एका बातमीने लोकसत्ता पासून ते टाईम्सपर्यंत सगळ्यांचा पोपट झालाय !!

तर विषय असा आहे की आम्ही पत्रकार म्हणजे ओझ्याचे बैल हो. संपादकाच्या दट्ट्याने स्टोरी हुंगत खाली मान घालून हिंडत असतो. रोज रोज कुठून स्टोर्या मिळणार. मग काय मिळेल त्या स्टोरीत पाणी घालून वाढवून चढवून सांगत बसायचं. पब्लिक बिचारं आम्ही सांगतोय ते खरं मानून वाचतंय.

अशीच एक गंमत झाली. काल टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबई मिरर, आउटलुक पासून ते मराठीतल्या न्यूज18 लोकमत, लोकसत्ता पर्यंत सगळ्यांनी एक बातमी लावली. बातमी काय तर

७५० टन व्हायग्रा सोडलं नदीत; ८० हजार मेंढ्यांवर झाला ‘हा’ परिणाम

आता ८० हजार मेंढ्या व्हायग्रा खाऊन सेक्स करत सुटले तर आम्हा पत्रकारांचा बांध फुटणारच ना!! 

झालं अस की वर्ल्डन्यूज डेली रिपोर्ट नावाच्या एका अमेरिकेतल्या वेबपोर्टलने ही बातमी लावली. बातमी अशी होती की दक्षिण आयर्लंडमध्ये एका औषध कंपनीच्या कारखान्यातून नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यात चुकून व्हायग्रा मिसळला, मग काही मेंढ्या ते पाणी प्यायल्या, मग त्या गायब झाल्या वगैरे वगैरे.

नंतर त्यांचे मेंढपाळ त्यांना शोधत गेले म्हणे. मग त्यांना दिसल की त्या मेंढ्या सेक्स करत आहेत. काही जणांनी रागाने त्यातल्या मेंढ्या मारून पण टाकल्या. शेवटी काही तरी गडबड आहे म्हणून तक्रार केली.

या वेबपोर्टलने एका शेतकऱ्याची मुलाखतसुद्धा बातमी मध्ये टाकली. त्यात तो सांगत होता की

“एखादा सेक्स करण्याचा आजार झाल्यासारखे मेंढ्याचे वागणे होते. दिसेल त्या गोष्टीबरोबर त्यांना सेक्स करावासा वाटायचा. अगदी माझा कुत्रा, मुले आणि पत्नी समोर आल्यावर मेंढ्या अंगलटीला यायच्या. हा अनुभव खूपच भयानक होता.”

Irish Pfizer plant releases 750 tons of Viagra in river, thousands of sheep go on a sex craze

तर गंमत अशी झाली की ज्या वर्ल्डन्यूज डेली रिपोर्टपासून ही स्टोरी सुरु झालेली ती वेबसाईटचं मुळात एक फेकिंग न्यूज वेबसाईट आहे. म्हणजे काय तर त्यावर कोणतीही बातमी खरी नसते, आपल्या मनोरंजनाच्यासाठी ती बातमी बनवली जाते आणि टाकली जाते. तिथ लिहलेलंसुद्धा असत की आम्ही फक्त गंमतीसाठी या खोट्या स्टोर्या लिहितो.

तर आमच्या कुठल्या तर महान भारतीय पत्रकाराला ही बातमी दिसली. त्याने नेहमी प्रमाणे ती ढापली.

आता मेंढ्या कस झुंडीने एकमेकामागे चालतात तस आम्ही पत्रकार असतो. अमेरिकेतल्या वेबसाईटची बातमी भारतीय इंग्लिश वेबसाईट वाले ढापतात, मग त्यांचं हिंदीवाले ढापतात, अस करत करत शेवटी मराठी पर्यंत ही गाडी येते. सगळ्यांनी केली आहे आपण पण करायचं. आहे तस भाषांतर केलं जात, आपण खुश, संपादक खुश, जनता खुश.

याच कॉन्फीडन्स मध्ये आमचे साथीदार फुटले आणि मेंढीच्या व्हायग्रा खाण्यावर स्टोरी करत सुटले.  

झालं. सगळीच जनता डोळे झाकून बसलेली नसते. सुजाण वाचकांपैकी कोणाला तरी हे आढळून आलं. त्यांनी ते ओपन केलं. मग काय फेसबुकवर धुलाई सुरु झाली. भारतात आधीच फेक बातम्यांचा सूळसुळाट झाला होता. त्यासाठी एक अल्ट न्यूज नावाच वेबपोर्टल सुरु झालय. त्यांनी तर या भारतातल्या एकापेक्षा एक दिग्गज वर्तमानपत्रांच्या वेबसाईटनां धारेवर धरलं.

Crazy sex run by Irish sheep after consuming Viagra? Indian media falls for satire

बऱ्याच जणांनी लाजून ती न्यूज डिलीट केली. दुर्दैव म्हणजे आपल्या मराठीतलं प्रतिष्ठीत लोकसत्ता पर्यंत ही बातमी पोहचली नाही की त्यांना निगरगट्ट म्हणाव त्यांनी आज दुसरा दिवस ती बातमी डिलीट पण केली नाही, वाचकांची माफी वगैरेची गोष्ट दूरच. 

आजकाल मोठी परंपरा असणाऱ्या वर्तमानपत्रांनाही ढापाढापीची सवय लागली आहे असचं म्हनावं लागेल

कारण असा अनुभव आम्हाला देखील दोन तीन वेळा आलाय. मध्यंतरी आम्ही शरद पवारांवर एक लेख लिहिला होता. लोकसत्ताने चार शब्द फिरवून तो लेख ढापला. लोकसत्ता ऑनलाईनच्या संपादकांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी खूप परिश्रम घेऊन तो लेख पुनर्लिखित केल्याचे सांगितले.

त्या लेखाच्या ०.०१% परिश्रम ही बातमी खरी का खोटी तपासण्यासाठी घेतले असते तर आज असा ऑनलाईन वडापाव झाला नसता. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.