अंधश्रद्धेतून मनुष्यबळी, त्यानंतर मांस शिजवून खाल्लं : केरळचं प्रकरण काय आहे..

केरळमधून एक बातमी आली. बातमी वाचल्यानंतर लोकांची डोकी सुन्न झाली. कारण अंधश्रद्धेतून एका जोडप्याने दोन महिलांचे खून केले होते. प्रकरण इतक्यावर थांबल नाही तर या जोडप्याने या दोन महिलांच्या शरीराचे तुकडे करून त्यांच मांस देखील खाल्ल होतं.ते देखील अगदी कोंबडीचं मांस शिजवावं तसं. विशेष म्हणजे हे जोडपं प्रगतशील होतं. सुधारलेलं होतं. तरिही एका मांत्रिकाच्या नादात त्यांनी इतकं सगळं कांड केलं. 

नेमकं काय आहे हे प्रकरण.. 

केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातला हा प्रकार.

माणसाचं नाव भगवलसिंह तर महिलेचं नाव लैला. हे दोघंही वृद्ध जोडपं. लैला ही भगवलसिंह यांची दूसरी पत्नी. भगवलसिंह त्यांच्या परिसरात वैद्यन नावाने प्रसिद्ध होते. मध्यमवर्गीय असणारं हे जोडपं. यातल्या भगवलसिंह यांच वय आहे ६८ तर पत्नी लैलाचं वय आहे ५९ वर्ष. दोघांची गाडी तशी उताराला आलेली. भगवलसिंह यांना जपानी हायकू फॉरमॅटमध्ये कविता करायचा नाद होता. बऱ्यापैकी स्थानिक वर्तमानपत्रात देखील त्या कविता छापून येत. ठिकठिकाणी त्यांच कौतुक देखील व्हायचं.. 

एक दिवस भगवलसिंह यांना फेसबुकवर पोस्ट दिसली.

समृद्ध जीवन मैं रुची रखनै वाले ध्यान दे.. अशा आशयाची ती पोस्ट होती. भगवलसिंह यांनी इंटरेस्ट घेवून ती माहिती पाहिली, वाचली आणि आपलं नाव, नंबर शेअर करून तो विषय सोडून देखील दिला. पण झालं अस की काही दिवसानंतर श्रीदेवी नावाच्या एका महिलेची त्यांना फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. भगवलसिंग यांनी ती अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांच बोलणं सुरू झालं. भगवलसिंग आपले शारिरिक प्रॉब्लेम त्या महिलेला सांगू लागले. काही दिवस हे चाललं आणि त्यानंतर या श्रीदेवी नावाच्या महिलेनं या सर्व कष्टातून तुम्हाला एक तांत्रिक बाहेर काढू शकतो अस सांगितलं. या तांत्रिकाचं नाव होतं रशिद. 

भगवलसिंह यांनी रशिद सोबत संपर्क केला.

रशिद त्यांना घरी येवून भेटून गेला. दांपत्य वृद्ध होतं. पण पैसा आणि शारिरिक सुख दोन्ही त्यांना हवं होतं. कायम तरुण रहावं आणि पैसे असावेत अशी दोघांची इच्छा होती. रशिदने या दोघांचा फायदा घ्यायचं ठरवलं. विश्वास संपादन करून छोट्यामोठ्या गोष्टी करायला भाग पाडल्या. दोघांनी त्या केल्या. पण रशिद आत्ता मोठ्ठा डाव टाकू लागला. 

रशिदने सर्वात पहिल्यांदा मागणी केली ती शारिरीक संबंधांची. भगवलसिंह यांना त्याने सांगितलं की तुमच्या पत्नीसोबत मला शारिरिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. ते पण तुमच्या समोरचं. तुम्ही हात जोडून उभा रहा..

रशिदने भगवलसिंह यांच्या पत्नीसोबत शारिरिक संबंध ठेवले. तेव्हा भगवलसिंह तिथेच हात जोडून उभा राहिले. हा प्रकार झाल्यानंतर रशिदच्या विकृत मनोवृत्तीने अजून पकड घेतली. आत्ता त्याने यापुढेची कल्पना सांगितली आणि ती कल्पना होती मानवी मांस खाण्याची. 

रशिदने चिरकाल युवा रहायचं असेल तर मानवी मांस खाण्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट दोघांच्या मनावर चांगली ठसवली. त्यानंतर भगवलसिंह तयार झाले. पण मुद्दा होता तो कोणाचं मानवी मांस खायचं त्यासाठी खून करणं आवश्यक होतं. 

त्यासाठी पहिली शिकार मिळाली ती लॉटरी विक्रेता महिलेची. रशीदने या महिलेला एका बीग्रेड सिनेमात काम करण्यासाठी १० लाख रुपये देण्याचं आमिष दाखवलं. १० लाख रुपये ऐकून ही महिला देखील तयार झाली. त्यासाठी तीला कोच्ची वरून एलंथरू येथे आणण्यात आलं. भगवलसिंह यांच्या घरातच तिची ८ जूनच्या रात्री हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर तिचे अंग काढून शिजवण्यात आले व तिघांनी मिळून ते खाल्ले. 

या गायब महिलेची तक्रार तिच्या मुलीने केली पण सप्टेंबर झाला तरी यासंदर्भात पोलीसांना शोध घेता आला नाही. पहिली शिकार सक्सेस झाल्याचं पाहून रशिदचा जोर वाढला व त्याने दुसरी शिकार करण्याचं नियोजन केलं. आपण पहिल्यांदा जे मानवी मांस खाल्ल त्यामुळे देवी प्रसन्न झाली नाही ही विधी पुन्हा करावी लागेल अस त्यांन सुचवलं. त्यानुसार दूसरी शिकार शोधण्यात आली. 

दूसरी महिला देखील लॉटरी तिकीट विक्रेतीच होती.

मुळची तामिळनाडूची असणारी हि महिला कोच्ची जवळच्या पोन्नरुन्नी इथे रहात होती. मागील घटनेप्रमाणेच तिला आमिष दाखवून घरी आणण्यात आलं. तिकडे महिलेच्या कुटूंबानी ती मिसिंग असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी शोधाशोध सुरू केली. CCTV कॅमेरा पाहून पोलीस रशिदचा शोध घेवू लागले.

रशिदचा शोध घेता घेता पोलीस भगवलसिंह यांच्या घरापर्यन्त पोहचले तेव्हा या दांपत्याने त्या महिलेचा देखील खून केल्याचं समजलं. अधिक चौकशी केल्यानंतर घरातच ते शव पुरून टाकल्याचं या दांपत्याने कबूल केलं. पुढील चौकशीत ते मांस खाल्याचं देखील सांगण्यात आलं. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.