आजही आपल्या देशात महामारीसाठी ब्रिटिशांनी १२३ वर्षांपूर्वी बनवलेला कायदा पाळला जातो

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगभरात कहर माजवला. 1 -2 नव्हे तर जवळपास 220 देशांना या विषाणूने आपल्या कचाट्यात अडकवलय. ज्यामूळे जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला ( WHO) जागतिक महामारी म्हणून संबोधले. या साथीच्या आजाराने आतापर्यंत 165,955,118 लोकांना संक्रमित केलयं, तर यातल्या 3,438,692 जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

भारताविषयी बोलायचे झाल्यास सध्या देशात कोरोनाची दूसरी लाट आहे. त्यात नवनवीन लक्षणांची, आजारांची भर पडत चाललीये. ज्यामूळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच म्यूकरमाइकोसिसचे नवे तांडव सुरू झालेय. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळतेय.

त्यानंतर आता केंद्राने सर्व राज्यांना म्यूकोर्मिकोसिस, ज्याला ब्लॅक फंगस म्हणून ओळखले जाते, याला महामारी अॅक्ट 1897 अन्वये नोटेबल डिजीज  म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. राज्यांना पाठवलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी म्हटले की,

सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांनी ब्लॅक फंगसची स्क्रीनिंग, निदान आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. तसेच राज्यांना ब्लॅक फंगसची प्रकरण, मृत्यू, उपचार आणि औषधे यांचा हिशेब ठेवावा लागेल.

कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळतात. राजस्थान, हरियाणा, तेलंगणा आणि तामिळनाडूने यापूर्वीच ब्लॅक फंगसला साथीचे रोग जाहीर केले आहेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊ की, जेव्हा एखादा रोग महामारी म्हणून घोषित केला जातो तेव्हा काय बदल घडतात.

महामारी अर्थात साथीचा रोग म्हणजे काय?

महामारी अशा आजाराला म्हणतात जो एकाच वेळी जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये पसरतो. पॅनडेमिक आणि एपिडेमिक दोन्हींचा अर्थ महामारी होतो. मग प्रश्न उद्भवतो की, एकाच अर्थासाठी दोन शब्द का बोलले जातात. तर त्यामागचे कारण म्हणजे सीमा. कोणती महामारी कधीपर्यंत एपिडेमिक असेल आणि कधी पॅनडेमिक होईल हे देशांच्या सीमा निश्चित करतात.

जोपर्यंत रोग कोणत्याही एका देश, राज्य, प्रदेश किंवा सीमेपर्यंत मर्यादीत असेल तोपर्यंत त्याला एपिडेमिक म्हणतात. परंतु जेव्हा हा रोग जगभर पसरतो तेव्हा त्याला पॅनडेमिक म्हंटले जाते.

जेव्हा एखाद्या रोगाला महामारी म्हणून जाहीर केले जाते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की, हा रोग लोकांमध्ये आपापसांत पसरतो. सरकार हा एकप्रकारे इशारा असतो.

एखाद्या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या किंवा संसर्ग किंवा त्यास प्रभावित देशांच्या संख्येवर आधारित हा रोग साथीचा रोग अर्थात महामारी म्हणून घोषित केला जातो. जागतिक स्तरावर एखादा रोग महामारी म्हणून घोषित करण्याचा निर्णय डब्ल्यूएचओला घ्यावा लागतो. परंतु देशाच्या स्तरावर हे निर्णय सरकार घेतं. जसे ब्लॅक फंगसच्या बाबतीत केंद्राने म्हटलयं.

महामारी ॲक्ट 1897

भारतात महामारीसाठी वेगळा कायदा आहे, ज्याला Epidemic Disease Act 1897 म्हंटले जाते. 2020 मध्ये केंद्र सरकारने यात काही बदल केले होते. हा कायदा 123 वर्षांपूर्वी 1897 साली बनविण्यात आला होता. जेव्हा भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. तेव्हा मुबंईत ब्यूबॉनिक प्लेग नावाचा साथीचा रोग पसरला होता. त्यावर मात करण्याच्या उद्देशाने ब्रिटीशांनी हा कायदा केला. धोकादायक साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आणि त्यावर चांगल्या प्रकारे मात करण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. त्याअंतर्गत तत्कालीन गव्हर्नर जनरलने स्थानिक अधिकाऱ्यांना काही विशेष अधिकार दिले.

