतर ऍक्टिव्हिटीवरून झुकेरबर्गकडे तुमची पूर्ण कुंडली आहे. आणि समजा त्यानं याचा वापर तुम्हाला प्रभावित करायला केला तर. केला तर काय म्हणतोय? केला आहेच असं म्हणायला पाहिजे. 

मागे अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केम्ब्रिज ऍनालिटिका या कंपनीने असाच फेसबुकचा डेटा वापरून लोकांनी कोणाला मतदान करायचं यावर प्रभाव टाकला होता.

 म्हणजे आता देशात सरकार कोणाचं आणायचं त्या ह्या कंपन्या ठरवणार. नुकत्याच अल जझिराने छापलेल्या एका वृत्तात फेसबुकनं निवडणुकीत भाजपाला पण मदत केल्याचं समोर आलंय. 

आता तुमच्यापैकी कोणी स्वतःला ‘अराजकीय’ म्ह्णून इकडं इग्नोर करणार असाल तर तुम्ही गूगलवर एकादी गोष्ट सर्च केली,मग तुम्हाला त्या सर्च हिस्ट्री वरून अमेझॉनच्या वस्तूंची सगळीकडेच जाहिरात येयला लागली आणि मग तुम्ही ती वस्तु गरज नसतानाही विकत घेतली हा घटनाक्रम आठवा.

जबाबदारी 

वयाच्या विशी पार केली तर जबाबदारी हा शब्द ऐकला तरी काटा येतो मात्र लाखो करोडो कमवूनसुद्धा या लाखो करोडो कमवणाऱ्या कंपन्या मात्र निवांत आहेत.  फेसबुक सारख्या मोठ्या फ्लॅटफॉर्मवरनं लोकं तुफान द्वेष पसरवतात, दंगली घडवतायेत, लाखोंचा गंडा घालतायेत मात्र तिकडं झुकरबर्ग निवांत. 

म्यानमारमध्ये जेव्हा लाखो रोहिंग्या मुस्लिमांची कत्तल झाली होती तेव्हा त्यांच्या विरोधात सगळ्यात जास्त द्वेष फेसबुकवरून पसरवण्यात आला होता. 

आणि यावर जेव्हा अमेरिकेच्या संसदेत झुकेरबर्गला प्रश्न विचारण्यात आले होते तेव्हा उत्तरं देताना त्याला घाम फुटला होता. भारतातही आजही या कंपन्यांची कोणती ठोस जबाबदारी फिक्स करण्यात आली नाहीये.

स्पर्धा 

सुरवातीला सेवा स्वस्तात देऊन बाकीच्या कंपन्यांचा मार्केटमधून बाजार उठवायचा आणि मग निवांत त्यांची मोनोपोली वापरून फायदा काढायचा असा या कंपन्यांची सोपी मार्केटिंग स्ट्रॅटेजि. मग ते फेसबुक असू दे की गूगल त्यांच्या क्षेत्रात त्यांचा कोण बाप नाहीये.

आता ह्या मोनोपोलीचा आपल्याला कसा तोटा याचं उदाहरण बघू.

 समजा एलॉन मस्कनं आपल्या भारतात  आपल्या स्टारलिंकची सेवा दिली. आता मार्केटमध्ये उतरल्यावर स्वस्तात इंटरनेट देऊन तो बाकीच्या कंपन्यांना गाशा गुंडाळावा लावणार एवढा नक्की. मग उरला कोण फक्त मस्क आणि स्टारलिंक. आणि समजा तो देश उद्या भारत युद्धात उतरला आणि यावेळी मस्कला वाटलं भारताच्या विरोधात जो देश आहे  त्यांची बाजू बरोबर आहे आणि त्यांनी भारतातली सेवा बंद केली. झाला ना घोळ. या हवे हवेतल्या गोष्टी नाहीयेत. 

रशियाची बाजू बरोबर आहे की चूक हा भाग वेगळा पण मोनोपॉली असलेल्या कंपन्या जेव्हा रात्रीत मार्केट सोडतात तेव्हा काय होतं हे आपण रशियामध्ये बघतच आहोत.

टॅक्सेस 

कारचोरी हे तर आमचा अगदी जन्मसिद्ध हक्क असल्यासारखंच या कंपन्यांचं मॉडेल काम करतं. आयर्लंड, सिंगापुर सारख्या टॅक्स हेवेन्स मध्ये कंपनी रजिस्टर करून या कंपन्या करोडोंची टाकं चोरी करतात. 

या मोठ्या टेक कंपन्या जरवर्षी भारतसारख्या विकसनशील देशातून ४२.८ बिलिअनची टॅक्स चोरी करतात. 

ऍक्शन एड या संस्थेच्या म्हणण्यानुसार एवढ्या पैश्यात या विकसनशील देशात जरवर्षी ७ ते ८ लाख नवीन शिक्षक भ्रुमन त्यांचे वेळेवर पगार देणे शक्य झाले असते. 

एकतर आपल्या पैशांच्या जीवावर या कंपन्या अनेक देशांत असे कायदे येऊन देत नाहीत. आणि जरी आलीये तरी यांचे एक्सपर्टस बरोबर त्या कायद्यतल्या पळवाटा शोधतात.

 ब्लॉकचेन टेकनॉलॉजि आणि त्यावर आधारित बिटकॉइनसारख्या क्रिप्टो करन्सीमुळे आता सरकारची पैसा छापण्यासाठी पण गरज लागणार नाही अशी परिस्तिथी आहे. 

मस्कची बिटकॉइन आणि बाकीच्या क्रिप्टो करन्सीजना प्रमोट कारण्यामागं सरकारांची महत्व कमी करणं हिच स्ट्रॅटेजी आहे असं अनेक तज्ञ सांगतात. म्हणजे आपल्यामध्ये आणि या कंपन्यांमध्ये सरकरसारखा मध्यस्ती नसेल. आणि मग सरकार नसला तर टॅक्सचा संबंधच नाही. आता सरकार लै शहाणं आहे अशातला प्रश्न नाही पण त्याच्याएवढ्याच या कंपन्या धोकादायक आहेत.

आता लास्टचा क्लेरिफिकेशन याचा अर्थ टेकनॉलॉजिच बाद आहे का तर बिलकुल नाही. फक्त ही  सगळी टेकनॉलॉजी फक्त काही टाळक्यांच्याच हातात असणं हा खरा प्रॉब्लेम आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.