अमेरिकी FBI एका गुज्जू माणसाला २०१७ पासून शोधतायत. ७० लाखांचं इनाम देखील लावलंय..

भारतात रोज अनेक घटना घडतात,खून होतात,दरोडे पडतात,काही आनंदी तर काही धक्का देणाऱ्या गोष्टी घडत राहतात. काही लोकं बँका लुटून परदेशात पळून जातात आणि परत यायचं काय नावच घेत नाही. पण आजचा किस्सा आहे एका आशा व्यक्तीचा ज्याचा शोध मागील ४ वर्षांपासून सुरू आहे आणि या व्यक्तीवर ७० लाखांचा इनाम ठेवण्यात आलेला आहे.
फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन अर्थात एफबीआय. यांचं काम आहे जगातल्या आणि अमेरिकेतल्या गुप्त घटनांची माहिती काढणे आणि घडलेल्या घटनांचा निकाल लावणे. अमेरिकेतली आणि जगातली सगळ्यात जबरदस्त संघटना म्हणून एफबीआयचा दबदबा आहे. पण ही एफबीआय एका भारतीय माणसाच्या मागावर मागच्या ४ वर्षांपासून आहे. या खतरनाक एजन्सीने त्या व्यक्तीवर १ लाख डॉलर म्हणजे जवळपास ७० लाखांचा इनाम ठेवलेला आहे. या एजन्सीच्या रेकॉर्डनुसार त्या व्यक्तीला शेवटचं अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये पाहण्यात आलं.
पण हा व्यक्ती आहे कोण ? आणि एफबीआय का या माणसाचा शोध घेत आहे ?
ज्या व्यक्तीला एफबीआय मागच्या चार वर्षांपासून धुंडाळीत आहे त्या व्यक्तीचं नाव आहे भद्रेशकुमार चेतनभाई पटेल. गुजरातमधील विरगाम नामक जिल्ह्यातील कंट्रोदी गावचा रहिवासी. १२ एप्रिल २०१५ साली या भद्रेश कुमारने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर तो फरार झाला.
एफबीआयच्या वेबसाईटनुसार भद्रेशकुमार आणि त्याची पत्नी पलक हे अमेरीकेच्या मॅरिलॅन्डच्या डंकिन स्टोरमध्ये नाईट शिफ्टमध्ये काम करत होते. याच दरम्यान भद्रेशकुमारने पत्नीची हत्या केली आणि तो गायब झाला. एफबीआयच्या मते भद्रेशकुमारने हत्या केली आणि तो हॉटेलच्या बाहेर आला आणि चालत तो एका अपार्टमेंटमध्ये गेला तिथून त्याने काही वस्तू आणल्या आणि टॅक्सी करून तो कायमचा फरार झाला.
एफबीआयने प्रकरण सिरियसली घेतलं आणि मराठी, हिंदी,इंग्रजी वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या. यात व्यक्तीला सापडून देणाऱ्याला ७० लाखांच्या बक्षिसाचं आश्वासन देण्यात आलं. पण भद्रेश काय हाती लागला नाही.
एफबीआय थोडक्यात आहे तेही बघून घेऊ. एफबीआय ही जगातली सगळ्यात गुप्त आणि जबरदस्त एजन्सी आहे. १४ मार्च १९५० साली एफबीआयने पहिली टॉप १० पळून जाणाऱ्या लोकांची लिस्ट बनवली होती आणि यात सुरवातीला ५२३ पळून जाणाऱ्या लोकांची नावं होती या नावांपैकी ४८८ पळून गेलेल्या लोकांना पकडण्यात एफबीआय यशस्वी ठरलेली आहे. पण चार वर्षांपासून भद्रेश कुमारला पकडण्यात एफबीआयला अपयश आलेलं आहे. आणि हे भद्रेश प्रकरण अजूनही गुढचं आहे.
या हत्येनंतर भद्रेश कुमारला शोधण्यासाठी एफबीआय आणि स्थानिक पोलिसांनी जंग जंग पछाडलं आहे , भद्रेश कुमारने या सगळ्या गुप्त यंत्रणांना गुंगारा दिलेला आहे. चार वर्ष उलटून गेली तरी भद्रेश कुमारचा काहीही पत्ता नाही. एफबीआय सारखी मजबूत यंत्रणा सुद्धा हतबल झाली असून भद्रेश कुमार चकवा देत आहे.
हे हि वाच भिडू :
- सिरीयल किलरची खून करण्याची विकृत पद्धत पाहून त्याला सायनाईड मोहन नाव देण्यात आलं होतं…
- सायनाइड किलर : पोलीसांच्या मते केम्पम्माने सायनाइड वापरून २० हून अधिक खून केले
- आझाद हिंद सेनेच्या पहिल्या महिला हेराने देशप्रेमाखातर स्वतःच्याच पतीची हत्या केली होती….
- कोडॅक कॅमेरा बनवून जगाला फोटोग्राफी शिकवणाऱ्या ईस्टमनने शेवटी आत्महत्या केलेली