जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी वायरलेसचा शोध जगदीशचंद्र बोस यांनी लावला मात्र एक चूक केली…

आज आपण रेडिओ , टीव्ही, मोबाईल आणि वायफाय या गोष्टी अगदी सहजरित्या हाताळतो. कुठल्याही तारांशिवाय आपण या गोष्टी कुठेही नेऊन त्यावर हवे ते कार्यक्रम बघू शकतो ऐकू शकतो.

या वायरलेस टेलिकम्युनिकेशनचा शोध आपल्या भारतीय शास्त्रज्ञाने लावला आहे मात्र तो आपल्या शोधाचं पेटंट रजिस्टर करून ठेवायला विसरला आणि दुसऱ्या शास्त्रज्ञाने गुपचूप तो पेटंट स्वतःच्या नावावर रजिस्टर करून नोबेल प्राईझ जिंकून गेला.

वायरलेस टेलिकम्युनिकेशनच नव्हे तर वनस्पतींना सुद्धा संवेदना असतात हा महत्वपूर्ण सिद्धांत त्यांनी मांडला.

डॉ. जगदीशचंद्र बोस. ज्यावेळी भारतात धार्मिक वातावरणाचा काळ होता, चळवळी सुरु होत्या तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन जगदीश चंद्र बोस यांनी जगाला अवाक करणारे शोध लावले. त्यांच्या शोधाची कुणी कल्पनाही केली नसेल कि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठल्याही माध्यमांशिवाय आपलं म्हणणं पोहचवू शकतो.

वायरलेस रिसिव्हर म्हणजे रेडिओ वरून बोलले जाणारे शब्द कुठल्याही माध्यमांशिवाय थेट लोकांपर्यंत पोहचवले जाऊ शकतील असा शोध त्यांनी लावला.

जगदीश चंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेम्बर १८५८ साली बंगालमध्ये झाला. बोस कलकत्ता विद्यापीठातून पदवीधर झाले आणि त्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठात नॅचरल सायन्सचे शिक्षण घेतले.

त्यांनी वायरलेस कॉम्युनिकेशनचा शोध लावला जो पुढे रिमोट, वायफाय, मोबाईल टॉवर, टेलिफोन, रेडिओ या क्षेत्रात क्रांतिकारी ठरला. १८९५ साली त्यांनी हा शोध लावला. रेडिओ लहरीतल्या मायक्रोव्हेवजवर आधारित हा शोध होता. सुरवातीला त्यांचा हा शोध २५ मिलीमीटर पर्यंत लहरी पोहचतील इतका छोटा होता त्यामुळे तो कुठेही ने-आण करायला सोपा होता. ज्यावेळी जगभरातील इतर शास्र्ज्ञ या शोधाविषयी चाचपडत होते तेव्हा जगदीश चंद्र बोस यांनी अँटेनाचा शोधही लावून टाकला होता जो रेडिओच्या व्हेव्ह्ज कॅच करू शकेल.

कोलकत्त्याच्या टाऊन हॉल मध्ये मोठमोठ्या तज्ञ् लोकांपुढे त्यांनी ७५ फुटी एका भिंतीच्या पलीकडून वायरलेस साधनांद्वारे फक्त लहरींच्या सहाय्याने एक घंटी वाजवून दाखवली. कुठलीही तयार किंवा साधन न वापरता पलीकडे घंटी वाजली यावर सगळीच लोकं अवाक झाली. त्यावर संपूर्ण सभागृह त्यांच्यासाठी टाळ्यांच्या वर्षाव करत होतं.

त्यांच्या या शोधाने त्या काळापासून वायरलेस जगाची सुरवात केली होती. त्यांचा हा शोध परदेशातही चर्चिला जाऊ लागला. लंडनच्या एका प्रतिष्ठित संस्थेने त्यांना त्यांच्या शोधाचा डेमो दाखवायला पाचारण केलं. डेमो दाखवून झाल्यावर त्यांचं प्रचंड कौतुक झालं आणि भविष्यकाळात हा शोध सगळ्याच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणील म्हणून विश्वासही दाखवला.

लंडनच्या प्रदर्शनात डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्याकडून एक चूक झाली त्यांनी त्यांचा पेटंट नावावर करून घेतलेला नव्हता. त्यांच्या वैज्ञानिक मित्रांनी त्यांना बरंच समजावलं कि हा शोध तुझा आहे त्यावर तुझं नाव असायला हवं पण जगदीश चंद्र बोस यांचं म्हणणं होत कि,

शोध हे नाव लागावं म्हणून केले जात नाही, त्याचा उपयोग समस्त मानवजातीला व्हावा म्हणून शोध लावले जातात. त्यावर माझा अधिकार असणे गैर आहे.

त्यांच्या या चुकीचा फायदा तिथे उपस्थित असलेल्या गुगलेइमो मार्कोनी या इटलीच्या शास्र्ज्ञाने घेतला आणि त्याने १८९६मध्ये गुपचूपपणे त्या पेटंटचे हक्क स्वतःच्या नावावर करून घेतले आणि पुढे वायरलेस टेलिकम्युनिकेशन मध्ये अजून सुधारणा करून त्यावर काम केलं. १९०९ मध्ये वायरलेस टेलीकॉम्युनिकेशन क्षेत्रातील मानाचा नोबेल पुरस्कार गुगलेइमो मार्कोनी याला मिळाला. या शोधाचे मूळ जनक असलेले डॉ. जगदीशचंद्र बोस याना त्याचं साधं क्रेडिटही मिळालं नाही.

पण जगदीशचंद्र बोस एवढ्यावरच न थांबता त्यांनी असा एक शोध लावला ज्याने वनस्पतीशास्रातील आजवरचे सगळे सिद्धांत खोटे ठरवले. वनस्पतींना संवेदना असतात हा दावा त्यांनी केला.

त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी पुन्हा एकदा जगभरातल्या वनस्पती आणि जीवशास्रातील  तज्ञांना बोलावून करून घेतलं.

एका लहानशा रोपट्याला त्यांनी विष असलेलं इंजेक्शन दिलं आणि सांगितलं कि हे या झाडाला संवेदना आहेत , विषाच्या प्रभावामुळे हे रोपटं थोड्या वेळात जीर्ण होऊन पडेल. मात्र बराच वेळ झाला ते रोपटं तसंच उभं होत , त्यांच्या या प्रकारावर लोकं हसू लागली त्यावेळी त्यांनी त्यांनी ते विषाचं इंजेक्शन स्वतःला टोचून घेण्याचा प्रयत्न करत असताना लोकांमधून एक व्यक्ती उठली आणि जगदीशचंद्र बोस याना थांबवत म्हणाली कि रोपट्याला जे इंजेक्शन दिलं त्यात मी विषाऐवजी पाणी भरलं होतं.

जगदीश चंद्र बोस यांनी पुन्हा आपलं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि रोपटं कोसळलं. यावर पुन्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मागच्या चुकीतून बोध घेत त्यांनी हे पेटंट स्वतःच्या नावावर करून घेतलं. वनस्पती शास्रातील त्यांनी अजून एक महत्वाचा शोध लावला तो म्हणजे आधुनिक पद्धतीने झाडांची उंची मोजण्याचं यंत्र त्यांनी तयार केलं. ज्याला आपण क्रेस्कोग्राफ म्हणून ओळखतो.

केवळ भौतिकशास्रात शोध लावून ते समाधानी न राहता त्यांनी वनस्पती शास्रात लावलेले शोध सुद्धा महत्वपूर्ण ठरले.

२०१६ साली त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे त्यांना मानवंदना दिली होती.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.