घराणेशाही ते आत्मनिर्भर भारत; पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून महत्वाचे मुद्दे मांडले

भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्या शुभेच्छा दिल्या.

मोदी यांनी नवव्यांदा ध्वजारोहण केलं. आजच्या कार्यक्रमात त्यांना २१ तोफांची सलामीही देण्यात आली. यावेळी लाल किल्ल्याभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला जातो. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधून भाषण केले. त्यात त्यांनी भविष्यातील भारत कसा असेल याची माहिती दिली. त्यावेळी मंत्रिमंडळातील मंत्री, संरक्षण दलातील अधिकारी, एनसीसीचे कॅडेट, शालेय विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधितण करतांना अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्याचमुद्द्यांवर नजर मारुया…

१. चुकीच्या हातात जाणारे २ लाख कोटी रुपये वाचवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या ९ वर्षात नागरिकांसाठी कुठल्या योजना आणल्या याबद्दल माहिती दिली.

मोदी म्हणाले की, गेल्या ८ वर्षात आधार, मोबाईल सारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा उपयोग करून नागरिकांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरीत केले. यामुळे चुकीच्या हातात जाणारे २ लाख कोटी रुपये वाचवले आहेत. हे पैसे देशाच्या भल्यासाठी वापरण्यात यशस्वी झालो असल्याचे सांगितले.

२. ‘पंचप्राण’

पुढील २५ वर्षांमध्ये भारत हा विकसित देश म्हणून ओळखला जाण्यासाठी संकल्प करण्याचं आवाहन मोदींनी केले. देशातील नागरिकांना राष्ट्रविकासासाठी त्यांनी ‘पंचप्राण’ ही संकल्पना सांगितली.

हा पहिला प्राण हा भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची आहे. दुसरा प्राण गुलामीचा अंश बाहेर काढणे हा आहे. आपल्या मनात गुलामीचा थोडाजरी अंश असेल तर तो काढून टाकला पाहिजे. तिसरा प्राण म्हणजे आपल्याला आपल्या वारशाप्रती गर्व असला पाहिजे. कालबाह्य गोष्टींना सोडून नव्या गोष्टी स्वीकारण्याचा आपला वारसा असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.

१३० कोटी जनतेमध्ये एकता हवी. एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नासाठी एकजुटता हा चौथा प्राण. तर  पाचवा प्राण म्हणजे नागरिकांच कर्तव्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात सांगितले.

३ भ्रष्टाचार

नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचार संपवायला हवेत अस मत व्यक्त केले. तसेच ते यावेळी म्हणाले की, भ्रष्टाचार देशाला पोखरत चालला आहे. देशाला त्याच्याशी लढावे लागेल.  कोणाकडे राहायला जागा नाही आणि तर कुणाकडे चोरीचा माल ठेवायला जागा नाही.

पूर्वीच्या सरकारांमध्ये बँका लुटून पळून गेलेल्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही एका गंभीर पाऊलं उचलत आहोत. त्यांना परत याव लागेल अशी परिस्थिती आम्ही तयार करत असल्याचे सांगत मला भ्रष्टाचार संपवायचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

४ घराणेशाही

राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिले जात आहे. याच कारणामुळे देशाचे सामर्थ्य, बुद्धीमत्तेला नुकसान पोहोचत आहे. घराणेशाहीमुळे गुणवत्तेला वाव मिळत नाही. घराणेशाही, परिवारवाद हादेखील भ्रष्टाचारास कारणीभूत ठरतोय.

घराणेशाही विरोधात आपल्याला जागरुकता निर्माण करावी लागेल. संस्थांना वाचवायचे असेल तर आपल्याला हे करावे लागेल,” असे म्हणत मोदी यांनी घराणेशाहीला विरोध दर्शवला.

५ ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान नंतर आता जय अनुसंधान’चा नारा

पंतप्रधान मोदी यांनी ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ची घोषणा केली आहे. लाल बहादूर शास्त्रींनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात ‘जय विज्ञान’ जोडले. आणि आता त्यात ‘जय अनुसंधान’ जोडण्याची वेळ आली असल्याचे मोदी यांनी सांगितले. आता ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, असा नारा पंतप्रधानांनी दिला आहे.

 

६ ‘मेड इन इंडिया’ मोहिमेला चालना देणार

देशाला आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे. मेड इन इंडिया मोहिमेला चालना मिळाली आहे. यंदा स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्ती वेळी स्वदेशी २१ तोफांची सलामी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत योजनेचा उद्देश जगाला भारताची ताकद दाखवणं आहे. जागतिक बाजारात स्वदेशीला स्थान मिळवून देणं आपलं ध्येय असेल. 

भारत एक उत्पादन केंद्र बनत आहे. आज देश खूप वेगाने प्रगती करत आहे. जेव्हा आपले ब्रह्मोसं  जगासमोर जाईल तेव्हा सर्व भारतीयांचे मन भिडेल. आपल्याला स्वतंत्र व्हायचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

७ इथेनॉल मिश्रणाने ध्येय पूर्ण केले

आपण आखाती देशांच्या तेलावर अवलंबून आहोत. आत्मनिर्भर होण्यासाठी पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याची सरकारची योजना होती. मात्र ही योजना पूर्ण होणे शक्य नाही, ते पूर्ण करणे कठीण असे वाटत होते. मात्र, सरकारने वेळेपूर्वीचं पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रनाचे ध्येय साध्य केलं असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले . 

८ पराक्रमी महिला योद्धांना अभिवादन

भारतातील महिला काय करू शकतात हे सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक वीर महिला योद्धांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण करून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून येतो.  राणी लक्ष्मीबाई, दुर्गाभाभी, बेगर हजरत महल या पराक्रमी महिला योद्धांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले ‘

९ कोरोना लस

पीएम मोदी म्हणाले की, “कोरोनाच्या काळात, लस घ्यावी की नाही या संभ्रमात सगळ जग होते. त्यावेळी आपल्या देशातील नागरिकांनी २०० कोटी लसीचे डोस घेऊन आश्चर्यकारक काम केले. यामुळे अनेक चांगला गोष्टी घडल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.