आमदारकी, खासदारकी भूषवलेले ते सध्या विद्यापीठाच्या हॉस्टेलवर राहून PhD पुर्ण करतायत.

वयाच्या ८१ वर्षी दोन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीने काय करायला हवं अस तुम्हाला वाटतं. त्याने एकतर पुढच्याची जुळणी लावण्याच्या हिशोबाने वारस लावण्यासाठी कागदपत्रांची जुळणी पहिल्यांदा करायला हवी. त्यानंतर आपल्या मतदार संघात आपल्या मुलाला स्ट्रॉंग करण्यासाठी डावपेच आखायला हवेत. पैशाच योग्य वाटप करायला हवं आणि तरिही कुठल्यातरी शासकिय पदावर राहून जेष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक म्हणून दिवसाला सरासरी चार कार्यक्रम तरी करायला हवेत. 

पण हि गोष्ट जरा हटके असलेल्या नेत्याची.

हे जेष्ठ नेते दोन वेळा आमदार राहिले आहेत. एक वेळा खासदार देखील झाले. या काळात त्यांनी नेमकं काय केलं ते पुढे तुम्हाला सांगण्यात येईलच पण आत्ता ते प्रसिद्धीत का आलेत ते पहिला सांगतो, तर हे ८१ वर्षीय जेष्ठ नेते सध्या विद्यापीठातल्या १० बाय १० च्या खोलीत राहतात. आपल्यापेक्षा निम्याहून लहान असणाऱ्या मुलांबरोबर Phd च मार्गदर्शन करतात. विद्यापीठातच जेवतात, तिथेच झोपतात आणि तिथेच राहून दिवसरात्र अभ्यास करत असतात. 

हि गोष्ट आरिसाच्या नारायण साहू यांची. 

नारायण साहू ओरिसातल्या पालहार विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. ते १९७१ आणि १९७४ साली असे सलग दोन वेळा आमदार राहिले. या काळात जनतेचे प्रश्न वगैरे त्यांनी सोडवलेच पण महत्वाच काम त्यांनी केल ते म्हणजे आपल्या क्षेत्रात त्यांनी प्राथमिक शिक्षणाची एक घडी बसवली. स्वत: नारायण साहू हे विद्यार्थी संघटनेशी निगडीत होते. त्यांना शिक्षणाच महत्व तर माहितच होतच पण ओरिसा सारख्या राज्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे याची त्यांना संपुर्ण जाणिव होती. या दोन टर्मच्या आमदारकीमध्ये त्यांनी आपल्या भागामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांची स्थापना केली.

विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वत:ची संस्था काढली नाही तर सरकारी शाळा उभा करण्यावर भर दिला. 

त्यांच्या या कामाचा मोबदला म्हणून जनतेनं त्यांना १९८० साली देवघर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत पाठवलं. नारायण साहू आत्ता खासदार झाले. त्यांनी आपलं काम अधिक उत्साहाने करण्यास सुरवात केली. त्यांच्या राजकिय भूमिकेबद्दल बोलायचं झाल्याच ते कॉंग्रेसचे होते आणि कॉंग्रेसी विचारांना मी आजन्म प्रामाणिक राहिलं अस उत्तर ते देत. त्यांच्या याच विचारांमुळे पक्ष व पक्षाच्या बाहेरील लोक सुद्धा त्यांचा सन्मान करत असत. बीजू पटनाईक यांचे जवळचे मित्र अशी वेगळी ओळख देखील त्यांना होती. 

अचानकपणे १९८४ साली त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यायचं ठरवलं, त्याच कारण विचारल्यानंतर ते म्हणतात. राजकारणात भ्रष्ट्राचार वाढण्याचा तो काळ होता. या काळात राजकारणातून पैसा मिळू शकतो याची जाणिव लोकांना झाली मी लढलेल्या तिन्ही निवडणुकांचा खर्च एकत्रीत केला तरी ती रक्कम लाख रुपये होवू शकणार नाही पण हळुहळु लोकांना राजकिय पद हे पैसा मिळवण्यासाठी महत्वाच वाटू लागलं म्हणूनच मी राजकिय संन्यास घेण्याचा निश्चय केला आणि तो लगेच अंमलात देखील आणला. 

२०११ साली त्यांनी पदवीतर शिक्षण घेतलं. त्यावेळी त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली होती. त्यानंतर उत्कल विद्यापीठात त्यांनी एम.फिलच शिक्षण पुर्ण केलं. आणि फेब्रुवारी २०१६ साली त्यांनी विद्यापीठाच्या Phd अभ्यासक्रमासाठी अर्ज दाखल केला. आज ते उत्कल विद्यापीठातच डॉक्टरेट पुर्ण करण्याच्या मार्गाला लागले आहेत. त्यांचा Phd चा विषय जन्ननाथ दास यांचे श्रीमतभागवत दर्शन : एक सिद्घांन्तिक अध्ययन असा आहे. लवकरच ते आपली डॉक्टरेट पुर्ण देखील करतील. 

बाकी आपल्याकडचे जेष्ठ सरपंच देखील काय करतात हे आपणास वेगळ सांगण्याची गरज नाही, छोटीसी आशा टाईप आपल्या आजूबाजूला असा कोणता नेता, व्यक्ती असेल तर निश्चितच आम्हाला [email protected] वरती संपर्क करा. 

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.