इव्हेंजेलिन अ‍ॅडम्स यांच्यामुळे अमेरिकेत ज्योतिष विद्येला विज्ञानाचा दर्जा मिळाला

साल १९१४ अमेरिकेत ज्योतिषशास्त्राला बेकादेशीर मानल जायच. अमेरिकेतील एका कोर्टात ज्योतिषशास्त्रा विरोधातील केसची सुनावणी चालू होती.

सुनावनीवेळी ज्योतिषशास्त्र सांगणाऱ्या महिलेने न्यायाधीशांना अज्ञात व्यक्तीची कुंडली बनवण्याची परवानगी मागितली. न्यायाधीशांनी एक कुंडली दिली. त्या महिलेने कुंडली पाहून भविष्य, भुतकाळ सांगायला सुरुवात केली. या कुंडलीतील व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून असेल अस सांगितल. ही गोष्ट ऐकताच न्यायाधीश आश्चर्यचकीत झाले. कारण हि माहिती त्या महिलेने बरोबर सांगितली होती.

कुंडलीतील अज्ञात व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून न्यायाधीशांचा मुलगा होता.

त्या मुलाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला होता. या कुंडलीवरुन न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल दिला. निकालात अस म्हटल की, ज्योतिषशास्त्र सांगणाऱ्या महिलेने ज्योतिषशास्त्राला विज्ञानाच्या दर्जेवर आणले आहे. या प्रकरणानंतर अमेरिकेत ज्योतिषशास्त्राला मान्यता मिळाली होती.

ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवनात होणाऱ्या त्रासांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरत अस मानल जात. आपल्या देशात तर ज्योतिषशास्त्राचा वापर केला जातो. जन्माला आल की पहिल्यांदा पत्रिका काढुन घेतात. ज्योतिषशास्त्र फक्त आपल्याच देशात नाही तर बाहेरच्या देशातही याचा वापर केला जातोय. अमेरिकेत तर एका ज्योतिष महिलेने ज्योतिषशास्त्राला कोर्टात विज्ञानाचा दर्जा दिलाय.

अमेरिकेतील या महिला ज्योतिषशास्त्र म्हणजे इव्हेंजेलिन अ‍ॅडम्स.

इव्हेंजेलिन अ‍ॅडम्स यांना अमेरिकेत महान ज्योतिषी मानल जात. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८६८ ला न्यू जर्सी येथे झाला. इव्हेंजेलिन अ‍ॅडम्स यांना तीन भाऊ होते. इव्हेंजेलिन एकदा खूप आजारी पडल्या होत्या. त्यांच्या आजाराचे निदान करण्यासाठी त्या डॉक्टर हैबर स्मिथ यांच्या संपर्कात आल्या. डॉ. हैबेर स्मिथ यांचा संस्कृत आणि हिंदू धर्माचा चांगला अभ्यास होता. ते ज्योतिष आणि विज्ञानाच्या सहाय्याने आजार शोधून काढत व लोकांना बरे करत. इव्हेंजेलिन जन्मजात ज्योतिष होणार अस इव्हेंजेलिन यांची कुंडली पाहून डॉ.हैबर स्मिथ यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितल.

हाच इव्हेंजेलिन यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

इव्हेंजेलिन यांनी डॉ.हैबर स्मिथ यांच्याकडून ज्योतिष विद्या शिकण्यास सुरुवात केली.

इव्हेंजेलिन १८९९ पर्यंत न्यू जर्सी शहरात राहिल्या. पुढ आपल्याच पत्रिकेत जस सांगितल आहे. तस त्या न्यूयॉर्क शहरात रहायला गेल्या. न्यूयॉर्कमध्ये गेल्यावर पहिल्याच दिवशी त्या एका हॉटेल मध्ये थांबल्या. हॉटेलमध्ये पहिल्याच दिवशी हॉटेलच्या मालकासोबत त्यांची भेट झाली. हॉटेल मालकांनी इव्हेंजेलिनला आपली कुंडली बघण्यास सांगितली. इव्हेंजेलिनलने त्या हॉटेल मालकाची कुंडली बघितली. हॉटेल मालकाला सांगितले की,

तुमच्यासाठी उद्याचा दिवस म्हणजे १७ मार्च १८९९ वाईट असणार. इव्हेंजेलिनलने हे सांगताच हॉटेल मालकाने ही गोष्ट चेष्टेत घेतली.

दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये सेंट पॅट्रीक डे साजरा करण्यात येत होता. यावेळी हॉटेलला अचानक आग लागली. हॉटेल पूर्ण जळून खाक झाल. या आगीत इव्हेंजेलिन अ‍ॅडम्स वाचल्या. पण त्यांच सगळ सामान जळाल. पण या प्रकरणान इव्हेंजेलिन अ‍ॅडम्स यांना शहरात चांगलीच प्रसिध्दी मिळाली होती.

सगळ्या शहरात चर्चा सुरु झाल्या इव्हेंजेलिनने भविष्य सांगुनही हॉटेल मालकाने दुर्लेक्ष केल. इव्हेंजेलिनच भविष्य खर ठरत. या घटनेनंतर न्यूयॉर्क शहरातील अनेकांनी रांगा लावल्या. इव्हेंजेलिन यांची अगोदर वेळ घ्यावी लागू लागली. आठ आठ दिवस लोक वाट बघत होती. यात इव्हेंजेलिनला बराच पैसा मिळायला लागला.

न्यूयॉर्कमधील मॅनहटन मध्ये मोठ कार्यालय सुरु केल.

अनेक मोठ मोठी लोक इव्हेंजेलिन जवळ भविष्य जाणून घेण्यासाठी यायची. इव्हेजेलिनची किर्ती वाढत होती, पण वादही निर्माण होत होते. १९१४ मध्ये त्यांना अटक झाली. कोर्टाला त्यांनी ज्योतिष विज्ञानाच्या दर्जेवर असल्याच पटवून दिल. या घटनेनंतर अमेरिकेत ज्योतिषशास्त्राला परवानगी मिळाली होती.

१९२० पर्यंत इव्हेंजेलिन ज्योतिषशास्त्रामुळे श्रीमंत झाल्या. इव्हेंजेलिन अमेरिकेतील मोठ्या पंडित बनल्या. त्यांचे ग्राहक अमेरिकेतील मोठ मोठे उद्योगपती होते. यात जेपी मॉर्गन कंपनीचे मालक, चार्ल्स शुव्याब आणि जोसेफ कॅम्पबेल यांचा समावेश होता.

जेपी मार्गत तर प्रत्येक महिन्याला इव्हेंजेलिन यांचे सल्ले घेऊनच राजकारणावर, व्यवसायावर आणि शेअर बाजारावर ग्रहांच्या हालचालींवर होणाऱ्या परिणामांवरुन निर्णय घ्यायचे. अमेरिकेतील प्रसिध्द अभिनेत्री मेरी पिफोर्डने तर इव्हेंजेलिन यांना विचारल्या शिवाय एकाही चित्रपट काम करायच्या नाहीत.

राजकारणी सुध्दा इव्हेंजेलिनचा सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. इव्हेंजेलिन अ‍ॅडम्स ची कौटुंबिक पार्श्वभूमी मोठी होती. त्यांच्या कुटुंबाने अमेरिकेला दोन राष्ट्रपती दिले होते. इव्हेंजेलिन कडून पुढचा राष्ट्रपती कोण असणार हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असायची.

इव्हेंजेलिनने राजकाणातीलही अनेक अंदाज वर्तवले होते. रिपब्लिक पार्टीचे प्रसिद्ध उमेदवार हर्बर्ट हूवर यांना निवडणुकीत लढण्यासाठी पक्ष तिकीट देणार नसल्याचा अंदाज तिने वर्तवला होता. हा अंदाज १९२० मध्ये तिने वर्तविला होता. लोकांचा यावर विश्वास बसला नव्हता. पण तिचा हा अंदाज खरा ठरला. पक्षाने वॉरेन हार्डिंग यांना आपला उमेदवार म्हणून निवडले.

