एक साथीचा रोग युरोपियन देशांना आफ्रिका जिंकायला उपयोगी पडला

सध्या जगभरात कोरोना साथीने आपले पाय पसरले आहे. दररोज लाखो संक्रमितांच्या आकड्याबरोबर मृत्यूची संख्यादेखील वाढतेय. या कोरोनाचा फैलाव नेमका कशामुळे झाला, हे अजूनही संशोधनातच आहे. मात्र, माध्यमातून झळकणाऱ्या बातम्यांत वटवाघूळामुळ या विषाणूचा प्रसार झाल्याच म्हंटल गेलं.

या कोरोना साथीमुळे अनेक मोठमोठ्या देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. दरम्यान, अनेक वर्षांपूर्वी प्राण्यांमुळ होणाऱ्या एका आजारामुळे युरोपियन साम्राज्यांना आफ्रिकेत विस्तार करण्यास मोठी मदत मिळाली होती. साम्राज्यवाद जीव जात नव्हता, पण गूरढोरांच्या जीवावर ते बेततं होत. ज्याला रिंडरपेस्ट व्हायरस म्हंटल गेलं. या काळात आफ्रिकेतली 90% जनावर मारली गेली.

त्या काळात जनावर त्यांच्या उपजिविकेचे प्रमुख साधन होतं, मात्र त्या साथीच्या दरम्यान जनावर गेल्यानं लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला. शेतीवरही याचा परिणाम झाला कारण बहुतेक शेतकरी हे नांगरणीसाठी बैलांवर अवलंबून होते. आजारामुळे मेलेले बैल आणि काही अर्धमेले बैल लोक पुरु लागले.

याचा सर्वात मोठा फटका आफ्रिकेच्या टोकाशी असलेल्या वस्ती, पश्चिम आफ्रिका आणि नैऋत्य आफ्रिकेच्या भागाला बसला. आपआपसातच वाद निर्माण होऊ लागला, समाजात फूट पडली आणि निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे त्या भागातून बाहेर पडू लागले.

जनावरांच्या साथीची लाट आफ्रिकेच्या जंगलातही पसरली. वनव्यासारखा हा रोग संपूर्ण आफ्रिका खंडात पसरला.

फक्त जनावरेच नाही तर आता मनुष्यहानी देखील सुरु झाली. प्रचंड मागासलेला असल्यामुळे कोणतीही आरोग्य सुविधा आफ्रिकन देशांमध्ये उपलब्ध नव्हती. सर्वत्र हाहाकाराची परिस्थिती दिसत होती. खायला अन्न नाही, राहायला घर नाही असे दिवस कित्येकांच्या वाट्याला आले होते.

या साथीच्या रोगामुळे आफ्रिकेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा युरोपियन देशांनी घ्यायला सुरुवात केली. ज्यामुळे त्यांना युरोपियन साम्राज्य उभारणं सोपं झालं. या जनावरांच्या प्लेगचा उद्रेक होण्यापूर्वीच या देशांनी आफ्रिकेत आपल्या विस्ताराची योजना आखली होती.

बर्लिन कॉन्फरन्समध्ये आफ्रिकेच्या नकाशावर बोली

या दरम्यान 1884-1885 मध्ये बर्लिनमध्ये युरोपातल्या 14 देशांची परिषद पार पडली. ज्यात युके, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल, बेल्जियम आणि इटलीसह इतर देशांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रत्येकाने आफ्रिकेतल्या विविध भागांवर आपला दावा ठोकत त्यासाठी बोली लावली गेली.

त्याकाळी युरोप मध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. नवं नवे कारखाने उभे राहत होते. त्यासाठी त्यांना कच्चा माल हवा होता. म्हणूनच खनिजसंपत्तीने संपन्न असलेल्या आफ्रिकेवर फार पूर्वी पासून युरोपच्या देशांचा डोळा होता.

अर्थातच याचा परिणाम आफ्रिकेच्या भूखंडावर झाला. जो 1870च्या दशकात 10% युरोपियन अधिपत्याखाली होता. पण या साथीच्या आजारात 1900 पर्यंत हा भाग वाढून 90% झाला. कारण प्लेगच्या उद्रेकामुळे युरोपियनांना जमीन बळकावणं सोपं गेलं.

त्यानंतर 1890 च्या दशकाच्या सुरुवातीला इटलीने खुश्कीच्यामार्गाने इरिट्रियाममध्ये प्रवेश केला. यावेळी इथिओपियाच्या अनेक भागांमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे जवळपास 33 टक्के लोकसंख्या मारली गेली होती. आणि अशा पद्धतीनं या भागात साम्राज्यवाद निर्माण झाला. ज्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघांच्या आफ्रिकेच्या इतिहासात आहे.

तिथून पुढे जवळपास शंभर वर्षे आफ्रिकेवर युरोपियन देसहनी राज्य केलं. काहीही संबंध नसताना त्यांच्या भूमीवर महायुद्धे लढली. त्यांची प्रचंड लूट केली. वर्णद्वेष करून तिथल्या मूल लोकांना जनावरांप्रमाणे वागवलं. आज यापैकी अनेक देश जरी स्वतंत्र झाले असले तरी अप्रत्यक्षरीत्या तिथल्या कारभारावर पाश्चात्य देशांचे वर्चस्व अजूनही पाहायला मिळते.

आफ्रिकन देशातली गुलामगिरी संपली असली तरी तेव्हाच्या प्लेगमुळे वाट्याला आलेला साम्राज्यवाद संपलेला नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.