खरंच UPSC ची परिक्षा रद्द होणार का? वाचा..

बोलभिडू, आपले अनेक वाचक तुमच्यासारखेच मृगजळामागे लागलेले असतात, लॉकडावूनच्या अगोदरचे मृगजळ वेगळे आणि लॉकडावून मधील वेगळे…!!!

पण एक लोकसंख्या आणि तीही भारीभक्कम आहे ती म्हणजे स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणारी…!!! जी साहेब होणार असते आणि परिस्थिती बदलवून टाकणार असते, कितीही मृगजळ वाटू दे पण ह्यांचे प्रयत्न काही कमी पडत नाहीय,

सध्या जशी तुमची आमची अडचण झालीय तशीच ह्याची पण अडचण झालीय.

ती म्हणजे MPSC ची परीक्षा 5 एप्रिल ला होणार होती ती पुढे गेली आणि 26 एप्रिल ला होणार होती , आता

“MPSC/ आयोगाने सांगितले आहे सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलत आहोत, आणि पुढील तारीख वगैरे तसे आम्ही कळवू”

म्हणजे अजून परीक्षा रद्द केली नाहीय. पण एका वृत्तवाहिनीवर बातमी झळकली की,

वयोमर्यादा दिलासा मिळणार , परीक्षा रद्द झाली

जे की साफ चुकीचे आहे, बातमीदारांनी या संदर्भात परिपत्रक सुद्धा दाखविले नाहीय. निदान MPSC चे तरी …!!!

बरे अजून त्यांची मोठी बातमी आहे ती UPSC ची ,म्हणे

ह्या परीक्षेवर पण टांगती तलवार आहे !!! परिक्षा कधी घ्यायची हा म्हणे प्रश्न आहे …!!!

तर भिडू, आहे असं की मराठीत म्हण आहे ‘दुधाने पोळल की ताक पण फुंकून पिणे’ इतका का कुणी सरकारी परिपत्रकाचा धसका घ्यावा.!!!

(ही बातमी 16 एप्रिल ला 2.58 ला आलीय वेब साईटला )

पण मित्रो, भिडू, UPSC हुश्शार आहे, त्यांनी 15 एप्रिललाच मीटिंग घेतली आणि सांगितले की

” परिक्षा तारखेत आम्ही अजूनही बदल केलेले नाहीयेत, परिस्थिती पाहू आणि मग कळवू, सध्यातरी तुम्ही अभ्यास करा…”

आणि अशी काही गरज पडली तर आम्ही परिपत्रक काढू, news-channel वाल्यांना वाचू दे किंवा नको , तुम्ही जरूर लक्ष ठेवा.

FB IMG 1587042267928

तर भिडू एक लक्ष ठेव, तुला पास व्हायच आहे तर अभ्यास कर, वेळ मिळाला की एकवेळ स्वतः वेबसाईटवर जा आयोगाच्या ,आणि तपास…!! आम्ही आताच तपासलय… !!!

तर काय आहे आता परिस्थिती, MPSC ने कळविले आहे की परीक्षा पुढे घेऊ, तारीख वेळ कळवू, SMS सुद्धा करू, त्यामुळे अभ्यास करा. परीक्षा रद्द झालेली नाहीय.

UPSC वाले भिडू, तुमची परीक्षा पण पुढे ढकलली नाहीय…!!!आजच्या घडीला परीक्षा 31 मे लाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही पण अभ्यास करा… !!!

अफवांच्या बाजारात फक्त एक लक्ष ठेवा. डोळे उघडून आयोगाची अधिकृत वेबसाईट आणि परिपत्रक नीट वाचायची.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.