जॉर्ज ते जॉनी प्रत्येक सेलिब्रेटी हायवे गोमंतकला जेवायला जातोच

प्रत्येक प्रदेशाची आपली खाद्य संस्कृती आहे. नागपूरला गेलं तर सावजी मटण, मराठवाड्यात गेले की काळा मसाला. त्याच प्रमाणे पोर्तुगीज येण्यापूर्वी गोव्याची स्वतःची खाद्य संस्कृती होती. मात्र, पोर्तुगीजांच आक्रमण झाल आणि त्याचा परिमाण त्यांच्या खाद्य संस्कृतीवर झाला. 

गोव्यात व्हीनेगर सारखे पदार्थ वापरून मासे, मटण बनविण्यात येऊ लागले. यामुळे गोमंतक, मालवणी पदार्थाला अस्सल चव राहिली नाही अशी अनेकांची ओरड असते. मात्र, ठाण्यातील एक कोकणी खानावळ गेली ३२ वर्ष गोमंतक पद्धतीने जेवण तयार करत असून सामान्यांबरोबरच नेते, अभिनेत्यांच्या पसंतीत उतरत आहे. 

अस्सल मालवणी पद्धतीने जेवण देणाऱ्या हायवे गोमंतक हॉटेलची ही कहाणी. 

आजूबाजूला नारळाची झाडं आणि मधोमध एक झोपडी. गोव्यातील एखाद्या बिच वर असणाऱ्या हॉटेल  सारखे त्याला रूप देऊन बांद्रयातील हायवे गोमंतक’ हॉटेल सुरू करण्यात आले. ती तारीख होती ५ सप्टेंबर १९९१. त्याचे मालक आहेत रमेश पोतनीस. ते मूळचे गोव्यातील. 

हायवे गोमंतक सुरु होऊन आज ३२ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. मात्र, हॉटेलच्या जाहिरातीसाठी आज पर्यंत एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. एकदम साध्या पद्धतीचं इनटेरियर असणाऱ्या या हॉटेलचे रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, श्रेयस तळपदे, जॉनी लीवर बरोबर इतरही अभिनेते फॅन आहेत. 

 जॉर्ज फर्नांडिस, मंगेश पाडगावर, सदानंद वर्दे, व.पु. काळे सारखे दिग्गज येथे जेवायला येत.    

केवळ माऊथ पब्लिसीटीमुळेच हायवे गोमंतक फेमस आहे. 

मग तुम्ही म्हणाल हॉटेल जाहिरातीवर एकही रुपया खर्च न करता मोठे – मोठे नेते, अभिनेते  हायवे गोमंतकचे फॅन कशे झाले. असा प्रश्न पडल्याशिवाय राहणारच नाही. त्याचं एकच कारण सांगता येईल ते म्हणजे इथं मिळणार गोमंतक स्टाईलचे चविष्टय जेवण.

गोमंतक म्हणजे गोवा रिजन मध्ये मिळणारे चविष्ट पदार्थ. पोर्तुगीज येण्यापूर्वी गोव्याची स्वतःची खाद्य संस्कृती ती म्हणजे गोमंतक. आता बऱ्याच गोव्यातील हॉटेल, रेस्टोरंट मध्ये पोर्तुगीज पद्धतीने जेवण बनवले जाते. गोमंतक चव हरविली आहे. हायवे गोमंतक मध्ये ती चव मिळत असल्याने इथे दर्दी खवय्ये जमतात.

इथं मिळणारी फिश करी, मटण वडा कॉम्बो, बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, हलवा फ्राय खूप प्रसिद्ध आहे. यासोबत तांदळाच्या पिठाची भाकरी दिली जाते. 

ज्या दिवसापासून हे हॉटेल सुरु झालं, त्यादिवशी पासून एकदाही रिकामं टेबल राहीलं असं झालं नसल्याचे हॉटेलचे मालक रमेश पोतनीस सांगतात. युट्युबर, नावाजलेले फूडब्लॉगर सुद्धा हायवे गोमंतकची तेवढीच तारीफ करताना दिसतात. 

 गोमंतक पद्धतीच्या जेवणाला चव येण्याचे कारण म्हणजे ते बनवतांना कोकम, कैरी, चिंच हे आंबट पदार्थ वापरण्यात येतात. तर गोव्याच्या पद्धतीने बनविण्यात येणारे   पदार्थ फक्त व्हिनेगर टाकून बनविले जाते.

‘हायवे गोमंतक’ मध्ये गोमंतक पद्धतीने गेली ३० वर्ष जेवण बनविले जाते. 

हायवे गोमंतकचं सगळं यश रमेश पोतनीस आपल्या बायकोला म्हणजेच शशिकला यांना देतात. रमेश पोतनीस सांगतात की, शशिकला यांच्या आई मोहिनी यांची गोव्यातील मडगाव मध्ये खाद्यपदार्थांची हातगाडी होती. तिथे गोमंतक पद्धतीने बनवलेले मासे मिळायचे. जे की गोव्यात मिळणारे पोर्तुगीज पद्धतीपेक्षा वेगळे होते. तेव्हा शशिकला केवळ १२ वर्षांच्या होत्या. 

शशिकला यांनी मुंबईत आल्यावर आपल्या आई प्रमाणे, गोमंतक पद्धतीने जेवण बनवायला लागल्या. हे  खाणारे त्यांच कौतुक करत. त्यामुळे रमेश पोतनीस यांच्या लक्षात आले की, शशिकला यांची जेवण बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि त्याला वेगळी चव आहे. 

त्यानंतर रमेश पोतनीस आणि शशिकला पोतनीस यांनी हायवे गोमंतक सुरु केले, गोमंतक पद्धतीने जेवण देणारे हायवे शेजारील हॉटेल त्यामुळे त्याचे नाव हायवे गोमंतक ठेवण्यात आले. महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी जवळ, गांधी नगर, वांद्रे ईस्ट इथं हे हॉटेल आहे.

इथं मिळणारे मासे, चिकन आणि मटण हे फ्रेश असतात. आदल्या दिवशी आणून मग बनवले असे होत नाही. एखाद्या दिवशी बाजारात मासा मिळाला नाही तर त्यादिवशी हि डिश मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले जाते. फ्रिज मध्ये ठेऊन नंतर तो मासा शिवजवण्याची पद्धत हायवे गोमंतक मध्ये नाही. केवळ ताजे मासेच शिवजले जातात. 

गेली अनेक वर्ष शशिकला पोतनीस स्वतः हे फिश मार्केट मधून आणत. त्यांची सून सायली पोतनीस आता मार्केट मधून ताजे मासे आणायचे काम करते. शशिकला या आजही रोज सकाळी ७ वाजल्यापासून मसाला तयार करण्याच्या कामाला लागतात. आता त्यांचं वय ७६ आहे.  रमेश पोतनीस यांची मुलं  प्रवल आणि विशाल हायवे गोमंतक, त्याची वेबसाईट, सोशल मीडिया हे सगळं काम पाहतात. 

आताच्या हॉटेल मध्ये चवी पेक्षा इंटेरियर कसं आहे याकडे लक्ष दिलं जात. मात्र, हायवे गोमंतक मधील इंटेरियर एकदम बेसिक आहे. ना एसी आहे. ना भारी कटलरी. अस्सल पद्धतीची चव हीच तिथली खासियत बनलीय.

 हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.