नासा हळू काम करतीये म्हणून एलन मस्कने स्पेस एक्सची स्थापना केली होती..
काहींच्या बाबतीत म्हणतो ना ‘बस नाम हि काफी है’ त्यातला एक म्हणजे एलन मस्क. या भिडूने वाहन निर्मिती, उर्जा, अशा विविध क्षेत्रात मोठे नाव कमविले आहे. त्यानंतर आता मंगळावर मानवी वस्ती वसविण्यासाठी एलन मस्क स्पेस-एक्स च्या माध्यमातून प्रयत्नशील आहे.
३ दिवस अवकाशातून पृथ्वीभोवती ४० पेक्षा जास्त प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतरच्या स्पेस एक्सच्या इंस्पेरीरेशन -४ मोहीमेत सहभागी ४ अवकाशयात्री भारतीय प्रमाणवेळे नुसार रविवारी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांनी पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत अशा प्रकारे सामान्य व्यक्तींना अवकाशात घेऊन जाणारी स्पेस एक्स एकमेव कंपनी ठरली आहे.
स्पेस एक्स कंपनीमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी अंतराळातील दरवाजे खुले झाले आहेत.
एलन मस्क
एका खासगी कंपनीच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीना अवकाशात पाठविता येईल अशी कल्पना लढवणाऱ्या एलन मस्क नेयांचा जन्म २८ जून १९७१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया शहरात झाला. त्यांचे वडील इंजिनीयर तर आई मॉडेल होती.
५० वर्षीय एलन मस्क अनेक कारनामे केले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची गणना करण्यात येते.
एलन मस्कला लहान पणापासून वाचनाची आवड होती. पुढे जाऊन त्यांना कंप्यूटरचा नाद लागला. अवघ्या १२ व्या वर्षी एलन मस्कने कंप्यूटर गेम तयार केला होता. त्याचे नाव ब्लास्टर ठेवले होते. त्यांनी हा गेम ५०० डॉलर मध्ये विकला होता.
१७ व्या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिका सोडत कॅनडा मध्ये शिक्षणसाठी स्थायिक झाले होते. तिथे त्यांनी फिजिक्स आणि अर्थ शास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर ते डॉक्टरेट अमेरिकेतील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत पोहचले. मात्र मध्येच पीएचडी सोडली. दरम्यान इंटरनेटने दुनियेत धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. त्याला त्यांना लहान भावाने साथ दिली.
त्यानंतर दोन्ही भावांनी वडिलांकडून पैसे घेत Zip2 नावाची सॉफ्टवेयर कंपनी तयार केली. त्या कंपनीला कॉम्पेक खरेदी केली. ते पैसे घेऊन X.com नावाची नवीन कंपनी सुरु केली. ही कंपनी ऑनलाईन बँकिंग सारखी सेवा देत होती. पुढे तिचे नाव Paypal ठेवले. २००२ मध्ये eBay ला विकली विकली. त्यातून साधारण १ हजार २०० कोटी मिळाले होते.
त्यानंतर एलन मस्कने आपला कार्यक्षेत्र बदलले. प्रयोग म्हणून पुर्थ्वी वरून मंगळ ग्रहावर ग्रीनहाउस पाठवावे. येथे झाडे उगविण्यात येतील. मात्र अंतरिक्ष मध्ये जायचे असेल तर रॉकेटची गरज असते. मस्कला सांगण्यात आले की, रशियात स्वस्त रॉकेट उपलब्ध होते. त्यासाठी ते २००१ मध्ये रशियात गेले. नवीनच असल्याने मस्कला थारा लागू दिला नाही.
परत २००२ मध्ये एलन मस्क रशियाला गेले. तिथे जुन्या बैलेस्टिक मिसाइल खरेदी करण्याच्या होत्या. मिसाइलचा उपयोग रॉकेट म्हणून करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्याची किंमत ५८ कोटी सांगण्यात आली. मस्कला ती रक्कम जास्त वाटली.
मस्कला वाटले की, यापेक्षा कमी पैशांमध्ये आपण रॉकेट तयार करू शकू. त्यानंतर स्पेस एक्सची स्थापना केली.
२००६ मध्ये कंपनीचे पहिले रॉकेट बनून तयार झाले होते. मात्र मोहिमेत ३३ सेकंदात ते फेल झाले. २००७ आणि २००८ मध्ये सुद्धा असच झालं. त्यानंतर कंपनी होण्याचा मार्गावर होती.
२८ डिसेंबर २००८ ला फाल्कन- १ रॉकेट चवथ्या प्रयत्नात ओर्बिट मध्ये पोहचले होते.
एलन मस्कचे म्हणणे आहे की, पृथ्वी कधी नष्ट होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर इतर ग्रहावर मानवी वस्ती तयार करायला हवी. स्पेस एक्स आणि अमेरिकेची स्पेस एजेंसी नासा सोबत एक करार झाला असून त्यांतर्गत विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत.
स्पेस एक्स काय काम करते
एलन मस्क यांनी स्पेस एक्सचे ची स्थापना २००२ मध्ये केली आहे. स्पेस एक्स कंपनीचा हेतू हा मंगल ग्रहावर मानवी वस्ती वसविणे आहे. मानवी वस्ती बसविण्यासाठी सगळ्यात अगोदर मनुष्याला मंगळावर पोहोचावे लागणार आहे. मात्र एलन मस्कच्या मते याबाबतीत नासा खूप हळू काम करत आहे. त्याला स्पेस एक्सच्या माध्यमातून गती देण्याचे काम करणार आहे.
मंगळवार जाण्यासाठी स्पेस एक्स कडून एक रॉकेट तयार करण्यात येत आहे. त्याला स्टारशिप असे नाव देण्यात आले आहे. मस्क यांना अंतराळातील प्रवास सोपा आणि स्वस्त करायचा आहे. मस्क यांचे म्हणणे आहे की, पृथ्वी प्रमाणे इतर ग्रहावर मानवी वस्ती वासायला हवी.
त्यामुळे स्पेस एक्स या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
या स्पेस एक्सचा फायदा हा अमेरिकेला सुद्धा झाला आहे. स्पेस एक्सच्या या मोहिमे नंतर अमेरिकेला आपले अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यासाठी रशिया आणि युरोपियन देशांची मदतीची गरज उरली नाही. करोडो रुपये खर्च करून रशिया आणि युरोपीय देशांच्या रॉकेटच्या मदतीने अमेरिका आपल्या अंतराळवीरांना स्पेस स्टेशन मध्ये पाठवीत होती. आता स्पेस एक्समुळे त्याची गरज उरली नसल्याचे सांगण्यात येते.
हे ही वाच भिडू
- आपल्या पानपट्टीवर आलेला तो म्हातारा अंतराळवीर राकेश शर्मा आहे म्हणल्यानंतर त्यांना पटल नाही.
- अंतराळवीर महिला अंतराळात पिरियडस् आल्यानंतर काय करतात ?
- कल्पना चावलांच्या अपघाती निधनासाठी आजही नासाला जबाबदार धरण्यात येते