मसूद अजहरला सोडण्याआधी आपला राजीनामा घेण्याची अट फारुख अब्दुलांनी ठेवली होती…

आजही जगात कुठं विमान अपहरणाची गोष्ट निघाली ही कंदहार विमान अपहरणाकडे आठवण काढली जाते. प्रवाशांची सुटका करायची असेल तर भारतातील जेल मध्ये बंद असलेल्या दहशतवाद्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी अपहरण करणारे करत होते. 

विमान अपहरण करणाऱ्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य करत होते. मात्र याला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचा विरोध होता. नेमकं काय झालं ते पाहुयात.

 ती तारीख होती २४ डिसेंबर १९९९. 

याच दिवशी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला होता. काठमांडूच्या त्रिभुवन इंटरनॅशल विमानतळावरून दिल्लीसाठी एयर इंडियाचे आयसी ८१४ विमान रेडी असत. यात परदेशी नागरिकांसह १८७ प्रवासी होते. फ्लाईंग कमांडंट कॅप्टन देवीशरण होते.

सायंकाळी ४ वाजता हे विमान नेपाळहून दिल्लीसाठी निघत. ५ वाजता भारताच्या हवाई हद्दीत येताच चेहरा झालेले ५ प्रवासी एकदम उठतात. त्यातला एक जण कॉकपिटमध्ये घुसतो. तर उरलेल्या चौघांनी बॅगेतील बॉम्ब बाहेर काढत विमान आपल्या ताब्यात असल्याचे इशारा प्रवाशांना दिला. काही प्रवासी खात होते त्यांना हातातील पदार्थ फेकून देण्यासाठी सांगण्यात आला आणि हात वर करायला सांगितले होते. 

महत्वाचं म्हणजे याच विमानात ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी एस. बी. एस. तोमर होते.

 तोमर यांच्याकडे अतिशय महत्वाची कागदपत्रे होती. त्यात भारतातील एखादे विमान हायजॅक होऊ शकते अशा स्वरूपाचे ते कागदपत्रे होते. मात्र तोमर यांनी कुठलीही हुशार न करता इतर प्रवाशांना प्रमाणे हात वर करून ते बसले होते. तर विमानातील दहशतवाद्यांनी कॅप्टन देविशरण यांच्या कानशिलावर पिस्तूल लावून हे विमान लाहोरकडे नेण्याचे सूचना केल्या होत्या. यामुळे विमान अपहरणात पाकिस्तानच्या सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. 

एवढं सगळं घडलेलं असतांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना विमान अपहरणाची माहिती थोडीशी उशिरा कळाली होती.  वाजपेयी हे लखनौवरून दिल्लीला येत होते. जेव्हा त्यांचे विमान दिल्ली विमानतळावर आले तेव्हा सगळा प्रकार त्यांना सांगण्यात आला. 

तसेच तिकडे कॅप्टन देवीशरण यांनी विमान मध्ये लाहोरला जाण्याइतपत इंधन नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे हे विमान अमृतसरला काही वेळासाठी उतरविण्यात आले मात्र इथे कुठलाही कारवाई करण्यात आली नाही. तर दुसरीकडे विमानात इंधन भरले जात नव्हते. त्यामुळे दहशतवाद्यांनी निर्वाणीचा इशारा म्हणून एका प्रवाशाला मारून टाकले.  दिल्ली वरून काही आदेश आला नसल्यानेमुळे काही वेळे नंतर कॅप्टन देवीशरण एटीएसला म्हणाले की, “अब हम मरेंगे। लाहोर जा रहे है। म्हणत  या विमानाने उड्डाण  केले. 

काही वेळात हे विमान पाकिस्तनच्या हवाई हद्दीत गेले आणि लाहोर विमानतळावर उतरण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र या विमानाला लाहोर विमानतळावर उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. तसेच धावपट्टीवरील लाईट सुद्धा बंद केले गेले. मात्र वैमानिकांनी हे विमान लाहोरच्या महामार्गावरवर उतरविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर लाहोर विमानतळावर हे विमान उतरले. त्यानंतर इंधन भरल्यानंतर हे विमान दुबईला गेले इथे मुले आणि महिला अशा २७ प्रवाशांना उतरवण्यात आले.   