त्यावेळी हार्डिंग अमेरिकेचे २९ वे अध्यक्ष बनले होते. राजकारणातील या अंदाजाने इव्हेंजेलिनची चर्चा सगळ्या अमेरिकेत झाली.

१९३१ मध्ये इव्हेंजेलिन अ‍ॅडम्स यांची अजून एक भविष्यवाणी खरी ठरली.

राजकारणातील वर्तविलेले भविष्य खरे ठरल्याने इव्हेंजेलिन यांची जगभर चर्चा होती. पुढ त्यांनी ‘अ‍ॅस्ट्रॉलॉजी फॉर एव्हरीवन’ हे पुस्तकही लिहिले. या पुस्तकात त्यांनी इंग्लडचा आठवा राजा किंग एडवर्ड एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडेल. पम ती स्त्री इंग्लडची राणी होऊ शकणार नाही अस लिहील होत.

आणि घडलही तसच १९३१ मध्ये एडवर्ड एका अमेरिकन विवाहित महिलेच्या प्रेमात पडले. इंग्लडच्या कायद्यानूसार घटस्फोटीत स्त्री राणी होऊ शकत नव्हती. त्यामुळे एडवर्ड ने तिच्याशी लग्न करण्यासाठी राजाचे पद सोडले. हा इव्हेंजेलिन यांचा अंदाज खरा ठरल्याने त्यांची चर्चा जगभर सुरु झाली.

इव्हेंजेलिन यांनी अनेक पुस्तकं लिहिली.

१९३० मध्ये अमेरिका रेडियो वर त्यांनी नागरिकांसाठी टॉक शो सुरु केला. तो शो लोकप्रिय झाला होता. त्यांच ‘युवर प्लेस इन द सन’ हे पुस्तक प्रसिध्द आहे. या पुस्तकात त्यांनी ज्योतिष शास्त्राच्या प्रभावावर लिहिले आहे.

कुंडली पाहणाऱ्या इव्हंजेलिनने कधीही स्वत: च्या लग्नाची कुंडली पाहिली नाही. त्यांचे अनेक ठिकाणी लग्न ठरलीत पण मोडलीतही तितकीच. शेवटी त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी कमी वय असणाऱ्या व्यक्तीशी त्यांनी लग्न केल.

इव्हंजेलिनने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या ठरल्या नाहीत.

इव्हेजेलिनने २९ ऑक्टोंबर १९२९ ला शेअर मार्केवर अंदाज सांगितला होता. त्यांनी सांगितले शेअर बाजार गगनाला भिडतील पण तस काहीच झाल नाही त्याच्या उलट झाल. तज्ज्ञांच्या मते त्यांना शेअर मार्केटच ज्ञान नव्हत. त्या फक्त युक्त्या लावत होत्या. यातली एखादी युक्ती खरी निघाली की इव्हेंजेलिनचे समर्थक लोकांना वाढवून सांगत होते.  एखादा अंदाज खोटा निघाला की त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचू दिल जात नव्हत.

त्यांचे समर्थक म्हणतात त्यांनी त्यांची मृत्यूची तारीख सांगितली होती ती खरी झाली. इव्हजेलियनने १९३२ मध्ये अस म्हटल होत की ती पुढचं वर्ष पाहण्यास ती नसणार. तसच घडल असल्याचा दावा तिच्या समर्थकांनी केला आहे.

इव्हेंजेलिनने अनेकांच्या मृत्यूबद्दल बोलल्या होत्या. यात इंग्लंडचा राजा एडवर्ड सातवा आणि महान ओपेरा गायक एनरिको कारुसो यांच्या निधनाच उदाहरण म्हणून समर्थक सांगत असतात. आता या सगळ्या गोष्टी किती खऱ्या आहेत हे सांगता येत नाही.

एखाद्या व्यक्तीचा जन्म आणि मृत्यूची वेळ निश्चित असते अस हिंदू धर्मग्रंथात म्हटल आहे. निवडणुका समोर आल्या की ज्योतिषांच्या दरबारात नेत्यांची गर्दी झालेली असते. आता खरच ज्योतिष भारतीय लोकांचा मुड काय आहे हे वाचू शकतात का?

हेही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.