कसं बबन म्हणीन तसं…

कसं बबन म्हणीन तसं थेटरातल्या बबन्याच्या डायलॉगवर पब्लिक शिट्टया वाजवत मोक्कार सुटलीय. हम खडे तो सरकारसे भी बडे वाला अॅटीट्यूड होकार येईस्तोवर नकार पचवत, मागे फिरून पोरगी पटवणं गावात अजूनही शक्य असल्याचं बबनच्या निमित्ताने दिसून आलं. यानिमित्ताने का होईना खेड्यांच झपाट्यानं शहरीकरण होत असताना पोरा पोरींमधील जैविक ताणावरील परिणाम आपण लक्षात घ्यायला हवा.

गावातल्या राजकारणाला कंटाळून बबन एकांतात कोमलशी MPSC करायला पुण्यात जायची गोष्ट करतो तेव्हा थेट्रात पब्लीकची REACTION काय अवदसा सुचली याला अशी होती. MPSC करणारा प्रत्येक पोरगा बबन बघायला जाताना मनात आपापली KOMAL घेऊन जातो. बबन मध्ये स्वतःला पाहतो. त्यामुळे टाकला बबननी डायलॉग कि मार शिट्टया, खऱ्या आयुष्यात हा पोरींना गुड मॉर्निंग, गुड नाईट, जेवण झाले का असले मेसेज टाकणारा असला तरी बबनला कोमल पटली की ह्याचा उर सुख आणि अभिमानाने भरून येतो. अशा हजारो, मनात आपलं गाव नि कोमल ठेवून असलेल्या बुजगावण्यांना ना शहराचे होऊ शकणाऱ्या, ना गावचे राहिलेल्या एमपीएससी ग्रस्त तरुणांचा नायक म्हणून बबन पडद्यावर उभा राहतो. तेव्हा हा ऊरूस अशा लाखो तरुणांचा असून बुडत्याला काडीचा आधार सारखं पुन्हा नव्याने मनात कोमल भावना निर्माण करतो. 

बबनच्या निमित्ताने थिएटरातल्या दोन अडीच तासात का होईना गावातून शहरात स्थलांतरीत झालेल्या निमशहरी पोरांना नाॅस्टेल्जिया अनुभवता येतोय हे बबन सिनेमाचं यश म्हणायला हवं. आज बबन तिकीटबारीवर धुमाकूळ घालण्यामागे नाॅस्टेल्जियात गेलेल्या निमशहरी काऱ्या पोरांचा मोलाचा वाटा आहे. पण बबनच जमलं म्हणून आपलबीं जमल हा भोळा आशावाद शहरातल्या मुरलेल्या पोरींसमोर गैरलागू ठरतो. चार वर्ष पुण्या मुंबईत राहून खातं न उघडू शकलेल्या काऱ्यांना हे गणित कळलं की गावातल्या नाॅस्टेल्जियात रमून गावातली पोरंबाळं झालेली पहिली लाईन आठवून ओल्ड मॉंक प्यायला बसणं एवढंच या शहरात सोईस्कर आहे हे लक्षात येतं.

Screen Shot 2018 03 30 at 12.14.50 AM
film-Baban

आपल्यासोबतच्या तुंबलेल्या चार मित्रांना घेऊन आज संध्याकाळी प्यायला बसला आणि चौघं एकाच मुलीच्या आठवणीत तिला कॉल करू लागले तर ती तिच्या BEST FRIEND शी बोलण्यात व्यस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी कृपया त्रागा करून घेऊन आपसात भांडत बसू नका कारण प्रश्न रिसोर्स मॅनेजमेंटचा आहे. चौघही प्रयत्न करा (बेस्ट फ्रेंड पण करतच असतो, पण तो पुण्यातला असतो). जिला जी जेव्हा जशी भेटन तशी ती  तेव्हा त्याची म्हणत कारेपणा मिटवा. कारण हीच आजच्या काळाची गरज आहे. या अर्थी बबनने नाॅस्टेल्जियाचा अश्व लावून निमशहरी काऱ्या पोरांच्या तुंबनाला गोंजारत कसं बबन म्हणीन तसं म्हणत सामूहिक नैराश्याचा जागर घडवून आणलेला आहे.