दुबई मधल्या सरकारने आतंकवाद्यांना तिथे जास्त वेळ न थांबण्याच्या सूचना दिल्या होता. अशा वेळी भारताच्या मदतीला कोणीच आले नाही. दुबईहुन उड्डाण करत हे विमान अफगाणिस्तान मधील कंदाहार विमानतळावर उतरले. हे विमानतळ तालिबान्यांच्या हद्दीत होते.   

एवढा सगळा गोंधळ सुरु असतांना नेमकं कशासाठी दहतवाद्यानी हे विमान अपहरण केले आहे आणि त्यांची नेमकी काय मागणी आहे हे समजत नव्हते. मात्र जेव्हा हे विमान कंदाहार विमानतळावर उतरले त्यांनी मागण्या जाहीर केल्या. 

भारताच्या ताब्यात असणारा मौलाना मसूद अजहर याच्यासह ३५ दहशतवाद्यांची सुटका आणि २० कोटी अमेरिकेत डॉलरची मागणी केली होती. तेव्हा दहशतवाद्यांशी डील करण्यासाठी अजित डोभाल, निश्चल संधू, सी. डी. साहाय आदी अधिकाऱ्याचे एक पथक पाठवण्यात आले होते. वाटाघाटी सुरु झाल्या.  शेवटी ५ दिवसांच्या अथक वाटाघाटीनंतर मौलाना मसूद अजहर अहमद ओमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद झरगर या तीन दहशतवाद्यांना भारत सरकारने सोडून द्यावे, असे ठरले. 

मौलाना मसूद अजहर १९९४ पासून अटकेत होता. 

तो होता जम्मू तुरुंगात झरगर होता श्रीनगरमध्ये आणि ओमर शेख राजधानीतील तिहार जेलमध्ये ही चक्क शरणागती होती. मसूद अजहर आणि ओमर शेख यांना सोडायचे, तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्र डॉ. फारुख अब्दुल्ला यांची संमती हवी होता. 

१९८९मध्ये केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सैद यांची कन्या रुबाया हिच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांना सोडायचे होते. त्यावेळी सुद्धा फारुख अब्दुल्ला यांनी विरोध केला होता. यावेळी सुद्धा केंद्र सरकारकडून त्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा स्पष्ट शब्दात नकार कळवला होता. मात्र केंद्र सरकार आपले नागरिक दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तयार होते.   

तेव्हा फारुख अब्दुल्ला म्हणाले होते  ‘दहशतवाद्यांना सोडणार असाल, तर आधी माझा राजीनामा घ्या.

यावेळी फारुख अब्दुल्ला यांची समजूत जम्मू-काश्मीरचे  तत्कालीन राज्यपाल गिरीशचंद्र ‘गॅरी’ सक्सेना आणि रिसर्च अँड अॅनलिसिस विंगचे (रॉ) संचालक ए. एस. दुलात यांनी काढली. यानंतर दोन दहशतवाद्यांना सोडण्यास फारुख अब्दुल्ला तयार झाले.

३१ डिसेंबर १९९९. श्रीनगरहून आलेले दोन आणि तिहार तुरुंगातला एक अशा तीन दहशतवाद्यांना घेऊन परराष्ट्र जसवंतसिंह खास विमानाने कंदाहारला गेले. जसवंतसिंह यांनी प्रवाशांची मुक्तता होण्याआधी हात व डोळे बांधलेल्या तीनही दहशतवाद्यांना चाच्यांच्या हवाली केले. कंदाहारला मुक्तता झाल्यानंतर काही तासांत हे प्रवासी मायदेशी परतले. तेव्हा त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मृत्यूच्या दाढेतून ते सुखरूप आले होते. भारताने सोडलेले तिघे आणि लष्कर-एतोयबाचे पाच चाचे असे आठ दहशतवादी पाकिस्तानात पोहोचले. 

आज तोच मसूद अजहर भारताची डोकेदुखी ठरत आहे. 

हे ही वाच भिडू 

        

     

Leave A Reply

Your email address will not be published.