प्रशांत किशोरचं नाव घेऊन एका गॅंगने काँग्रेस वाल्यांना गंडवायला सुरु केलंय..

सध्या भारतात किंग मेकर म्हणून प्रशांत किशोर यांची हवा आहे. आपल्या आय पॅक या निवडणूक रणनीती करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक नेत्यांना निवडणुका जिंकून दिल्या आहेत. २०१४ साली नरेंद्र मोदींना जिंकून दिलं पुढे थेट भाजपशी पंगा घेतला. ममता बॅनर्जी असोत जगनमोहन रेड्डी असो, एम के स्टालिन असो अथवा अरविंद केजरीवाल या सगळ्यांच्या निवडणूक हॅन्डल करून त्याने अमित शहांना चकमा दिलाय.

त्याच्या  बद्दलच गूढ संपूर्ण देशात पसरलं आहे. राष्ट्रवादी वाल्यांना वाटत कि प्रशांत किशोर पवारांना पंतप्रधान करणार, तृणमूल वाल्यांना वाटत ममतादीदींना करणार. काही जण तो स्वतःच पंतप्रधानपदाची तयारी करतोय असं पिल्लू सोडत आहेत. भाजप काँग्रेस आणि विरोधी पक्षाला कस हरवायच याच्या पेक्षा प्रशांत किशोरला कस हरवायचा याच्या तयारीत आहे.

हे सगळं चाललंय आणि तिकडे काँग्रेस मध्ये प्रशांत किशोरमुळे एक नवीनच प्रॉब्लेम झालाय.

पुढच्या वर्षी म्हणजे येत्या  २०२२ मध्ये युपी,  मणिपुर, गोवा उत्तराखंड आणि पंजाबात विधानसभा निवडणूक होणार आहेत.  याच पार्श्वभूमीवर  राज्यांत आतापासूनच निवडणुकांचं वार वाहायला सुरुवात झालीये. पंजाबात तर राजकीय हालचालींना वेग आलाय.  तिकिटं, पक्षांतर्गत रुसवे- फुगवे, लॉबिंगचा  खेळ सुरु झालाय.  राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षात धुसमुस सुरु आहे. काही लोकांनी  याचाच फायदा  घ्यायला सुरुवात केलीये.

निवडणुकीच्या या धामधुमीत एक गॅंग तयार झालीये, जी राजकीय सल्लागार प्रशांत किशोर बनून नेत्यांना गुंडाळण्याचा प्रयत्नात लागलीये.  या गॅंगमधले लोक  नेत्यांना फोन करून   प्रशांत किशोरांच्या आवाज आणि स्टाईलमध्ये बोलतात. मग मनासारखं सर्वेक्षण किंवा निवडणुकीचं तिकीट देण्याचं प्रॉमिस करून  पैशांच्या भल्या मोठ्या बंडलची मागणी करतात. 

या गॅंगनं कार्यकर्त्यांबरोबर एक आमदाराला सुद्धा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलाय.

याप्रकरणी मंगळवारी लुधियाना  पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार दाखल केलीये.  आरोपानुसार ही लोक काँग्रेस नेत्यांना फोन करून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर टीका करायला सांगत आहेत.  तपासा दरम्यान समजले कि, गेल्या महिन्यात प्रशांत किशोर म्हणून लुबाडणाऱ्या एका गॅंगचा शोध लागलं होता.  ही गॅंग लुधियाना,  बठिंडा, जालंधर, अमृतसर आणि संगरूरच्या कमीतकमी ३० – ४० काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होती. माहितीनुसार या गॅंगनं काँग्रेस नेत्यांची जवळपास पाच कोटी रुपयांची फसवणूक केलीये.

आमदाराला फसवायच्या नादात पकडले गेले

या गॅंगची मजल  पार आमदारापर्यंत जाऊन पोहोचली. गॅंगच्या लोकांनी आमदार कुलदीपसिंग वैद यांनाही गंडा घालण्याचा प्रयत्न  केला. प्रशांत किशोर म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला गेला. तिकीटासाठी त्यांच्या बाजूनं  सर्वेक्षण अहवाल देण्याविषयी बोललं गेलं आणि  त्या बदल्यात त्यांनी मोठ्या गिफ्टची मागणी केली.

