अंबानी – अदानी यांची ‘ही’ १२ उत्पादने आपण रोज वापरतोय

सरकारशी कृषी कायद्यावरून चर्चा सफल न झाल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. त्यातूनच देशभरात आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचंही सांगितले आहे. त्यामध्ये दिल्लीच्या सीमांवर घेराबंदी वाढवली जाणार असून १२ डिसेंबर पर्यंत जयपूर-दिल्ली हायवे आणि दिल्ली आग्रा हायवे बंद करणे, सगळे टोल नाके खुले करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

सोबतच या कृषी कायद्यामधून शेतकऱ्यांची शेती उद्योजकांना देण्यात येणार असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उद्योजक गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

याच आंदोलनाचा भाग म्हणून हरियाणातील सोनिपत इथे रिलायन्स स्मार्ट या स्टोअरला टाळ ठोकण्यात आल. सोशल मीडियावर देखील #बायकॉट अदानी-अंबानी असा ट्रेंड चालवण्यात आला.

पण या बहिष्कारामुळे या दोन उद्योगपतींच्या मालकीच्या असलेल्या आणि आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या काही महत्वाच्या गोष्टी देखील बॅन होऊ शकतात, त्या कोणत्या असतील?

मुकेश अंबानींची रिलायन्स या कंपनीशी संबंधित रोजच्या वापरातील उत्पादने कोणती आहेत ?

१) पेट्रोल : 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ९ पेट्रोलियम रिटेल कंपनी आहेत. यामध्ये रिलायन्स गॅस, रिलायन्स पेट्रोलियम रिटेल, ऑटो एलपीजी, आदी कंपन्या आहेत. ज्या एलपीजी, ट्रान्सपोर्टेशन फ्यूल, जेट/एविएशन फ्यूल, ऑटो एलपीजी, हाईवे हॉस्पिटॅलिटी सर्विसेज, फूड, लुब्रिकेंट्स यांच्यासाठी काम करतात.

२) रिलायंस ज्वेल्स :

रिलायन्स ज्वेल्स हा रिलायन्स रिटेलचा नामांकित ब्रँड. देशभरातील १०५ शहरांमध्ये स्वतःच्या जवळपास ९३ शोरूम्स आणि ११० दुकानांमध्ये रिलायन्स ज्वेल्सचे दागिने मिळतात.

३) ओन्ली विमल : 

ओन्ली विमल हा धीरूभाई अंबानींनी सुरु केलेला कपड्यांचा ब्रँड. मुकेश यांनी तो वाढवला. आज देशभरात या ब्रँडच्या १७०० पेक्षा जास्त फ्रॅन्चायजी आहेत.

४) जॉन प्लेयर :

७५० स्टोअर्स आणि ६५ फ्रांचायजी असलेल्या हा ब्रँड मुकेश अंबानी यांनी मागील वर्षी आईटीसीकडून खरेदी केला. जवळपास १५० कोटी रुपयांना ही डील झाली होती.

५) रिलायन्स जियो : 

जियो हा रिलायन्सचा डिजिटल ब्रँड. डिजिटल मधील एकूण २४ सेवा देते. यामध्ये जियो सिम पासून, जियो टीवी लाइव, जियो सिनेमा, जियो सावन, जियो न्यूज, जियो चॅट, जियो क्लाउड, जियो कॉल, जियो मनी अँन्ड जियो पेमेंट्स बँक, जियो ब्राउजर, जियो गेम्स, ओटीटी ऍप्स, जियो ऍड्स, जियो सिक्युरिटी, जियो नेट आणि जियो होम इंटरनेट ऑफ थिंग्स अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

६) रिलायन्स स्मार्ट :

रिलायन्स स्मार्ट ची सुरुवात ही सर्वसामान्य ग्राहकांना एकाच छताखाली सर्व काही वस्तू या संकल्पनेतून झाली. सुपरमार्केटच्या बेस वर बेकरी, डेअरी, किराणा अशा सगळ्याच वस्तू  याठिकाणी मिळतात.

७) जियो मार्ट :

दररोजच्या वापरातील वस्तू, साबण, शॅम्पू आणि अन्य घरगुती सामानाची विक्री जियो मार्ट करत. यातून जवळपास १५ हजार दुकानांना जोडले आहे.  चीनमधील अलिबाबा या कंपनीच्या कार्य पद्धतीनुसार स्थानिक दुकानदारांना ऑनलाइन टू ऑफलाइन बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम रिलायन्स जिओ मार्ट करते.

 

गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुप या कंपनीशी संबंधित आपण कोणत्या गोष्टी रोज वापरतो?

 

१) अदानी ट्रान्समिशन लिमिटेड :

ही कंपनी मुंबई आणि उपनगरांमध्ये वीज वितरणाचे काम करते. ४०० चौ. किमी मध्ये जवळपास ३० लाख ग्राहकांना या कंपनीची वीज घेतात. त्यामुळंच वीज पुरवठ्यासाठी सर्वात मोठी वितरण व्यवस्था अदानी ग्रुपकडे आहे.

२) अदानी ऍग्री लॉजिस्टिक :

अदानी ऍग्री लॉजिस्टीक हे घाऊक प्रमाणावर खाद्यान्नची साठवण आणि वितरण आणि पुरवठा व्यवस्था उभी केली आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि विविध राज्य सरकारना ते थेट खाद्यान्नचा पुरवठा करतात.

३) अदानी गॅस लिमिटेड :

देशभरामध्ये ६००० किलोमीटर पाईपद्वारे गॅस वितरण व्यवस्थेचे जाळे असलेली अदानी गॅस लिमिटेड कंपनी. १२०० औद्योगिक युनिट्स, ३ लाख ग्राहक आणि २ हजार ४०० कमर्शियल युनिट आणि ८० सीएनजी स्टेशन असा सगळा त्यांचा पसारा आहे.

४) फॉर्च्युन खाद्यतेल :

फॉर्च्युन खाद्यतेल आणि विविध खाद्य उत्पादने यांच्या माध्यमातून अदानी प्रथमच रिटेलच्या क्षेत्रात उतरले.  यात सोया, राईस ब्रॅन, शेंगतेल आणि सरकी तेल यांचा समावेश आहे. सोबतच फॉर्च्युनचा असा दावा आहे की, भारतातील मधुमेह व्याधीने त्रस्त असणाऱ्या देखील हे तेल फायदेशीर आहे.

५) अदानी फ्रुट्स : 

शुद्ध आणि ताजे फळ शेतातून पॅक करून सर्व सामान्य ग्राहकांना मिळण्याच्या उद्देशाने या ब्रँडची स्थापना झाली. रिटेल सोबतच अदानी यांनी भारतातील फलोत्पादन मार्केट मिळवण्याचा प्रयत्न केला.

अंबानी यांच्या मालकीची एकूण ७ व अदानी यांच्या मालकीच्या एकूण ५ उत्पादनांची ही वरील यादी. या यादीतील किती गोष्टी तुम्ही रोज वापरता कमेंट करुन नक्की सांगा. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.