एव्हरेडीची पितळी टॉर्च गावखेड्याच्या लोकांची मूलभूत गरज बनली होती. 

आजच्या काळात टॉर्च वापरणे म्हणजे आपल्याला खुळ्यात काढायचे लक्षणं ठरतील. पण स्मार्टफोन येण्या अगोदरच्या काळात टॉर्च मूलभूत गरज म्हणून वापरली जाण्याची गोष्ट होती. टॉर्चशिवाय चुकूनही कोणी घराबाहेर जायचं नाही. स्टेनलेस स्टीलपासून बनलेल्या या टॉर्चमधे मोठ्या आकाराच्या बॅटऱ्या बसत असायच्या. बॅटरीच्या बाबतीत एव्हरेडी ब्रँड सगळीकडे फेमस होता. एव्हरेडी ब्रॅण्डच्या टॉर्च या उत्तम क्वालिटी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या होत्या.

नवीन पिढी मोबाईलच्या संगतीत गेली आणि स्मार्टफोनला जोडूनच बॅटरी येऊ लागली त्यामुळे एव्हरेडीच्या टॉर्च या मागे पडत गेल्या नव्हे तर त्या जवळपास बंदच झाल्या. पण आज आपण या एव्हरेडी टॉर्चबद्दल जाणून घेऊया कि हि टॉर्च का पिढ्यानपिढ्या लोकप्रिय होती आणि मूलभूत गरज म्हणून याकडे बघितलं जायचं. 

एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड [ इआयआयएल ] पूर्वीची युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड हि बी. एम. खेतान ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. १९०५ सालापासून एव्हरेडी हा ब्रान्ड भारतात आला. बॅटरी, फ्लॅशलाईट, ड्राय सेल हि या कंपनीची प्रमुख उत्पादने आहेत. हि कंपनी कार्बन झिंक बॅटरी उत्पादक जगातली तिसऱ्या क्रमांकाची उत्पादक असून वर्षाला अब्जावधी युनिट्सची विक्री करते.

इआयआयएल हा भारतातील सर्वाधिक ड्राय सेल बॅटरी आणि फ्लॅशलाईट्स [ टॉर्च ] ची सर्वाधिक विक्री करणारा ब्रँड आहे.

सुरवातीला इआयआयएलने १९०५ मध्ये आपलं काम भारतात सुरु केलं. पहिल्यांदा ड्राय सेल बॅटरी अमेरिकेतून आयात केल्या गेल्या आणि देशातल्या बड्या शहरांमध्ये विकल्या गेल्या. या बॅटरी प्रामुख्याने टॉर्चमधे वापरल्या जात असे. १९३९ मध्ये कंपनीने कोलकाता मध्ये आपला पहिला बॅटरी प्लांट उभा केला. १९५२ आणि १९५८  मध्ये अनुक्रमे चेन्नई आणि लखनौमध्ये आणखी एक बॅटरी उत्पादन प्रकल्प सुरु केला.

आशियामधील सगळ्यात मोठ्या बॅटरी उत्पादक कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून इआयआयएलने नाव कमावले आहे. २००५ मध्ये कंपनीने १०० वर्धापन दिन साजरा केला. बॅटऱ्यांव्यतिरिक्त चहाचा देखील त्यांनी व्यापार केला.

मार्केटिंग मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांना दोन वर्षांसाठी ब्रँड अँबेसिडर केलं.

‘ गेट मी रेड ‘ हि त्यांची टॅगलाईन बरीच गाजली होती.

एव्हरेडीने ऍनिमेशनद्वारे आपल्या कंपनीची आणि उत्पादनांची जाहिरात केली. खरी प्रसिद्धी मात्र त्यांना टॉर्चमुळे मिळाली.

कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, नोएडा, गुडगाव आणि नवी मुंबई इथून या कंपनीची ऑपरेटिंग सुविधा आहे. हार्ड फेसिंग, ट्यूब रॉड्स, कार्बन इलेक्ट्रोडस आणि इतर काही उत्पादनेही कंपनी तयार करते. दुबई, तेहरान, जॉर्डेन, सुदान, इजिप्त अशा अनेक देशांमध्ये कंपनी विस्तारत आहे. दहा हजार लोकांना रोजगार हि कंपनी देते.

परवडणारी व टिकाऊ, पितळ किंवा ऍल्युमिनिअम टॉर्च या बऱ्याच लोकांच्या दाराच्या खुंटीवर अडकवलेल्या दिसायच्या. कमी खर्च आणि दीर्घकाळ चालणारी टॉर्च यामुळे एव्हरेडी लोकप्रियतेत कधीही मागे पडली नाही. एव्हरेडीची पितळी टॉर्च चांगलीच गाजली होती. गावखेड्याच्या लोकांची ती एक महत्वाची वस्तू बनली होती.

शहरी आणि ग्रामीण भागातील भारतीय कुटुंबात एक विश्वासू आणि पिढ्यांपिढ्यांचा साथीदार म्हणून हि टॉर्च होती. काळानुसार आपल्या ब्रँडमध्ये परिवर्तन करत हा ब्रँड मॉडर्न होत गेला. ग्राहकांचं समाधान होईल असे ब्रँड एव्हरेडीने आणले. अल्युमिनियम टॉर्च तिला स्लाईड स्विच होता आणि हि टॉर्च सुरवातीला केवळ सिल्व्हर रंगात मिळायची पण हळूहळू ती वेगवेगळ्या रंगातही बाजारात उपलब्ध होऊ लागली. 

स्मार्टफोनच्या काळात हि टॉर्च आता लुप्त झाली असली तरी अजूनही गावखेड्यात हि बॅटरी वापरली जाते. फोनला बॅटरी अटॅच असल्याने एकेकाळची अल्युमिनिअमची टॉर्च आता मागे पडली आहे. पण एव्हरेडीच्या बॅटरी या अजूनही मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या ओरामनावर विकल्या जातात.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.