या ॲक्टच्या माध्यमातून राज्य सरकारांना साथीच्या काळात विशेष उपाययोजना करण्याचा आणि विशेष नियम बनविण्याचा अधिकार देण्यात आले. याशिवाय राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड आकारण्यासंबंधीची तरतूद या कायद्यात करण्यात आली.

महामारी कायद्याचे एकूण चार विभाग आहेत. आवश्यकतेनुसार ते वेळोवेळी सुधारित केले जातात. कायद्याच्या महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. या कायद्याच्या कलम 2 नूसार ,जेव्हा राज्य सरकारला वाटते की त्याच्या कोणत्याही भागात धोकादायक साथीचा आजार झाला आहे किंवा होण्याची शक्यता आहे, तेव्हा जर त्यांना (राज्य सरकारला) वाटले की त्यावेळी हा कायदा हा रोग थांबवण्यासाठी पुरेसा नाही. तर काही उपाय करता येतात. अशा उपाययोजना, ज्यायोगे लोकांमध्ये सार्वजनिक माहितीद्वारे रोगाचा प्रादुर्भाव किंवा प्रसार रोखता येईल.

या कायद्याच्या सेक्शन-2 मध्येही 2 सब- सेक्शन आहेत. ज्यात नमूद केलेय की, जेव्हा जेव्हा केंद्र सरकारला वाटते की, भारतात किंवा त्यातील कोणत्याही भागात साथीचा रोग पसरलाय किंवा पसरण्याचा धोका आहे, तेव्हा रेल्वे किंवा बंदर किंवा इतर मार्गाने प्रवास करणाऱ्यांना, ज्यांच्याविषयी शंका आहे की ते साथीच्या आजाराने पीडित होऊ शकतात. त्यांना इस्पितळात किंवा तात्पुरत्या निवासात ठेवण्याचा अधिकार आहे.

महामारी रोग अधिनियम 1897 मधील कलम 3 दंड आकारण्याच्या बाबतीत आहे. ज्यानुसार, साथीच्या संदर्भात सरकारी आदेश न पाळणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत भारतीय दंड संहिता अंतर्गत शिक्षा होऊ शकते.

या कायद्याचा कलम 4 कायदेशीर संरक्षणाबद्दल आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देखील हा अॅक्ट देतो. हा कलम सरकारी अधिकाऱ्यास कायदेशीर सुरक्षा प्रदान करतो. म्हणजेच, कायद्याच्या अंमलबजावणीत जर एखादी गोष्ट उन्नीस-बीस झाली तर त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी नसेल.

महामारी रोग कायद्याचा हेतू कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखण्यासाठी अधिक आहे, जो आधीपासून पसरला आहे. या अधिनियमात महामारी किंवा आजार शब्द परिभाषित केलेला नाही. तसेच या अधिनियमात सरकारसाठी महामारीच्या काळात लागू केले जाणारे वेगवेगळ्या उपायांना कोणत्याही खास सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सरकारच्या वतीने लस आणि औषधांचे वितरण कसे करावे या विषयावर या कायद्यात कोणतीही विशेष तरतूद केलेली नाही.

ब्लॅक फंगसला महामारी घोषित केल्यास काय होईल?

हरियाणा हे पहिले राज्य आहे, ज्यांनी या संक्रमणाला महामारी म्हणून घोषित केले. हरियाणामध्ये सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 20-20 बेडचे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. रुग्णालयांना ब्लॅक फंगसची प्रकरणे वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे.

राजस्थान सरकारने ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. यामागील सरकारचे म्हणणे आहे की, या निर्णयानंतर आता या आजारावर लक्ष ठेवणे प्रभावीपणे केले जाईल, तसेच उपचारांबाबत गांभीर्यही घेतले जाईल.

त्याच बरोबर केंद्राकडून असही म्हटलयं की, ब्लॅक फंगसला साथीचा रोग जाहीर केल्यानंतर राज्यांना या आजाराच्या घटना, मृत्यू, उपचार आणि औषधे यांचा मागोवा ठेवावा लागेल. सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य केंद्रांना ब्लॅक फंगसच्या निरीक्षण, तपासणी, उपचार आणि व्यवस्थापन यासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. ब्लॅक फंगसचे सर्व प्रकार जिल्हा पातळीवरील मुख्य वैद्यकीय अधिका-यांना कळविले जातील. इंटीग्रेटेड डिजीज सर्विलांस प्रोग्रामच्या सर्विलांस सिस्टम मध्येही याची माहिती दिली जाईल.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.