‘या’ तीन हत्या झाल्या आणि व्हाट्स ऍप ची सेटिंग कायमची बदलण्यात आली.

फेसबुक हा लोकशाहीचा ५ वा स्तंभ असून सोशल मीडियामुळेच जनतेच्या हाती सत्ता आलीय !

थांबा थांबा असं मी नाही म्हणतंय तर मार्क झुकेरबर्ग बोलले होते मागच्या दोन वर्षांपूर्वी..त्यांचंही खरंय म्हणा कारण जसं सोशल मिडिया आलं आणि लोकांची मतं-मतांतरे बदलायला लागली…

फेसबुक आलं आणि लोकांना आता स्वतःचे विचार मांडण्याची कसलीही भीती आणि संकोच वाटत नाही. प्रत्येक सोशल मिडिया युजर जिथल्या तिथे घटनेचे वर्णन करीत काय घडले ते सांगतो, तक्रार करतो. लोकांचे मत नेत्यांपर्यंत आणि नेत्यांचे मत लोकांपर्यंत नेण्याचे काम करणाऱ्या फेसबुकने जितके फायदे दिलेत तितकेच तोटेही दिले आहेत.
मोबाईल,इंटरनेटचा वापर करणारे जवळपास तीस-चाळीस कोटी भारतीय नागरिक आहेत ज्यांच्यावर रोजच कितीतरी खोट्या,अर्धसत्य, हिंसक, द्वेषपूर्ण माहितीचा भडीमार केला जातो.

जगात, देशात हिंसाचार उफाळून येईल, अशा पोस्ट करून वातावरणात जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचे काम काही गटांकडून केले जात होतं आणि मग जगातल्या जवळपास सर्व देशांकडून फेसबुकला प्रश्न केली गेली. त्यातल्या त्यात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड आणि इंग्लंड या देशांनी फेसबुकच्या मार्क झुकेरबर्ग यांनाच बोलावलं आणि जरा जबाबदारीने काम करा, नाहीतर काही कठोर पाऊलं उचलू म्हणून इशारा केला.

भारत सरकारनेही वेळोवेळी फेसबुकवर टीका केली.

केंद्र सरकारचे माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वप्रथम सप्टेंबर २०१६ मध्ये फेसबुकनं फेक न्यूज चा प्रसार रोखावा अशी मागणी केली होती. कायदा करणाऱ्या यंत्रणांनी याबाबत आक्षेप घेतला तर त्याची सुरुवात कुठून होते याचा तपास करून याची माहिती देणे आवश्यक आहे. नाही तर मग अशाप्रकारच्या अफवा पसरवत असतील त्याची जबाबदारीही त्या माध्यमांनी घेण गरजेचे आहे आणि जर नी घेतली त्यासाठी त्या प्लाताफोर्म ला जबाबदार धरण्यात येईल.

पण या परिस्थितीसाठी कारणीभूत ठरल्या होत्या अशा काही घटना ज्यामुळे फेसबुक, व्हाट्सअपला   त्यांची तरतूद बदलावी लागली.   

२०१६ च्या मे ते जुलै या काळात काही हत्या झाल्या ते व्हाट्सअपमुळे घडल्या होत्या  

व्हाट्सअपच्या एका अफवेमुळे राजस्थानमधील २६ वर्षाच्या मजुराची हत्या झाली. आयटीमधील पंढरी मानल्या जाणाऱ्या बंगलोरला ही हत्या झाली होती. कर्नाटकमध्ये अशी अफवा चालू होती कि दुसऱ्या राज्यातील आलेले काही लोकं आपल्या राज्यातील लहान मुलांना पळवून नेत आहेत. ह्या खोट्या मजकुरासोबत एक खोटा व्हिडीओही पसरवण्यात आला होता. 

याच अफवेमुळे त्यानंतर कर्नाटकातील बिदरमध्ये मॉब लीचींग मध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. ३२ वर्षीय हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर या अफवेला बळी ठरला.

महाराष्ट्रातही एक घटना घडली होती. अफवेमुळेच धुळे जिल्ह्यातील पाच लोकांवर स्थानिकांनी हल्ला केला होता. भटक्या समूहाची ४-५ लोकं जी लहान मुलांची आणि मृत बालकांच्या मृदेहाची चोरी करत आहेत अशी खोटी माहिती देणारा एक व्हिडिओ व्हाट्सअपवर व्हायरल केला गेला. 

फॅक्ट चेकिंग मध्ये आढळलं कि या व्हायरल व्हिडीओ मध्ये मृतदेहांचे फोटो हे २०१३ मध्ये घडलेल्या सिरियातील विषारी वायू हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकांचे फोटो वापरण्यात आले होते.

त्यानंतर २०१७ मध्ये व्हाट्सअपच्याच एका अफवेमुळे एका मुस्लीम मटणविक्रेत्याची हत्या झाली होती. झारखंडमधील रामगढ मधील अलीमुद्दिन अन्सारी हा मॉब लीचींग चा बळी ठरला होता. त्याची जमावाने हत्या करण्याचा संपूर्ण व्हिडीओ नंतर सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला होता. 

हत्येचं हे सत्र थांबतच नव्हतं त्यामुळे पुन्हा रविशंकर प्रसाद यांनी या माध्यमांवर हल्ला चढवला.

व्हाट्सअपला लोकांच्या जीवांची, सुरक्षतेची खरंच काळजी आहे का असे प्रश्न होऊ लागले, तेंव्हा त्यांच्या प्रवक्त्याने लगेच उत्तर पाठविले कि, आम्ही लोकांच्या सुरक्षेतेतेचा गांभीर्याने विचार करतो म्हणत मग व्हाट्सअपने आक्षेपार्ह मेसेजचा मूळ स्त्रोत शोधून काढण्यासाठी पावलं उचलली.

२०१८ मध्ये व्हाट्सअँपचे सीइओ क्रिस डॅनियल्स यांनी रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. 

त्यांनी यासाठी भारतातल्या काही तज्ञांची आणि संशोधकांची फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी आणि जनसुरक्षा अभियान चालवण्यासाठी मदत घेतली.

काहीच कालावधीनंतर व्हाट्सअँपने संदेशाची देवाण घेवाण करतांना त्यासोबत ‘फॉरवर्डेड’ असं लिहिलेलं असण्याची सुविधा उपलब्ध केली. 

तसेच एन्क्रिप्शन या तरतुदीची उपलब्धता केली, म्हणजेच एन्क्रिप्शन म्हणजेच मेसेज पाठवणारा आणि स्वीकारणारा यांच्या व्यतिरिक्त तिसर्या कुणालाही तो मेसेज वाचता येत नाही. थोडक्यात खाजगीपणाला महत्व दिले. अशाप्रकारे व्हाट्स ऍपची हि छोटीशी तरतूद बदलण्यामागे या काही हत्या कारणीभूत ठरल्या हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.