कोरोना जगातून जायचं नाव घेत नाहीये, त्यात भर म्हणून मेंदू खाणाऱ्या अमीबानं टेन्शन वाढवलंय…

डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला पेशंट आढळला. २०२० च्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत हा व्हायरस जगातील अनेक देशात पसरला. तसाच तो भारतातही आला.  २४ मार्च रोजी भारतात लॉकडाऊन लावण्यात आलं. त्यानंतर बराच काळ जगातले अनेक देश लॉकडाऊन मध्ये होते.

तेव्हापासून आतापर्यंत या कोरोनाच्या नावानं जगभरातले सगळेच लोक घाबरतात.

त्यात २०२२ संपता संपता झोंबी व्हायरसनंही डोकेदुखी वाढवली. त्यात आता एक विचित्र अमीबाची केस समोर आलीये. ही केस खरंतर साऊथ कोरियामध्ये घडली असली तरी. एखादा रोग, इंफेक्शन किंवा व्हायरस जगभरात पसरायला फार वेळ लागत नाही हे आपल्याला कोरोनानंच दाखवून दिलंय. त्यामुळे या अमीबा कडे दुर्लक्ष न करता काळजी घ्यायला हवी.

हा अमीबा काय करतो तर, थेट माणसाचा मेंदू खातो!

अमीबा मेंदू खातो म्हणजे काय तर, तो मेंदूच्या पेशी खातो. मेंदुच्या पेशींना खाल्यामुळे माणसाचं शरीरावरचं नियंत्रण हळू हळू कमी होऊ लागतं. त्यामुळे, हा अमीबा अतिशय धोकादायक आहे.

साऊथ कोरियामधल्या एका पन्नाशीतल्या माणसाचा या व्हायरसनं मृत्यू झालाय. खरंतर थायलंडवरून परत आल्यानंतर ही घटना घडली आहे. थायलंडहून परत आल्यानंतर त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत होतं. म्हणजे डोकेदुखी, ताप, उलट्या, तोतरं बोलणं, मान ताठ होणं असा त्रास होत होता.

त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तरीही त्याचा जीव वाचू शकला नाही. ‘नेग्लेरिया फावलेरी’ हे या इंफेक्शनचं नाव आहे, ज्याला आपण सामान्य भाषेत ब्रेन इटींग अमीबा असं म्हणतो.

अमीबा हा एक असा जीव आहे की ज्याच्या शरीराला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. सायंटिफीक भाषेत अमीहाला  कोशिकीय मुक्त जीव असं म्हणतात. त्यामुळे पाण्यासारख्या वातावरणात अमीबा मुक्तपणे  फिरू शकतो आणि इतर जीवाणू किंवा मृत जीव खाऊन अमीबा जगतो.

कोरोनाप्रमाणे झपाट्याने प्रसार होणार नाही.

त्याचं असंय की, हा अमीबा कोरोनासारखा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे किंवा हवेतून पसरत नाही. हवेतून पसरत नसल्यामुळे याचा प्रसार हा कोरोनाच्या तुलनेत कमी वेगाने होईल असा अंदाज वर्तवला जातोय.

माणसाच्या मेंदूपर्यंत नेमका कश्याप्रकारे पोहोचतो?

हा अमीबा मुख्यत: पाण्यात आढळतो आणि पाण्यातूनच माणसाच्या शरीरातही शिरतो. अस्वच्छ स्विमींग पूल, अस्वच्छ नदी, व्यवस्थित बांधकाम न झालेला पूल, तलाव इथे हा अमीबा असू शकतो. अश्या ठिकाणी अंघोळ करताना किंवा मग पोहताना हा अमीबा शरिरात शिरतो. शरिरात शिरण्यासाठी हा अमीबा माणसाच्या नाकाचा वापर करतो आणि मग मेंदू खायला सुरूवात करतो.

लक्षणं काय आहेत ते पाहुया…

हा अमीबा नाकावाटे शरिरात शिरला तर, साधारण ५ दिवसांनी याची प्राथमिक लक्षणं दिसायला लागतात. प्राथमिक लक्षणांमध्ये डोकं दुखणं, ताप येणं, अस्वस्थ वाटणं, मळमळ होणं ही लक्षणं आहेत.तर, ५ दिवसांनंतर मग, स्पष्ट बोलता न येणं, आजुबाजूच्या परिस्थितीची जाणीव न होणं, आपल्या हालचालींवर ताबा न राहणं ही लक्षणं दिसतात.

साधारण ही लक्षणं दिसायला लागली की पाच एक दिवसांच्या आत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

या अमीबाच्या इन्फेक्शनवर इलाज काय आहे?

खरंतर हा अमीबा शरिरात शिरल्यावर त्याचं इंफेक्शन इतक्या वेगानं पसरतं की, त्यावर इलाज करण्यासाठी डॉक्टरांना फार वेळ मिळत नाही. आजवर तरी या अमीबावर काही इलाज किंवा औषध तयार झालेलं नाहीये.या अमीबावर काय इलाज करता येईल यावर संशोधन सुरू आहे.

सध्यातरी इंफेक्शन झाल्यावर अँटीबायोटीक्स, अँँटीफँगल आणि अँटीपॅरासिटीक औषधं दिली जातायत. पण, ही औषधं या इंफेक्शनवरचा इलाज नाहीये हे ही खरं.

काळजी काय घ्यायची तर, सध्यातरी काही ठोस औषधं  तयार झालेली नसल्यानं अस्वच्छ पाण्याच्या संपर्कात येणं टाळणं हाच एक उपाय आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.