कोरोनाच्या नावाखाली मानवी अवयवांची तस्करी सुरू आहे ? खरं काय आहे वाचा..

कोरोनाच्या दूप्पट वेगाने अफवा पसरवण्याचे उद्योग सुरू आहेत. बर अशा अफवांमध्ये WHO सुद्धा जबाबदार आहे. ते एकदा सांगतात स्पर्शातून कोरोना पसरत नाही, तर एकदा सांगतात हवेतून कोरोना पसरतो. एकदा सांगतात मास्क वापरण्याची गरज नाही तर एकदा सांगतात मास्क गरजेची गोष्ट आहे.

त्यात भरीस भर माध्यमं कोरोनाच्या १०० बातम्या देवून कन्फ्यूजन वाढवत आहेत. दूसरी सोशल मिडीया हातभार लावायला पुढच असतो. कोणीही सोम्यागोम्या उठतो आणि कोरोनापासून बचाव करण्याचे उपाय सांगून रिकामा होता. दूसरा सरकारला इतके पैसे मिळतात तितके पैसे मिळतात म्हणून दावा ठोकतो.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर काय खरं आणि काय खोटं कसं कळणार भिडू.

आत्ता आमच्या परीने आमच्याजवळ जे येतय ते तुमच्यापर्यन्त पोहचवून टेन्शन घालवण्याचं काम आम्ही करत आहोत. आत्ता हेच बघा काही दिवसांपूर्वी ही पोस्ट व्हायरल झालेली. संपूर्ण देशभरात महाराष्ट्राच्या नावाने ही बातमी खपवण्यात आली.

बातमी होती की, कोरोनाच्या नावाखाली पेशंट मारून त्यांचे अवयव विक्री करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे.

या माहितीत लिहण्यात आलं आहे की, 

Screenshot 2020 07 31 at 2.54.30 PM

कोरोना महामारी के नाम पर नया घोटाला. लव इंडिया न्यूज महाराष्ट्र. भायंदर मे गोराई मे पिछले दिनो कोई केस नहीं था, एक व्यक्ति को हल्का बुखार, सर्दी खॉंसी हुई तो चेक करवाने गया. उसे जबरदस्ती भर्ती करके रिपोर्ट पॉझिटिव्ह बताई गई. फिर अचानक उसकी मृत्यू हो जाती है. पूरी बॉडी पॅक करके जलाने की तैयारी की जाती हैं. मगर परिवार वालो के जिद्य करने पर जब बाडी को खोला जाता हे तो शरीर के सारे अंग गायब मिलते हैं. ये अभी महाराष्ट्र मे “मृत शरीर कोरोना घोटोला” सामने आने से हॉस्पीटलम हडकंप मचा हुआ है, आखिर कितने लोगों के साथ ऐसा खिलवाड़ किया गया है.”

या फोटोची माहिती घेतल्यानंतर दिल्ली क्राईम प्रेस नावाची एक वेबसाईट मिळाली. या स्टोरीसाठी ओम शुक्ला यांना क्रेडिट देण्यात आलं होतं. त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांची माहिती स्पेशल क्राईम इन्वेस्टिगेटर म्हणून देण्यात आली आहे.

फेसबुकवर ओम शुक्ला यांच्या नावाने मानव अंगो की तस्करी अस सर्च केल्यानंतर लखनौ मधील वर्षा वर्मा नावाच्या महिलेची पोस्ट मिळते.

२१ जूलै च्या या पोस्टनुसार जी महिला अंगविक्रीचा दावा करून फोटो शेअर करण्यात येत आहे त्या फोटोत हीच महिला दिसते. त्यांच्या पोस्टनुसार त्यांनी आपल्या फोटोंचा चुकीचे दावे करुन पोस्ट व्हायरल केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्या एक NGO चालवतात, व त्याद्वारे बेवारस मृतदेहांचे अग्नीसंस्कार करण्याच काम त्या करतात.

Screenshot 2020 07 31 at 2.57.29 PM

१८ जुलै रोजी त्यांनी आपले फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. त्यामध्ये ४३ वर्षी बेवारस महिलेच्या मृतदेहाचे अग्नीसंस्कार केल्याची माहिती त्या देतात. त्या महिलेला उपचारासाठी लखनौंच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये ॲडमीट करण्यात आलं होत. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आत्ता पर्यन्त त्यांनी लॉकडाऊनच्या काळात १७ बेवारस मृतदेहांचे अग्नीसंस्कार पार पाडले आहे. अशातीलच एक फोटो ओम शुक्ला यांनी घेवून त्या फोटोच्या आधारे अंगविक्रीची बातमी केली. आपल्या फोटोंचा चुकीचा वापर केला जात असल्याबाबत त्यांनी सायबर सेलमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे.

थोडक्यात या फोटोंवरून ओम शुक्ला नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्रात अवयवांची चोरी होत असल्याची फेसबुक पोस्ट टाकली व त्या आधारे दिल्ली क्राईम प्रेस या वेबसाईटने ही आर्टिकल तयार केलं.

Screenshot 2020 07 31 at 2.54.01 PM

ओम शुक्ला यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी एक पोस्ट टाकल्याचे दिसते त्यामध्ये ते लिहतात की मला मिळालेली माहिती चुकीची होती. त्यांनी या गोष्टीवर माफी मागितली आहे.

थोडक्यात अंगविक्री ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. खोट्या गोष्टींवर चटकन विश्वास ठेवू नका भिडूंनो, उगीच आभाळातल्या गप्पा रंगवण्यापेक्षा मास्क वापरा काळजी घ्या.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.