शेतकरी आंदोलन आता युपीकडे सरकतंय, राकेश टिकैतांनी योगींना चॅलेंज दिलंय..

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या वर्षभरापासुन दिल्ली-एनसीआर सीमेवर अनेक शेतकरी संघटना आंदोलन करतायेत. सरकार आणि नेत्यांमध्ये अनके चर्चसत्रे झाली, पण यावर कायमचा तोडगा अजूनही निघालेला नाही.

त्यात मध्यंतरी किसान आंदोलनाच्या नेतृत्वावरून शेतकरी संघटनांमध्यचे चांगली जुंपली होती. याचाच परिणाम म्ह्णून भारतीय किसान युनियन हरियाणाचे अध्यक्ष गुरनाम चढुनी यांच्या नेतृत्वात सुरू झालेला हा किसान मोर्चा आता संपूर्णपणे राकेश टिकैत यांच्या हातात गेलाय. टिकैत हे शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनलेत. 

राकेश टिकैत हे भारतीय किसान युनियन युपीचे अध्यक्ष आहेत. ज्यांनी या आंदोनलात सुरुवातीपासूनच महत्वाची भूमिका बजावलीय. आता संपूर्ण किसान मोर्चा हा भारतीय किसान युनियनच्या बॅनरखाली खास करून राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात सुरु आहे.

दरम्यान, आता हे किसान आंदोलन हळू-हळू राजकीय मैदानात उतरताना दिसून येत आहेत. 

तर झालं असं कि, ग्रेटर नोएडाच्या जेवरमध्ये भारतीय किसान युनियनच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी महापंचायत आयोजित केली होती.  या कार्यक्रमात समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते देखील होते.  यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही सहभाग घेत, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली, सोबतच शेतकऱ्यांच्या जमिनीची नुकसान भरपाईची मागणी लावून ठरली.

यासोबतच टिकैत यांनी स्पष्टपणे सांगितले कि,

शेतकऱ्यांचे आंदोलन पूर्वीप्रमाणेच दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर सुरू राहील. जोपर्यंत तीन केंद्रीय कृषी कायदे पूर्णपणे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे निषेध प्रदर्शन संपणार नाही.

एकूणच,  शेतकरी दिल्ली-एनसीआरच्या चार सीमा शाहजहांपूर, टिक्री, सिंघू आणि गाझीपूरपासून दूर जाणार नाहीत.  पण या दरम्यान राकेश अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सरकले.

राकेश टिकैत म्हणाले की, जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि काळा कायदा परत घेतला नाही तर जनता, शेतकरी विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगलाच धडा शिकवेल. लखनऊ आमचं आहे, शेतकऱ्यांचं आहे. ही कोणाच्या बापाची जागीर नाही.

खरं तर, उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूका आहेत. त्यात राकेश टिकैत यांच्या आधीपासूनच भाजप विरोधी अजेंडा आहे. त्यांनी अनेकदा भाजप सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात व्यक्त्तव केलीत. त्यात आता किसान आंदोलनाच्या माध्यमातून ऐन निवडणुकीच्या वेळी ते थेट सरकारला धारेवर धरतायेत.  

याआधीही टिकैतने केंद्र सरकारवर मोठा आरोप करत म्हटले होते की,

 देशात भाजप नाही तर मोदी सरकार आहे. जर भाजपाचे सरकार असते तर ते शेतकऱ्यांशी बोलले असते, परंतु हे मोदी सरकार आहे, जे कंपन्या चालवतात, जे कोणाशी बोलत नाहीत.

लखनऊला दिल्ली बनवणार

राकेश टिकैत यांनी गेल्या महिन्यात सुद्धा युती सरकारला इशारा देत म्हंटल होत की, आता लखनऊला देखील दिल्ली सारखं बनवलं जाईल. ज्याप्रमाणे दिल्लीत चारही बाजूंचे रस्ते सील करण्यात आलेत. तसंच लखनऊला सुद्धा चारही बाजूनी घेरलं जाईल. याच्या तयारीत आहोत.  

दरम्यान, टिकैत यांच्या या इशाऱ्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा गप्प बसले नाहीत, त्यांनी म्हंटलं कि, ‘जर राकेश टिकैत लखनऊला आले तर त्यांचे स्वागत केले जाईल पण जर कोणी नियमांचे पालन करत नसेल तर त्यांचे स्वागत त्यानुसारच केले जाईल.

दरम्यान, मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे राकेश टिकैत यांचा लखनऊमध्ये दिल्लीसारख्या शेतकरी आंदोलनाचा इशारा यावेळी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे. राकेश टिकैत यांनी भाजपा त्यातल्यात्यात योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात बडगा उचललाय. त्यात इतर पक्षांची साथ तर  आहेच. त्यामुळे राकेश टिकैत भारतीय जनता पक्षाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायेत का? असा प्रश्न इथं उपस्थित होतोय. 

भाजप नेत्यांच्या बहिष्काराची तयारी

टिकैत यांच्यासोबत संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले की, ते लोकांना, विशेषतः शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणार आहेत. आंदोलन मजबूत करण्याच्या दाव्यासह मिशन युपी आणि उत्तराखंड देखील सुरु होईल. आणि जोपर्यंत तीन कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.