गरिबांची भूक भागवण्यासाठी इलॉन मस्कने ‘टेस्ला’ विकायची तयारी दर्शवलीये पण..

इलॉन मस्क हा माणूसच अफलातून आहे राव…जरा विचित्र पण सुद्धा, पण याच विचीत्रपणामुळे कदाचित तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनला असणार आहे. 

इलॉन मस्क काहीतरी विचित्र आणि अविश्वसनीय कल्पना घेऊन समोर येत असतात परंतु जेव्हा हे विचार आकार घेण्यास सुरुवात करतात, तेंव्हा लोकांनी यापूर्वी विचारही केला नसेल असा अविष्कार समोर येतात. जसं कि, स्पेसमध्ये कार लॉन्च करणे. अलीकडेच त्याने मंगळावर वसाहत करायची आहे आणि चंद्रावर डोगेकॉइन ठेवायचे आहे असं जाहीरपणे सांगितलं होतं. थोडक्यात मस्कला लोकं ‘एक विक्षिप्त प्रतिभेचा’ माणूस मानतात. 

त्याचं झालं असं कि, अलीकडेच एलन मस्कने संयुक्त राष्ट्र संघाला एक आव्हान दिलंय. 

हे आव्हान काय त्याच्या कंपन्यांबद्दल किंवा त्याच्या सध्याच्या आवडत्या डोजकॉइन बद्दल नव्हते, न स्पेस मध्ये काही आगळ-वेगळ करण्याची घोषणा नव्हती.  तर हे आव्हान होतं, जागतिक स्तरावरच्या उपासमारीच्या गंभीर समस्येबाबतच…आता काय हे मोठी आणि महत्वाची मंडळी ज्यांच्या एक ट्वीट वर देखील बातम्या बनतात कारण ती व्यक्ती जागतिक पातळीवर आपलं महत्व वेळोवेळी सिध्द करत असतात. 

नक्की काय झालं?

युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामचे संचालक डेव्हिड बीसले यांना केलेल्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे.डेव्हिड बीसले यांनी CNN ला सांगितले की मस्क किंवा अब्जाधीशांसारख्यांच्या संपत्तीचे  २ टक्केच्या एकवेळच्या पेमेंटने  जागतिक स्तरावरची उपासमारीची समस्या मुळातूनच संपू शकते. 

मग काय यावर मस्क यांनी लागलीच त्यांना रिप्लाय दिला. मस्कची आणखी एक खासियेत म्हणजे, ते ट्विटरवर खूप सक्रिय असतात, त्यातच त्यांनी आज एक ट्वीट केलं आहे. जागतिक स्तरावरील उपासमारीची समस्या सोडवण्यासाठी एलन मस्क यांनी पैसे देण्यास सहमती दर्शवली. पण यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

“जर डब्ल्यू एफ पी या ट्विटर थ्रेडवर $6B जगाची भूक कशी सोडवेल याचे वर्णन करू शकत असेल, तर मी आत्ताच टेस्लाचे स्टॉक विकून ते करीन,” मस्क यांनी सह-संस्थापक असलेल्या डॉ. एली डेव्हिड हे  डीप इंस्टिंक्ट नावाच्या कंपनीच्या सह संस्थापक आहेत. यांच्या ट्विटला रिप्लाय म्हणून हे ट्विट केले . डेव्हिडने जागतिक भूक सम्सेच्या निर्मूलनाच्या दिशेने WFP च्या कार्यावर काही स्नार्क (snark) सोबत बीसले (Beasley) चा उल्लेख करणाऱ्या सी एन एन लेखाचा स्क्रीनशॉट ट्विट केला. मस्क त्याच्याशी काही उत्तेजक ट्विट पाठवण्यासाठी सामील झाला, तथापि त्याने खात्रीने, नंतर जोडले: “परंतु ते ओपन सोर्स अकाउंटिंग असले पाहिजे, जेणेकरून पैसे कसे खर्च केले जातात हे लोक तंतोतंत पाहता येईल.”

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ म्हणजेच मस्क, ज्यांची एकूण संपत्ती डॉलर ३०० अब्ज डॉलर्सपेक्षा पण जास्त आहे. पण बीसले याचं असं म्हणन आहे कि, मस्क हे एवढे श्रीमंत आहेत कि त्यांच्या या संपत्तीचे २ टक्के जे कि, सुमारे डॉलर ६ अब्जच्या जवळपास रक्कम आहे. पण हीच रक्कम जवळपास ४२ दशलक्ष लोकांच्या मदतीसाठी खूप महत्वाची भूमिका निभावू शकते.

अशी लोकं जे उपासमारीने ग्रस्त असतात जे अन्नावाचून मरतातही अशा लोकांपर्यंत आपण पोहचलो नाहीत.

पण त्यानंतर बीसले यांनी त्याच ट्विटर थ्रेडमध्ये या लेखाबद्दल स्पष्टीकरण जारी केले जे त्यांना वाटले की गैरसमज झाला असावा. बिसले यांचे स्पष्टीकरण असं होतं कि, 

“आम्ही कधीही म्हटले नाही की डॉलर ६अब्ज जगाची भूक दूर करेल. या अभूतपूर्व उपासमारीच्या संकटात ४२ दशलक्ष जीव वाचवण्यासाठी ही एक वेळची देणगी आहे. २०२० मध्ये २२५ दशलक्ष लोकांपर्यंत अन्न सहाय्यासह पोहोचण्यासाठी आम्हाला आवश्यक असलेल्या $८.४B चा समावेश आहे. कोविड, संघर्ष आणि हवामानाच्या धक्क्यांमुळे निर्माण झालेल्या परिपूर्ण वादळामुळे आम्हाला आमच्या विद्यमान निधीच्या आवश्यकतांपेक्षा आता $६B अधिक ची गरज आहे.”

पुन्हा त्यांनी पुन्हा एका स्वतंत्र ट्विटद्वारे एलन मस्कला उद्देशून म्हणलं आहे कि, “चला बोलूया: हे फाल्कन हेवीसारखे क्लिष्ट नाही, परंतु कमीतकमी आणि अर्धवट संभाषण न करणे खूप धोक्याचे आहे. मी तुमच्यासाठी पुढील फ्लाइटमध्ये जाऊ शकतो. तुम्ही जे ऐकता ते तुम्हाला आवडत नसेल तर मला बाहेर फेकून द्या!” – बीसले यांनी ट्विटरवर थेट मस्कला टॅग करत लिहिलंय.

WFP संचालकांच्या स्पष्टीकरणाने आनंदित होऊन, मस्कने उत्तर दिले, “कृपया तुमचा वर्तमान आणि प्रस्तावित खर्च तपशीलवार प्रकाशित करा जेणेकरून लोकांना नक्की कळेल की पैसा कुठे जातो.” त्याने UN अधिकार्‍यांकडून लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या लेखाची लिंक देखील पोस्ट केली.

आत्तासाठी, आव्हान अजूनही दोन्ही बाजूंनी खुले आहे. मस्कची इच्छा आहे की WFP ने त्याचे खातेवही लोकांना दाखवावे, तर WFP चे संचालक अब्जाधीश जगाची भूक कशी सोडवू शकतात याबद्दल टेक होंचोने संवाद साधावा अशी इच्छा आहे.

 हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.