पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खानवर गोळीबार झालाय, नेमकं का प्रकरण आहे?

अल्पमतात सरकार आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एप्रिल महिन्यात पायउतार व्हावे लागले होते. पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी १८ ऑगस्ट २०१८ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यांचा कार्यकाळ ३ वर्षं आणि ७ महिने चालला.

यानंतर इम्रान खान यांनी निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी या मागणीसाठी रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली इस्लामाबाद येथे जाणार होती. त्यापूर्वीच्या गुजरांवाला येथे इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला.

इम्रान खान हे कंटेनवर उभे होते.  यावेळी मारेकऱ्यांनी कंटेनर खालून त्यांना गोळी मारली. या मारेकऱ्याने अनेक गोळ्या चालवल्याचे सांगितले जात आहे. यात इम्रान खान यांच्या बरोबर त्यांच्या पक्षातील काही नेते जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून झूबंड उडाली होती.  

इम्रान खान यांच्या पायावर गोळी लागली आहे. त्यानंतर त्यांना बुलेटफ्रुफ कार मधून हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. 

पाकिस्तानच्या जिओ न्यूज नुसार, इमरान खान यांची रॅली अल्लाहवाल चौकात आली असतांना त्यांच्यावर हल्ला झाला. यावेळी तिथे जमलेल्या लोंकाना काही कळायच्या आताच झुंबड उडाली होती. हल्लेखोर आधीपासूनच रॅलीची वाट पाहत उभे होते.

रॅली जवळ येताच हल्लेखोर इम्रान खान हे ज्या कंटेनवर होते त्याच्यावर खालून गोळीबार केला.तिथे जमलेल्या लोंकाना कळायच्या आताच हल्लेखोराने गोळीबार केला. हल्लेखोरानी खालून गोळीबार केल्याने इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली. यानंतर खान यांना  कंटेनवरून खाली उतरविण्यात आले आणि बुलेटफ्रुफ कार मधून हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. त्यांच्या सोबत पीटीआयचे इतर नेते फवाद जखमी झाले आहे. 

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली आहे. रविवारी ही रॅली पाकिसनची राजधानी इस्लामाबाद येथे पोहचणार आहे. त्यापूर्वीच इम्रान खान यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. आजचा रॅलीचा ७ वा दिवस होता.  

इम्रान खान यांच्यावर २ हल्लेखोरांनी रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केला. यातील एका हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा हल्लेखोर पोलिसांच्या गोळीबारात मारला गेल्याचे सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव नवीद असल्याचे सांगितले जात आहे. 

यामुळे २००७ साली माजी पंतप्रधान बेनिजीर भुट्टो यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याची आठवण काढण्यात येत आहे. अशाच एका हल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली होती. पाकिस्तान मधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इमरान खान यांना मोठी दुखापत झालेली नाही. 

एप्रिल महिन्यात इमरान खान यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच असं सांगितलं जातं की, पाकिस्तानी लष्कराने पाठिंबा काढून घेल्याने  इमरान खान यांचे सरकार पडले होते.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करून निषेध व्यक्त केला

 

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करून इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या घटनेचा तातडीने अहवाल देण्याचे निर्देश मी गृहमंत्र्यांना दिले आहेत.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.