जगातला सर्वश्रेष्ठ गणितीतज्ञ पण त्याच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची डिग्री नव्हती.
तारिख होती १६ जानेवारी १९१३.
या तारखेला इंग्लडचे गणितीतज्ञ गोडफ्रे हेरॉल्ड हार्डी हे आपल्या घरी दूसरे गणितीतज्ञ लिटलवूड यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. त्या वेळी हार्डी यांच्या नावावर एक पत्र आलं. ते पत्र आलं होतं भारतातून. ९ पानांच्या त्या पत्रावर १२० गणितांचे फॉर्मुले देण्यात आले होते. हार्ड़ीने ते फॉर्मुले वाचायला घेतले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं यातल्या काही फॉर्मुल्यांवर अगोदरच इंग्लंडमध्ये काम झालं आहे, पण त्यातील काही फॉर्मुले आश्चर्यात टाकणारे आहे. हार्डी सारख्या गणिततज्ञाला देखील हे काम नविन होतं.
त्यांनी पत्र कोठून पाठवलं तो पत्ता पुन्हा पाहिला तर त्यावर मद्रासचा इंडिया असा पत्ता होता. या फॉर्मुल्यांसोबत एक चिठ्ठी देखील होती. त्यावर लिहण्यात आलं होतं की,
डियर सर, मी कुठल्याही विद्यापीठातून शिक्षण पुर्ण करु शकलो नाही. पण हां मी कॉलेजपर्यन्तचं शिक्षण पुर्ण केलं आहे. मी Divergent Series चा विशेष अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या मिळाल्या. मी त्या भारतातील काही स्थानिक गणितीतज्ञांना देखील दाखवल्या. आपणही त्या पहाव्यात.
पत्राच्या खाली नाव लिहण्यात आलं होतं, रामानुजन श्रीनिवास.
रामानुजन श्रीनिवास यांची आपणाला ओळख म्हणजे भारताचे महान गणितीतज्ञ. पण अनेकांना माहिती नसतं की त्यांना भारतातल्या कोणत्याच विद्यापीठातून शिक्षण पुर्ण करता आलं नव्हतं. त्याच प्रमुख कारण म्हणजे रामानुजन यांना गणित सोडून दूसऱ्या कोणत्याच विषयात रस नव्हता. ते गणितासारख्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे पण इतर विषयात पास देखील होत नसतं. रामानुजन यांना गणिताचा हा नाद वयाच्या १० व्या वर्षी लागला आणि १३ व्या वर्षी अनेकांना आश्चर्यात टाकणारे गणित ते अगदी सहज सोडवून दाखवत.
रामानुजन यांच्या जन्म २२ डिसेंबर १८८७ चा. मद्रास भागातल्या एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. १० व्या वर्षी गणितामध्ये आवड निर्माण झाली आणि १७ व्या वर्षी त्यांनी स्वत:चे थेअरम् देखील विकसित केले होते.
कोणत्याच विद्यापीठात फक्त गणित हा विषय घेवून पुढं जाता न आल्याने ते मद्रासच्या कस्टम पोर्टवर क्लर्क ची नोकरी करू लागले. त्यांचा पगार होता वार्षिक २० पौंड. या नोकरीतून वेळ मिळत असे तेव्हा ते आपले गणितातले थेअरम् भारतीय गणिततज्ञांना दाखवत. सन १९१० मध्ये भारताच्या गणित सोसायटीचे फाऊंडर वी. रामास्वामी अय्यर आणि त्यांची भेट झाली. रामानुजन् यांच्या थेअरी पाहून त्यांचे रिसर्च पेपर ते जगभरातील गणिततज्ञांना पाठवू लागले.
असाच एक पेपर हार्डी यांच्या पत्यावर पोहचला आणि हार्डी यांनी रामानुजन् यांना लंडनला बोलावून घेतले.
इग्लंडच्या रॉयस सोसायटीचे दरवाजे हार्डी यांच्यामुळे उघडण्यात आले. ती तारिख होती १४ एप्रिल १९१४. त्या दिवसापासून हार्डी हेच त्यांचे गुरू आणि हार्डी हेच त्यांचे मित्र झाले.
त्यांच्या मैत्रीबद्दल एक किस्सा सांगितला जातो तो असा की,
जेव्हा रामानुजन हॉस्पीटलमध्ये होते तेव्हा हार्डी त्यांना भेटायला टॅक्सीने आले होते. रामानुजन् यांनी हार्डीना विचारलं की तूम्ही ज्या टॅक्सिने आला त्याचा नंबर काय होता. हार्डी म्हणाले 1729. आणि तो नंबर खूप बोअर वाटलां.
तेव्हा रामानुजन म्हणाले,
हा नंबर खूप गंमतीशीर आहे. 1729 हि अशी सर्वात लहान संख्या आहे जी कोणत्याही दोन संख्यांचा घन काढून त्यांची बेरीज मिळते.
हार्डी आणि रामानुजन यांच्यातला हा किस्सा प्रसिद्ध समजला जातो. म्हणूनच १७२९ या संख्येला रामानुजन यांच्या नावाने गणिततज्ञ ओळखतात. रामानुजन् यांच्या नशिबात मात्र वेगळ्या गोष्टी होत्या वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे पेपर्स हार्डी यांनीच पब्लिश केल्याच सांगण्यात येतं.
हे ही वाच भिडू.
- गणितात नोबेल नसण्याच्या चार थेअरीज..?
- रामानुजन, या माणसाने आम्हांस रडवले.
- पुण्याचा आर्किमिडीज लक्ष्मण गोगावले : ज्यांनी पाय π ची अचूक किंमत सांगितली आहे.