यावर आमदाराला संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचला, आणि जालंधर मधून दोन लोकांना अटक केली. राकेश कुमार भसीन आणि रजत कुमार राजा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर मुख्य आरोपी गौरव शर्माला नंतर अटक करण्यात आली. हि सगळीजण अमृतसरमध्ये राहणारी आहेत.

आमदार कुलदीपसिंह यांनी संगितलं की,

मी प्रशांत किशोरांना याआधीही भेटलोय. पण तो बहुरूपी इतक्या आत्मविश्वासानं बोलतात होता कि,  एका क्षणासाठी मलासुद्धा वाटलं की,  प्रशांत किशोरचं लाईनवर आहेत. त्यानं चांगलाच होमवर्क केला होता. तो माझ्याशी असं बोलत होता,  जस काय त्याने माझ्या  मतदारसंघाचं सर्वेक्षण केलं असेल.  ४-५ दिवसात मला त्याचे अनेक फोन आले. पण नंतर त्यानं माझ्याकडं १० लाखांची मागणी केली. यामुळंच मला डाउट आला कि तो प्रशांत किशोर नाही. त्यांनतर मी लगेच पक्षातल्या लोकांशी आणि पोलिसांशी बोलणं केलं. आणि समजलं कि, दमन थिंद बाजवा यांनीही संगरूरमध्ये अशीच तक्रार दाखल केली होती. नंतर मीसुद्धा  जालंधर पोलिसांत तक्रार दाखल केली.

दमन थिंद बाजवा यांनीही पोलिसाना  सांगितलं होत कि,  जेव्हा फ्रॉडनं त्यांना सात लाख रुपये जमा करायला संगितलं होत.  तेव्हा त्यांनाही डाउट आला होता.  त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.

नुकताच समोर आलेल्या प्रकरणी लुधियानाचे पोलिस आयुक्त राकेश अग्रवाल यांनी  सांगितले की,  प्रशांत किशोर बनून फसवणूक केल्याप्रकरणी  पोलिसांनी लुधियानामध्ये गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस निरीक्षक अमनदीप सिंग यांच्या तक्रारीवरून आयटी कायद्यातील ४२० (फसवणूक) आणि आयटीच्या  कलम ६६-डी यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका सिनियर पोलीस अधिकाऱ्यानं एका वृत्तपत्राला दिलेल्या माहिती संगितलं कि,

गौरव शर्मा जुगार खेळणारा माणूस आहे. तो रोज लाखोंचा सट्टा लावतो. त्याच्या टोळीनं

टीव्हीवर प्रशांत किशोर ज्याप्रकारे दिसला त्या प्रकारे त्याच्या टोळीत महारत होती. या लोकांनी पंजाबमधील नेत्यांनाच नव्हे तर बिहार, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम बंगालच्या नेत्यांचीही फसवणूक केली आहे. या टोळीविरूद्ध इतर राज्यातही गुन्हे दाखल आहेत. परंतु पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. फसवणूक झालेल्यांपैकी बहुतेकांना त्यांची ओळख प्रकट व्हायची नव्हती, म्हणून त्यांनी गुन्हा देखील नोंदविला नाही.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या टायमालासुद्धा गॅंगने  अशाचप्रकारे अनेक नेत्यांना टार्गेट केलं होत आणि मोठ्या रकमेची मागणी केली होती.  यात एक उमेदवार, आमदार,  माजी महापौर सकट अनेक नेत्यांचा समावेश होता.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस पक्षासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेतली होती. त्याचवेळी यावर्षी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपला प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त केलं.

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर म्हंटल होत कि, त्यांना आपल्या कामातून ब्रेक घ्यायचाय. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या विजयाची रणनीती आखली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.