चीनच्या राष्ट्राध्यक्षांना नजरकैदैत ठेवलय, राडा सुरूय पण बातम्या नाहीत, नेमकं काय चाललय.. 

 

ट्विटरवर #XiJinping ट्रेण्डवर आहे. भारतातच नाही तर जगभर ट्रेण्ड सुरू आहे. पण माध्यमांमध्ये याबद्दल कोणतीच बातमी नाही.

जो हॅशटॅग ट्रेण्ड करतोय त्याच्यासोबत सांगण्यात येतय की चीनच्या राष्ट्राध्यक्षांना नजरकैदेत ठेवण्यात आलय तर लष्कराने सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे.. 

नेमकं चाललय काय. 

सुब्रह्मण्यम स्वामींनी देखील याबाबत सकाळी ट्विट केलं. या ट्विटमध्ये ते म्हणालेत की चीनप्रकरणा एक अफवा पसरली आहे. शी जिंगपिंग यांना नजरकैदेत डांबण्यात आलं आहे काय?

जिंगपिंग समरकंदच्या दौऱ्यावर होते तेव्हा चिनच्या साम्यवादी पक्षाच्या नेत्यांनी त्यांची लष्करप्रमुख पदावरून हकालपट्टी केली. तसेच ते विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं.. 

इतर ट्विटमधून सांगण्यात येतय की चीनमध्ये सत्तांतर झालं आहे. पिपल्स लिबरेशन आर्मीने शी जिंगपिंग यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हाकलून सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे तर ली कियाओमिंग यांना राष्ट्राध्यक्ष केलं आहे. 

दूसरीकडे चीनला जाणारे 80 टक्के विमाने कॅन्सल झाल्याच्या देखील अफवा आहेत. 

बातम्या का नाहीत 

चीन संदर्भात वृत्त येत नाही कारण अशी कोणतिही अधिकृत माहिती चिनच्या माध्यमांकडून देण्यात आलेली नाही.

अधिकृत माहिती नसल्याने खरं की खोटं हे लोकांना समजत नाही. दूसरीकडे अशा मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असतील तर हे खोटं आहे हे देखील चीनच्या अधिकृत माध्यमांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही बातमी व्हायरल होत आहे पण त्याला अधिकृत दूजोरा कोणीच दिलेला नाही.. 

अशा प्रकारची अफवा पसरण्याची पार्श्वभूमी काय आहे..

चीनच्या मंत्र्यांना लाचखोरीबाबत मृत्यूदंड सुनावण्यात आल्यानंतर या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या आहे. जीनचे सार्वजनिक सुरक्षा विभागाचे माजी उपमंत्री सून लिजून यांनी आपल्या २० वर्षाच्या कालावधीत ७०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचे आरोप होते. त्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. २०१८ साली हा ठपका ठेवून कायदेशीर कारवाईस सुरवात झाली.  

अद्याप अधिकृत माहिती समोर न आल्याने या गोष्टी अफवाच असल्याचं दिसत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.