देवेंद्र फडणवीस व अजित पवार गेल्या १५ दिवसात कोणाकोणाला भेटलेत, ही यादी वाचा..
दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी आली. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच ट्विट करुन याबाबत माहिती दिली. दूसरीकडे गेल्या चार दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्याच्या बातम्या येत होत्या.
आज सकाळी अजित पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी आली व त्याचसोबत अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी वेगवेगळ्या वृत्तवाहिनींवरुन प्रसारित करण्यात आली.
साधारणं कोणताही नेता कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्यासोबत संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंन्टाईन होण्याचे तसेच कोरोना तपासणी करण्याचे आवाहन करतो.
देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापूर्वीचे पंधरा दिवस फडणवीस कोणाकोणाला भेटले. त्यांचा दौरा कसा कसा होता, याबाबत एक झलक टाकूया…
८ ऑक्टोंबर रोजी मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हजर होते. या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन यांच्यासह प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. यानंतर १० ऑक्टोंबरच्या दरम्यान फडणवीस यांनी अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावले. केंद्रीय चुनाव समितीच्या या बैठकीत फडणवीस यांच्यासोबत जे.पी. नड्डा, राजनाथ सिंग, शहानवाज हुसैन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतरच्या दरम्यान फडणवीस यांचा बिहार दौरा सुरू झाला. पक्षाचे मोठमोठे नेते मान्यवर ते तळागाळातले कार्यकर्ते असा सर्वांसोबत त्यांचा दांडगा संपर्क सुरू राहिला. १३ ऑक्टोंबरच्या दरम्यान फडणवीस प्रवरानगरला होते. इथे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह भाजपचे मान्यवर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानिमित्त उपस्थित होते.
पंतप्रधानांनी ऑनलाईन माध्यमातून पुस्तकाचे प्रकाशन केले. याच दरम्यान जामनेर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गिरीश महाजन, खा. उन्मेश पाटील, सुभाष भामरे, रक्षा खडसे उपस्थित होते.
१४ ऑक्टोंबरला फडणवीस बिहारमध्ये होते. मधुबनी येथून त्यांनी सभेत दमदार भाषण केले. दूसऱ्या दिवशी सितामढी येथे सभा घेण्यात आली. तुफान गर्दीत अनेकांच्या संपर्कात हा कार्यक्रम चालू होता. त्यानंतर १६ ऑक्टोंबरला गोरियाकोठी येथे सभा घेण्यात आली. १७ तारखेला मुंगेर येथे सभा घेण्यात आली. १८ तारखेला गया करुन फडणवीसांनी बिहारचा दौरा आटोपला. राज्यात अतिवृष्टी झाल्याने ते परतल्याचे सांगण्यात आले.
या चार दिवसांमध्ये बिहारच्या अनेक सभा, पत्रकार परिषदा, मान्यवर नेत्यांसोबत बैठका असा भरगच्च कार्यक्रम केल्यानंतर ते महाराष्ट्रात परतले आणि
१९ ऑक्टोंबर पासून त्यांनी आपला शेतकरी दौरा बारामती येथून सुरू केला. १९ तारखेलाच ते ओढ्यातून चालत जात असतानाचे फोटो व्हायरल झाले होते. दौंड, इंदापूर, केतकी निमगाव असा दौरा आटपून फडणवीस सोलापूर जिल्ह्यात गेले. सोलापूर जिल्ह्यातून उस्मानाबाद असा दौरा होता. या दौऱ्यात ठिकठिकाणचे कार्यकर्ते, स्थानिक नेते, पत्रकार व शेतकरी असा दौरा होता. उदाहरणादाखल इथे एक फोटो देण्यात येत आहे.
यामध्ये हा दौरा किती भरगच्च होता याची कल्पना आपणास येईल. यानंतर लातूर जिल्हा करून फडणवीस बीड जिल्हात आले. इथल्या कार्यक्रमता त्यांच्यासोबत पंकजा मुंडे देखील होत्या. याच दरम्यान परभणी व हिंगोली जिल्ह्यांचा देखील दौरा झाला. त्यानंतर औरंगाबादमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा आटपून फडणवीस पुन्हा बिहारला गेले व त्यानंतर फडणवीस यांना कोरोना झाल्याची बातमी आली.
आत्ता अजित पवार यांचा गेल्या १५ दिवसांमधील कार्यक्रम कसा होता हे पाहुया.
साधारण १४ ऑक्टोंबर रोजी मंत्रालयातील दालनात अजित पवारांमार्फत अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रशासकिय अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या सोबत मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. १६ ऑक्टोंबरला सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिती पवार चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत रुग्णावहिकांचे अनावरण करण्यात आले.
त्यानंतर पुण्यातील विधानभवन येथे जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकिय अधिकाऱ्यांच्यासोबत कोविड विषाणू निर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. १६ ऑक्टोंबरला ते मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित साई स्पंदन हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले.
त्यानंतर पुण्यातील व्हिव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये पुण्याच्या महापौर यांच्या उपस्थित ते बैठकीस हजर होते. यामध्ये पुण्यातील प्रशासकिय वर्ग देखील सहभागी झाला होता. यानंतर पुण्यातील माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसंच पुणे महानगर परिवहन महामंडळ व सामाजिक कार्यगट यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येणाऱ्या ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ या अभियानाचा त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
१७ ऑक्टोंबर रोजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची त्यांनी बारामती येथे भेट घेतली. त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या. कुसोली, कासेगाव या गावांना भेटी देताना त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी होते.
सोलापूर येथील बैठकीत त्यांच्यासोबत आ. दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने इत्यादीजण उपस्थित होते.
त्यानंतर मात्र काही दिवसातच अजितदादांची तब्येत खालावल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ते स्वत: क्वारंन्टाईन झाले.
या दरम्यान हे दोन्ही नेते सक्रीय राहिले. विशेषत: फडणवीस यांचा दौरा बराच मोठा राहिला.
हे ही वाच भिडू
- शेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत कोणी दिली..? ठाकरे, फडणवीस की राज्यपाल..
- फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपमधील OBC नेत्यांचे काय झाले ?
- फडणवीसांनी केलेल मिर्ची बगळामुखी यज्ञ मिर्झाराजा जयसिंगाने देखील केले होते