फेमस लव्हस्टोरी लिहिणाऱ्या शेक्सपिअरला स्वतःच्या लग्नासाठीचं ४० पाउंडचा बॉन्ड भरायला लागलेला

जगभरात अनेक प्रसिद्ध साहित्यिक आहेत, पण शेक्सपिअरचा हात आजवर कुणीच धरू शकलं नाही. त्यानं लिहिलेल्या लव्ह स्टोरीच्या शपथा घेऊन बरीच मंडळी आपल्या प्रेमाचा इजहार करतात. त्यानं लिहिलेल्या साहित्यावर अनेक पुस्तक लिहिली गेली, अनेक नाटक झाले, चित्रपट बनवले गेले. पण  शेक्सपिअरच्या साहित्यातली वर्ल्ड फेमस लव्ह स्टोरी म्हणजे रोमिओ आणि ज्युलिएट, जी आजही जिवंत आहे.

बऱ्याच लव्ह स्टोरीच्या चित्रपटांमध्ये या रोमिओ आणि ज्युलिएटचा एक तरी डायलॉग मारायलाच लागतोय, त्याशिवाय पिक्चरची स्टोरी मनाला भिडत नाही. कारण ही लव्ह स्टोरी तितकी इंटरेस्टिंग लिहिलेच गेलीये. याच श्रेय अर्थातच शेक्सपिअरला जात म्हणा. उगाच काय त्यांना ‘फादर ऑफ ड्रामा’ म्हंटल जात.  पण भिडू तुम्हाला माहितेय शेक्सपिअरची स्वतःची स्टोरी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग होती….

शेक्सपिअरची प्रेयसी अॅना हॅथवे. जी त्याच्यापेक्षा जवळपास ८ वर्षांनी मोठी होती. म्हणजे आजकाल जो ट्रेंड निघालाय कि, बायको ही नवऱ्यापेक्षा मोठी असते, तो ट्रेंड खरं तर शेक्सपिअरच्या लव्ह स्टोरीत सुद्धा पाहायला मिळाला होता. म्हणजे पार ४५० वर्षांपूर्वीचा. 

पण महत्वाची गोष्ट म्हणजे शेक्सपिअर आणि अॅना यांनी जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला होता, तेव्हा शेक्सपिअर हे अवघ्या १८ वर्षाचे  होते तर अॅना २६ वर्षाच्या आणि अॅना त्यावेळी गरोदर सुद्धा होत्या.

आता त्यावेळी लंडनमध्ये लग्नाचे २१ होते अॅना तर यात बसत होत्या, पण शेक्सपिअर मात्र अजूनही अल्पवयीन होते. त्यामुळे कायद्यानुसार शेक्सपिअर यांना अॅनासोबत लग्न करण्यासाठी त्यांच्या वडिलांची परवानगी घेणं गरजेचं होत. पण कायद्याच्या चौकटीत या लागला मान्यता मिळणं अवघड होत.

पण अॅना गरोदर असल्यामुळं त्यांना लग्न कारण भाग होत. त्यामुळे शेक्सपिअरने कायद्याचीच मदत घ्यायचं ठरवलं. असं म्हणतात कि, विल्यम शेक्सपिअरने वॉर्सेस्टरमधील बिशप कोर्टात अर्ज करून मदतीची मागणी केली. तेव्हा कोर्टानं त्यांना पॅरिसच्या बाहेर लग्न करण्याची परवानगी दिली. विल्यम आणि अॅनला स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हॉनच्या बाहेर लग्न करण्याची परवानगी दिली. 

पण लग्नाच्या परवान्यासाठी शेक्सपियरला स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हॉनमध्ये ४० पाऊंडचा रोख जमा करावी लागली होती.  तेवहा कुठे २८ नोव्हेंबर १५८२ मध्ये शेक्सपिअर यांचं लग्न झालं. 

पुढे लग्नाच्या ६ महिन्यांनंतरच अॅना आणि विल्यमची पहिली मुलगी सुझॅनाचा जन्म झाला. त्यावेळी ते लँडच्या बाहेरच होते. पुढे काही वर्षातच त्यांना जुडिथ आणि हॅम्नेट ही जुळी मुलं सुद्धा झाली.  पण नंतर त्यातल्या एकाच मृत्यू झाला. या मुलांच्या जन्मांनंतर काहीच वर्षांनी शेक्सपिअर अभिनेता होण्यासाठी लंडनला आला. 

 या दोघांनी घाईघाईत लग्न केलं असं म्हणतात. पण तरी त्यावेळी अश्या परिस्थिती लग्न करणं म्हणजे अवघडचं..पण अनुभवाचे बोल असतात असं म्हणतात ना… 

आपल्या या लव्ह स्टोरीमुळेच तर त्यानं जगाला इतक्या जिवंत लव्ह स्टोरीज दिल्यात. जगभरात अशी एकही भाषा नसेल ज्यात शेक्सपिअरच्या साहित्याचं भाषांतर केलं गेलं नाहीये. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.