टायगर जिॆंदा हैं !!! 

महाभारतातला अश्वत्थामा आणि हिकडे MDH चे सर्वेसर्वो दोघंही अमर आहेत यावर आपल्या भिडू लोकांचा दांडगा विश्वास. पण रविवारी सकाळ या विश्वासाला तडा जाणारी ठरली, कारण बातमी अशी होती की, 

MDH चे सर्वेसर्वा मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन !!! 

आत्ता बातमी इतक कोणी आलतू फालतू साईटवर आली असती तर विश्वास बसला नसता पण लोकसत्तावर !! 

Screen Shot 2018 10 07 at 12.41.00 PM
loksatta facebook

शांतम् पापम् चक्क लोकसत्ता, टाईम्स सगळ्यांनी धूमधडाक्यात बातमी लावली मालक गेले. अरे गेल्या तीन पिढ्या ज्या माणसाला आम्ही म्हाताऱ्या अवस्थेत बघतोय तो माणूस कसा जावू शकतो. मग आम्ही तात्काळ सर्च इंजिन वापरलं तर मालक मस्तपैकी सोफ्यावर बसलेत, काही लोक त्यांच्या जवळ आलेत आणि ते सांगतायत, अशा अफवा पसरवू नका महाशयांना अजून खूप जगायचा आहे…. 

हाण त्येचा मारी अज्जून !!

अस्सा कॉन्फिडन्स पाहीजे माणसात… मग कन्फर्म केलं त्यात जे काही हाती लागले त्याचे हे पुरावे,  

आत्ता बोनसमध्ये याच टागरटची गोष्ट, एखाद्या मृत्यूची अफवा आणि त्याच्या बातम्यांच मुल्य जाणणाऱ्यासाठी तर खास की हा टायगर कोण आहे ? 

 

  1. MDH चा अर्थ महाशयन दि हड्डी. धर्मपाल गुलाटी यांनी MDH कंपनीची स्थापना १९५३ साली दिल्लीतल्या चांदणी चौकात भाड्याने गाळा घेवून केली.  पुढं १९५९ साली अजून किर्ती नगरमध्ये मोठ्ठी जागा घेतली आणि बिझनेस वाढवलां. 
  2. पण इतकी सोप्पी ही गोष्ट नव्हती. आजोबांचा जन्म झालेला तो सियालकोटला. थोडक्यात आजोबा पाकिस्तानी. फाळणीनंतर ते भारतात आहे. आत्ता कामाधंद्यासाठी काहीतर करायचं म्हणून त्यांनी कधी गोळ्या बिस्किट विकली तर कधी टांगा चालवला.
  3. अमृतसरला स्थानिक झालेल्या गुलाटीच्या वडिलांनीच त्यांना दिल्लीचा रस्ता दाखवला दिल्लीत आल्यानंतर या माणसाने पहिले काही दिवस टांगा चालवला. त्यानंतर किमान आठ दहा वेगवेगळे व्यवसाय केले. काहीच जमत नाही म्हणून मरायच्या अगोदर एखादी मसाल्याची कंपनी तर काढू या विचाराने या माणसाने मसाल्याची कंपनी काढली. तिचच नाव MDH.
  4. गुलाटी महाशयांच वय आहे ९६ वर्ष. भारत स्वतंत्र झाला तेव्हा ते २५ वर्षांचे होते. थोडक्यात काय तर ऐन तारुण्यात त्यांनी नेहरूंना लाल किल्यावर झेंडा फडकवताना बघितलय. पन्नास वर्षाचे असताना त्यांनी बांग्लादेश तयार होताना बघितला. साठीत त्यांनी इंदिरा गांधीची हत्या अनुभवली. भारताच्या सगळ्या पंतप्रधानां बघण्याचं अजब गजब काम त्यांच्या नावावर आहेच की.
  5. लास्ट गोष्ट म्हणजे MDH कपंनीचा टर्नओव्हर. हे का सांगाव लागत कारण पुढच्याकडे कित्ती पैसा आहे यात आपल्याला खरा इंटरेस्ट असतोय. असला पण पाहीजे. तर १५०० रुपयात सुरू झालेला व्यवसाय (हे त्या काळातले १५०० रुपये आहेत) आत्ता कोटींच्या घरात आहे. चार लाख फक्त घावून विक्रेत आहेत. १५ वेगवेगळ्या मसाल्यांच्या कंपन्या आहेत आणि ६० च्या वरती वेगवेगळ्या देशात त्यांचे प्रॉडक्ट विकले जातात.

अशा या टायगर माणसास लक्ष लक्ष शुभेच्छा !!! 

आज्जोबा तुम्ही अजून जगा, अजून आठ दहा पंतप्रधान तरी बघाच !!!! 

Leave A Reply

Your email address will not be published.