आज जगाला फास्ट इंटरनेट वापरता येतंय ते फक्त या भारतीय सरदारजीमुळे

परदेशी शास्त्रज्ञांना आपण जितकं डोक्यावर घेऊन मिरवतो, त्यांचा उदो उदो करतो त्याहीपेक्षा आपल्या भारतीय लोकांनी लावलेले शोध गंभीरतेने न घेता त्यांना दुर्लक्षित करतो. पंजाबी लोकांच्या गाण्यांबद्दल आणि संता बंता जोकच्या पलीकडे पण वेगळा विषय हाताळणारी सरदारजी मंडळी आहे.

आज आपण ज्या माणसाबद्दल जाणून घेणार आहोत तो माणूस चक्क नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत होता. त्याने लावलेला शोध इतका महत्वपूर्ण आहे कि इंटरनेट क्षेत्रातली हि सगळ्यात मोठी क्रांती मानली गेली.

ऑप्टिक्स फायबरचे जनक म्हणून ओळखले जाणारे शास्रज्ञ डॉ. नरिंदर सिंग कपानी.

खरंतर या माणसामुळे आपण इंटरनेट वापरू शकतोय. ज्या वेगाने आपल्या इंटरनेट मिळतंय त्याची देणगी आपल्या डॉ.नरिंदर सिंग कपानी यांची आहे. ऑप्टिक्स फायबर असा मार्ग आहे ज्यातून मोठ्या प्रमाणात डेटा एका जागेतून दुसऱ्या जागेत ट्रान्सफर केला जाऊ शकतो.

३१ ऑक्टोबर १९२६ साली पंजाबच्या मोगामध्ये त्यांचा जन्म घेतला. दहावीत असल्यापासून त्यांच्या डोक्यात एक गोष्ट कायम घोळायची कि प्रकाश एकाच रेषेत का जातो, वर्गात एकदा शिक्षक शिकवत होते कि प्रकाश हा कधीही वाकड्या मार्गाने जात नाही. प्रकाश हा फक्त सरळ रेषेत जातो. शिक्षकांचं हे वाक्य त्याला खटकलं आणि कुतुहलास्तव त्यांनी त्या विषयात जातीने लक्ष घातले.

आग्रा विद्यापिठातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. पीएचडी करण्यासाठी ते लंडनला शिकण्यासाठी गेले. तिथेही त्यांनी ऑप्टिक्स या विषयात संशोधन सुरु केलं. तिथे त्यांनी एका पेपरच उदाहरण देत एक प्रात्यक्षिक करून दाखवलं होत कि इमेज ट्रान्समिशन अचिव्ह थ्रू फायबर्स. यावर त्यांचं बरंच कौतुक झालं.

फायबर ऑप्टिक्स हि संज्ञा हि त्यांनीच शोधून काढली. १९६० साली त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं ज्याचं नाव होतं ऑप्टिकल फायबर्स प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन. १९९९ साली जागतिक स्तरावर सेव्हन अनसंग हिरोज बाय फॉरचून मॅगझीन मध्ये ऑप्टिक्स फायबरच्या योगदानाबद्दल त्यांचं नाव त्यात समाविष्ट करण्यात आलं.

२००९ सालच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत डॉ. कपानीसुद्धा होते मात्र तेव्हा तो पुरस्कार त्यांना न मिळत एका चिनी शास्त्रज्ञाला मिळाला. यावर विज्ञान क्षेत्रात बरीच चर्चा झाली आणि डॉ. कपानी यांना पुरस्कार न मिळाल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलं गेलं. कारण ज्या शास्त्रज्ञाला हा पुरस्कार मिळाला होता त्याच्याही आधी डॉ. कपानी यांनी तो शोध लावून त्यात विविध प्रयोग केले होते.

त्यांचा हा शोध इतका म्हणत्वाचा होता कि जागतिक स्तरावर डॉ. कपानी यांची दाखल घेतली गेली. नोबेल प्राईझच्या नामांकनात ते सामील होते. जगभरातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिट्यांमध्ये तिथल्या फलकांवर डॉ. नरिंदर सिंग कपानी फादर ऑफ ऑप्टिकल फायबर म्हणून झळकत होते. त्यावर्षीचा नोबेल आता डॉ. कपानी यांचाच आहे इतकी खात्री त्यावेळी विज्ञान क्षेत्रातून वर्तवण्यात आली होती मात्र नोबेल प्राईझच्या वेळी त्यांना दुर्लक्षित करण्यात आलं आणि नोबेलने त्यांना हुलकावणी दिली. 

डॉ. नरिंदर सिंग कपानी यांचा हा शोध इतका जबरदस्त होता कि त्यामुळे जग जवळ आलं आणि माहितीची देवाणघेवाण दुप्पट वेगाने होऊ लागली. त्यांच्यामुळे जग हे जोडलं गेलेलं आहे इतका हा शोध महत्वपूर्ण होता. ऑप्टिक्स फायबर च्या एका शोधातून अनेक गोष्टी सहजतेने होऊ लागल्या, हायस्पीड ब्रॉडबँड नेटवर्क,लेझर सर्जरी, एन्डोस्कोपी अशा प्रकारचे सगळे शोध त्यांनी लावले. कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी स्वतःची कंपनी उभारली.

जागतिक पातळीवर भारताच्या महत्वाच्या शोधांना तितकं गंभीरतेने घेतलं गेलं नाही. डॉ. नरिंदर सिंग कपानी यांच्या शोधालाही तितकं महत्व दिल गेलं नाही म्हणण्यापेक्षा दुर्लक्षित केलं गेलं. आजही आपल्याला सजावटीच्या दुकानात जे ऑप्टिकल फायबर्स दिसतात त्याच श्रेय हे डॉ. कपानी यांचं आहे.  नुकतंच त्यांचं ४ डिसेंबर २०२० साली निधन झालं. त्यावेळी जगातून सगळ्या वैज्ञानिक क्षेत्रातून त्यांना मानवंदना देण्यात आली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.