दिल्लीच्या किसान आंदोलनाच्या नेत्यांमध्ये ‘चौधरी’ बनण्यासाठी भांडणं सुरु झाली आहेत…

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या ६ महिन्यांपासून  राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन सुरुये. हे तीनही कायदे मागे घ्यावेत अशी मागणी, या शेतकऱ्यांनी लावून धरलीये. यासंबंधात शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये  चर्चा पण झाली, पण अजूनतरी  तोडगा काय निघाला नाही. या दरम्यान आता आंदोलनातले दोन मोठे नेते राकेश टिकैत आणि गुरनाम चढ़ूनी यांच्यात वाद सुरु झालाय. हा वाद आहे “चौधरी” बनण्याचा.

इथूनच वादाला झाली सुरुवात 

चौधरीचा अर्थ होतो मुखिया. उत्तरेतल्या शेतकऱ्यांमध्ये चौधरीपदाचे प्रचंड आकर्षण आहे. चौधरीने दिलेले निर्णय सहसा मान्य केले जातात. गेले जवळपास सहा महिने पंजाब हरियाणाचे शेतकरी एकजुटीने केंद्राच्या कृषिकायद्यांचा विरोध करत आहेत. सरकारने त्यांचं आंदोलन फोडण्याचा हर तर्हेने प्रयत्न केला मात्र त्यात ते यशस्वी झाले नाहीत. मात्र आता चौधरीपदाची लढाई या शेतकरी आंदोलनाला फटका देते कि काय अशीच शक्यता निर्माण झाली आहे.

नेमक काय आहे प्रकरण?

गुरनाम सिंह चढूनी हे भारतीय किसान यूनियन हरियाणाचे अध्यक्ष आहेत. त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये त्यांचे चांगलेच वर्चस्व आहेत. काही काळापूर्वी त्यांनी संयुक्त किसान मोर्च्यापासून वेगळी भारतीय किसान मजदूर फेडरेशन बनवली. चढूनी यांनी हा निर्णय अश्या वेळी घेतला जेव्हा अनेक संघटना कृषी बिलाच्या विरुद्ध एकत्र झाले.

चढ़ूनी यांची नवी संघटना शेतकऱ्यांच्यातील फूट आहे का या प्रश्नावर बोलताना राकेश टिकैत म्हणाले,

“असं काही नाही. संयुक्त किसान मोर्चासोबत देशभरातल्या ५५० शेतकरी संघटना जोडलेल्या आहेत. त्यात चढुनी यांची देखील संघटना आहे.”

आता इथ मुद्दा असा आहे कि,  जर सगळ्या संघटनांचं म्हणण एकच आहे तर इतक्या संघटना कशाला ? तर याच उत्तर येतं आंदोलनाच्या ‘चौधरी” पदा साठी. 

कोणीही दुसऱ्या नेत्याला आपला  चौधरी मानायला तयार नाही. आधी सरकारसोबत बोलायला ज्या ४० संघटना जात होत्या त्यातल्या ३१ पंजाबमधल्या होत्या. २६ जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसेच्या आधी आंदोलनाची कमान पंजाबच्या संघटनेकडे होती, पण हरियाणाचे चौधरीपद चढ़ूनी यांच्याकडेचं होते. मात्र त्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली.

पुढे दिल्ली आंदोलनात त्यांना चॅलेंज मिळालं तर युपीच्या राकेश टिकैत यांचं. हरियाणामध्ये चढुनी यांच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यात राकेश टिकैत यांनी पंचायती घ्यायला सुरुवात केली. 

हे आंदोलन सुरूच असताना चढ़ूनी यांचा एक व्हिडीओ पण व्हायरल होत होता, ज्यात ते टीकेत यांच्यावर टीका करत होते. मात्र टीकेत यांनी त्यावर प्रतिक्रिया देण टाळल. मग  चढ़ूनी यांनीही परिस्थिती पाहता व्हिडीओ फेक असल्याचं सांगितल. त्यानंतरही त्यांच्यातले वाद अनेकदा सगळ्यांसमोर आले.  टीकेत यांनी चढ़ूनी  यांच्याच जिल्ह्यात महापंचायत घेतली, पण चढ़ूनींनी आधीच कार्यक्रम ठरल्याची कारण देत त्यात भाग घेतला नाही. तर चढ़ूनीं दिवसभर सोनीपतच्या कुंडली बार्डरवर आंदोलनावर होते.

चढ़ूनींची अडचण हीच होती कि, पहिल्यांदा आंदोलनाच्या दृष्टीकोनातून हरियाणाचे चौधरी तेच होते. त्यांनी सप्टेंबरमध्येच कृषी कायद्यांच्या संदर्भात कुरुक्षेत्रात आंदोलन केल होत. तेव्हा त्यात मोठ्या संख्येने लोकं पोहोचली होती. पण त्याचं कारण चौधरी बनणं नव्हत. 

आता ताजी घटना हिसार मधली.  हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करायला पोहोचले होते, तेव्हा आंदोलनकर्त्यांनी ते गेल्यानंतर रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळ मोठी हिंसा झाली. यात आंदोलकही जखमी झाले आणि पोलीस सुद्धा.

नंतर  प्रशासनं  आणि आंदोलन करणाऱ्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी टीकेत आणि चढ़ूनी हे दोनही मोठे नेते तिथं  होते. टिकैत आंदोलन करणाऱ्यांना संबोधित करत होते, म्ह्नणून ते अर्धा तास उशिरा आहे. हिसारमध्ये चर्चा सुरु असतानं कमिश्नरने प्रश्न विचारला कि,

“हिसारमधेच आंदोलन का, उत्तर प्रदेशात का नाही?

कमिशनर यांचा अप्रत्यक्षरीत्या रोख होता कि आंदोलन फक्त हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध होत आहे, उत्तरप्रदेशच्या योगी सरकारविरुद्ध नाही. योगायोग असा की हिस्सार मध्ये जेव्हा हि घटना घडली तेव्हा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राकेश टिकैत यांच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात काही कार्यक्रमासाठी गेले होते. यावरून चर्चा सुरु झाली की टिकैत यांचे योगिनःशी चांगले संबंध असल्यामुळे ते यूपीत आंदोलन करत नाहीत.

दोन दिवसानंतर चढ़ूनी  म्हणाले,

कमीशनर जेव्हा युपी बद्दल बोलले तेव्हा शेतकरी नेता म्हणून आम्हाला लाज वाटली. आंदोलन आता उत्तर प्रदेशातही न्यायला पाहिजे. जर तिथेले नेते राकेश टिकैत आणि नरेश टिकैत यासाठी पुढे येत नसतील तर शेतकऱ्यांनी स्वतः आंदोलनाला धार दिली पाहिजे.

यानंतर त्यांनी देशभरातल्या अनेक संघटनांचे एक फेडरेशन बनवण्याची घोषणा केली.  त्यांनी म्हटले की,  त्यांचे फेडरेशन आंदोलन करणाऱ्या  संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित असेल, पण त्याचा मार्ग वेगळा असेल. 

खरं सांगायचं झालं तर, हरियाणाच्या ज्या भागातली लोकं आंदोलनात सहभागी  झाली होती. त्यांच्यात चौधरीपदाबद्दल जबरदस्त आकांक्षा आहे. यातले दोन भाग म्हणजे एक बागड़ आणि दुसर देसवाल. दोघांची इच्छा आहे कि, चौधरी आमचा असावा. दरम्यान सध्यातरी दोनही नेते एकत्र आहेत कारण, दोघेही हरियाणाचे चौधरी नाहीत.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.