दिल्ली आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं..?

देशात आज एका बाजूला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे दिल्लीत चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

पोलिसांनी आजच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर आंदोलनाला काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली होती, मात्र त्यानंतर आलेल्या बातम्यांनुसार हे आंदोलन हिंसक झालं आहे.

दिल्लीतील प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून दिल्लीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर आणि लाठीचा वापर केला.

हिंसक वळण कसे लागले

दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर आंदोलनासाठी तीन मार्ग ठरवले होते. शेतकरी आणि पोलीसांमधील चर्चेनुसार दिल्लीभोवतीच्या रस्त्यांवरून फेरी मारून टॅक्टर्स व शेतकरी परत जाणार असल्याचं पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.

याच तीन मार्गापैकी गाझीपूर बॉर्डर परिसरातून हिंसक आंदोलनास सुरूवात झाल्याच सांगण्यात येतं. गाझीपूर बॉर्डर या मार्गावरून आंदोलक NH-24- ISBT आनंद विहार, अप्सरा बॉर्डर, हापुड रोड, आईएमएस कॉलेज या मार्गे पुन्हा गाझीपूर बॉर्डर पोहचणार होते.

पोलीसांच्या माहितीनुसार,

त्यानुसार शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स दिल्लीभोवतीच्या रस्त्यांवर फेरी मारून परत जाणार होते. निदर्शक शेतकरी आणि त्यांचे ट्रॅक्टर्स अतिसंवेदनशील आणि अतिमहत्त्वाच्या मध्य दिल्ली परिसरात येणं अपेक्षित नव्हतं.

मात्र शेतकऱ्यांनी इथे लावलेले बॅरिकेट्स हटवत प्रवेश केल्याने पोलिसांकडून लाठीचा वापर केला असं पोलिसांचा दावा आहे.

दिल्लीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असलेल्या शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी सिमेंटचे ब्लॉक देखील तयार केले होते. पण प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार शेतकऱ्यांनी हे ब्लॉक देखील बाजूला केले. पुढे एक कंटेनर आणि बस उभी केली होती पण त्यांना पार करत शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत.

माध्यमांमधील माहितीनुसार नोएडा वळणावर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाला आहे. पांडव नगरच्या आसपास ट्रकांचे आरसे देखील फोडल्याचे बातम्या बघायला मिळत आहेत.

सध्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार,

काही आंदोलक शेतकरी लाल किल्ला परिसरात दाखल झाले, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न केला. परंतु आंदोलक दुसऱ्या मार्गाने लाल किल्ला परिसरात पोहोचले. दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण मिळताच दिल्लीतील आठ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.

आंदोलकांनी शीख धर्मीयांचा केसरिया झेंडा लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फडकावला. काही मिनिटांनंतर शेतकरी आंदोलनाचा पिवळा झेंडाही फडकावण्यात आला.

Screenshot 2021 01 26 at 3.03.57 PM

या सगळ्या दरम्यान आयटीओ परिसरात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा ट्रॅक्टरचा देखील कोलमडला. आयटीओ परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात येत होता.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मात्र माध्यमांसोबत बोलताना, 

आंदोलन शांततामय वातावरणातच सुरु राहिल. आंदोलक शांततेत माघारी परततील. पोलिसांकडे रिंग रोडची परवानगी मागितली होती. त्यांनी शेतकऱ्यांची संख्या पाहून परवानगी द्यायला हवी होती. ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आंदोलनात कोणतीही हिंसा होणार नाही अशी माहिती दिली आहे.

शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी देखील या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,

“प्रजासत्ताक दिनाचा अर्थ प्रजा आधी आणि सत्ता नंतर असा आहे. मात्र गेल्या ७२ वर्षांमध्ये सत्ता मोठी झाली आणि प्रजा सत्तेच्या भाराखाली वाकली.

शांततापूर्ण मार्गानं आंदोलन होईल, असं सांगणाऱ्या आंदोलनांना आज हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.