इलॉन मस्कच्या ट्विट मधल्या घोळामुळे या कंपनीचे शेअर्स ११ हजार टक्क्यांनी वाढले.

‘यूज़ सिग्नल’ म्हणजेच सिग्नलचा वापर करा. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आलेल्या इलॉन मस्क यांनी चार-पाच दिवसांपूर्वी केलेल्या या दोन शब्दांच्या ट्विटने जगभरात खळबळ उडवून दिली होती. आता तुम्ही म्हणाल चार-पाच दिवसांपूर्वी घडलेली गोष्ट आता का सांगतोय भिडू? कारण ऍक्शनच्या रिऍक्शन आता समोर यायला लागल्या आहेत.

त्या रिऍक्शन म्हणजे ते सिग्नल ऍप किती जणांनी डाउनलोड केलं वगैरे असल्या अजिबात नाहीत. पण तरी देखील मस्क यांच्या ट्विटने खळबळ उडवून दिली. कशी ते सांगतो.

सुरुवात करूयात व्हाटसऍप पासून. व्हाटसऍपने आपली प्रायवसी पॉलिसी बदलली. सांगितलं कि व्हाटसऍप आता यूजर्सचा डाटा फेसबुकसोबत शेअर करेल. आणि त्यासाठी तुम्हाला परवानगी द्यावीच लागेल अन्यथा ८ फेब्रुवारीपासून व्हाटसऍप बंद होईल

त्याचवेळी इलॉन मस्क यांचं ट्विट आलं,

तसं तर इलॉन यांनी ट्विट मध्ये बाकीचं काहीच सांगितलं नव्हतं कि, व्हाटसऍप प्रायव्हसी पॉलिसी बदलत असल्यामुळे वगैरे तुम्ही सिग्नल वापरा. पण हे दोन्ही मेसेंजर ऍप असल्यामुळे या दोन्हीचा संबंध जोडला, गेला आणि जगभरात सिग्नल ऍप वापरणाऱ्यांची संख्या अचानक वाढली.

त्यामुळे सिग्नलला पण डाउनलोड आणि व्हेरिफिकेशनच्या कामात अडचण येवू लागली, सिग्नल कडून पण अगदी आनंदात ट्विट आलं कि, आपल्याला येणाऱ्या अडचणीबद्दल क्षमस्व आहोत वगैर, वगैरे…

आता अजून एक दुसरी बातमी,

७ जानेवारी २०२१ ला मस्क यांनी ट्विट केलं आणि ७ जानेवारीलाच सिग्नलचे शेअर्स थोडे नाही तर तब्बल ११ हजार टक्क्यांनी वाढले.

म्हणजे विचार करा कि, ६ जानेवारीला जेव्हा शेअर मार्केट बंद झालं तेव्हा ०.६० डॉलर किंवा ६० सेंट असलेला सिग्नलचा शेअर्स १२ जानेवारीला ७० डॉलर पर्यंत पोहचला. म्हणजेच जवळपास ११६ पट किंवा ११ हजार ६६७ टक्के वाढ झाली.

सोप्या भाषेत सांगायचं तर ७ जानेवारी २०२१ रोजी मार्केटमध्ये १ हजार रुपये लावले तर ११ जानेवारी पर्यंत त्याची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली होती. 

या रिटर्नचे जगातील कोणत्याही इतर इन्वेस्टमेंट मधून मिळालेल्या रिटर्नशी तुलना केली तर नक्कीच जास्त वाटू शकतात. म्हणजे हि अशी एखादी स्कीम तुम्ही स्वप्नात सुद्धा ऐकलेली नसती कि ४ ते ५ दिवसात ११६ पट जास्त नफा मिळवून देणारी.

पण तरीही हि काही इतकी मोठी वाटावी अशी काही गोष्ट नव्हती. कारण साहजिक होत, जगातील सगळ्यात श्रीमंत, आणि जिनियस माणसाने कंपनीला रिकमेंड केलं होत, एवढ्यावरच न थांबता मस्कने पुढे दुसरं ट्विट करत असं पण सांगितलं कि,

याआधी मी अनेकदा या कंपनीला मदत केली आहे आणि पुढे देखील करत राहीन. 

त्यामुळे या कंपनीचे शेयर्स इतके वाढले यावर अजिबात आश्चर्य करू नका, आश्यर्य आम्ही आता जी गोष्ट सांगणार आहे त्यावर करा, नाही तुमच्या चक्कीत जाळ झाला तर विचारा.

खरतर ज्याचे शेयर्स ११६ पटीने वाढले ती ‘सिग्नल’ कंपनी हि मस्कने रिकमेंड केलेलीच नव्हती. आणि या सिग्नल कंपनीचा सिग्नल अॅपशी दूर दूर पर्यंत काहीही संबंध नाही.

ही सिग्नल कंपनी आहे अमेरिकेच्या टेक्सस राज्यातील एक छोटीसी मोबाईलची. जी कि ‘सिग्नल ऍडव्हान्स, इंक’ या नावाने रजिस्टर आहे. 

आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मस्क यांनी सिग्नल मेसेंजर अॅपसाठी ट्विट केलं होत आणि त्याचा थेट फायदा झाला तो या ‘सिग्नल ऍडव्हान्स, इंक’ या कंपनीला.

कारण ‘सिग्नल अॅप’ तर शेयर मार्केटमध्ये लिस्टेडच नाही.

यावर सिग्नल अॅपने देखील ट्विट करून क्लिअर केलं,

जेव्हा स्टॉक एनालिस्ट सांगतात, कि मिक्स्ड सिग्नल मिळत आहेत. तर त्याचा अर्थ असा होतो की, लोक सिग्नलमध्ये रिकॉर्ड ग्रोथ मध्ये इनवेस्ट करू इच्छितात. पण हे आम्ही नाहीच. आम्ही एक स्वतंत्र संस्था आहोत आणि आमची एकच इनवेस्टमेंट आहे ती म्हणजे तुमची ‘प्रायवसी’

यावर ‘सिग्नल ऍडव्हान्स’चे सीईओ डॉ. क्रिस हॅमेल यांनी देखील सांगितलं कि, ‘सिग्नल मेसेजिंग सर्विस’ आणि ‘मस्क’ यांच्याशी आमचा कसलाही संबंध नाही. पण तरीही आम्ही सिग्नल अॅप अभिनंदन करतो.

हे अभिनंदन शेअर्स वाढण्यावर नाही तर डाऊनलोडला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल होत. कारण शेअर्स तर ‘सिग्नल ऍडव्हान्स’चे वाढले ना. 

आता जाता जाता हे पण सांगतो कि, जसा हा सगळा घोळ बाहेर आला तसं ‘सिग्नल एडवांस, इंक’चे शेअर्स रिव्हर्स येऊन १५.१६ डॉलरवर पोहचले आहेत. .

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.