एक काळ होता जेव्हा फाहिम मचमचला सगळा भेंडी बाजार टरकुन असायचा….

मुंबईतल्या एखाद्या भागात भाईगिरी चालायची तिथल्या कामाच्या लोकांना आपल्या टोळीत जोडण्याचं काम ‘डी कंपनी’ अर्थात दाऊद इब्राहिम करत होता. भारतातलं आपलं प्रस्थ वाढवण्यासाठी जे काही काळे धंदे करावे लागतील ते सगळे तो करत होता.

गँगवॉर आणि पडणारे खून याने मुंबईत ढवळून निघत होती, सामान्य माणसं जीव मुठीत घेऊन वावरत होती. याच डी कंपनीमध्ये एकजण असा गडी होता ज्याला सगळा भेंडी बाजार वचकून राहायचा. त्याबद्दलचा हा किस्सा.

दक्षिण मुंबईच्या भेंडी बाजाराच्या परिसरात पेरू लेन भागात एक साधा मुलगा राहत होता नाव होतं फाहिम मचमच. एका माध्यमिक शाळेत शिकत असताना त्याला चोऱ्या करायचा नाद लागला. मग शाळा सुटली ती कायमची आणि कायमचाच नाद लागला तो म्हणजे गुन्हेगारीचा. भेंडी बाजारात आणि दक्षिण मुंबईत फाहिम मचमचने छोटेमोठे गुन्हे करायला सुरुवात केली. त्याच्या दहशतीच्या चर्चा दूरवर झडू लागल्या आणि त्या दाऊद इब्राहिमच्या कानावर जाऊ लागल्या.

अंडरवर्ल्डमध्ये फाहिम मचमचचं नाव गाजु लागलं होतं. भेंडी बाजारात त्याने खंडणी वसूल करण्याची हद्दचं केली होती. सामान्य दुकानदार लोकांना तो अक्षरशः लुटायचा. त्याच्या गुन्हेगारी करियरची खासियत जाऊन पोहचली दाऊदचा महत्वाचा माणूस असलेल्या छोटा शकीलच्या कानावर. छोटा शकिलने फाहिम मचमचला सोबत घेतलं आणि डी कंपनी अजून स्ट्रॉंग केली.

याच फाहिम मचमचने दाऊदच्या टोळीत आपली जागा मजबूत केली आणि आपलं नाव बदलून रफिकभाई असं केलं.

 रफिकभाई या नावाने तो बॉलिवूडमध्ये घुसला आणि आपल्या खोट्या नावाने बॉलिवुड सेलिब्रिटी लोकांना धमक्या देऊ लागला, पैसे मागू लागला त्याच्या दहशतीच्या धाकाने लोकं पैसे मोजू लागले.

मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यात तो सामील असल्याच्या चर्चा झडू लागल्या होत्या.

जबरदस्तीने खंडणी उकळणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांखाली फाहिम मचमचला पोलिसांनी 1995 साली अटक केली. एकदा तर तो एअरपोर्ट वरून पळून जाताना पोलिसांना सापडला आणि त्याला पुन्हा जेलात डांबले. पण जामिनावर त्याची सुटका झाली. तो पुन्हा दुबईला फरार झाला आणि तिथल्या आतंकवाद गोष्टी पसरवणाऱ्या गोष्टीत व्यस्त झाला. तब्बल 2 दशकं तो मुंबई पोलिसांनी गुंगारा देत राहिला.

29 ऑगस्ट 2021 रोजी करोनाच्या साथीत फाहिम मचमच मरण पावला, दाऊदचा सगळ्यात महत्वाचा माणूस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. त्याच्या जाण्याने मुंबईतली भेंडी बाजारात असणारी त्याची दहशत कायमची संपली.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.