शहरात विरूध्दलिंगी आस भागवण्याचे प्रयोजन हे गावपातळीच्या लाईन दे नाय राखी बांध या सनातन तत्वाशी फारकत घेऊन WE ARE JUST FRIENDS या समांतर लैंगिक उच्छादावर टिकून असते. त्यामुळे जाईन तिथं मागं येईन म्हणत पोरगी पटवणं हे निखळ अल्लड NARRATIVE बबनने स्क्रीनवर जरी पटवून दाखवलेलं असलं तरी वास्तवाच्या शहरात गोष्टी कलाकलानं घेणं संयुक्तिक ठरत असतं. आपल्याच गावातंन पुण्यात आलेली पोरगी माल दिसायला लागून NO NO, HE WAS MY Ex, WE ARE JUST FRINEND म्हणत आपल्याला तिच्या नव्या बॉयफ्रेंडची ओळख करून देते राहते. बहुतेक यालाच शहरांचा मेकओव्हर म्हणतात. आपल्या आजूबाजूला हे सर्व घडत असताना बबनने दोन तास का होईना आपल्याला जमिनीवर आदळल्याचं लक्षात येत पण तोपर्यंत आपण चार-पाच प्रपोज मारून शहरी फ्रेन्डझोनची पद्धतशीर काशी केलेली असते.

ऐसे तैसै कैसे करून जरी का तुम्ही पुण्यात पोरगी पटवलीच तरी ती आपलीच आहे टिकून राहील हा टाकावू भ्रम घात करतोच. कारण शहरात मुलींना मुक्त लैंगिक वाव मिळवून देणारी एक जागा तयार झालेली असते तिला म्हणतात स्पेस. या स्पेस मध्ये तुम्ही कष्टाने पटवलेल्या लाईनीला असतात खूप सारे पुरुष मित्र. त्यातलाच एक तिला दिसायला फारच वगैरे आवडत असतो त्याला म्हणतात क्रश. त्यातला पुन्हा एक असतो ज्याच्यासोबत तिची भावनिक गुंतवणूक वगैरे असते तो असता तिचा बेस्ट फ्रेंड. तुम्ही केलेल्या मेसेजचा लवकर रिप्लाय नाही येण्यामागचा कारण ही बहुदा तोच असतो. ती क्रश सोबत लाडीवाळपणे बोलू लागली तरी आपण त्रागा करायचा नाही त्याला म्हणतात फ्लर्टिंग. आपल्याला सोडून बेस्ट फ्रेंड ला भेटायला गेली तरी  NO ISSUUE म्हणत मान हालवत बसायचं.

Screen Shot 2018 03 30 at 12.16.58 AM
Film – Baban

WE ARE JUST FRIENDS  म्हणत समांतरपणे चालत आलेल्या लैंगिक उच्छाद हा खास शहरी निसर्गदत्त जैविक ताणाचा गुण आहे . हा जसा आपल्याच गावातून पुण्यात आलेल्या पोरीने उचलला तसाच आपणही अंगीकारणे क्रमप्राप्त आहे. कारण इथे प्रश्न रिसोर्स मॅनेजमेंटचा आहे. स्थलांतरितांचे कारे जथ्थेच्या जथ्थे रोज नव्यानं शहरात दाखल होत असताना आपल्याला आवडणाऱ्या पोरींची संख्या मात्र आहे तेवढीच आहे. त्यामुळे पटली की टिकली हे भोळ्या बबनच तत्व गावाकडेच ठेवून (आजकाल गावातही तसं काही राहिलेलं नाही हा भाग अलाहिदा ) मिळन तिथ लैंगिक उत्पाद म्हणत शहरी लैंगिक सम्मोचयाचा कावेबाजपणा अंगीकारलात तरच कारेपणातून सुटका होण्याची थोडीफार आशा आहे.

पोरगी पटवायचं बबनचा सिनेमॅटिक स्पिरीट घेऊन तुम्ही थेट्राबाहेर पडला तरी पुन्हा पुण्यातच असल्यामुळे मुरांबा गुलाबजामच्या गोडीत तुम्ही पुन्हा तोंडावर आपटण्याची जबरदस्त शक्यता आहे. हीथून आलेल्या रितेपणा वर नॉस्टॅल्जिक झुळूक म्हणून बबन आपलं काम चोख करतो. दिवसागणिक पोरांची पिक्चरला वाढणारी गर्दी ती झुळूक मिळवण्यासाठीच आहे. बाकी राहिलेल्या काळात अभ्यास करून लवकर पोष्ट काढा. गावात कोमल वाट पाहतेय. हीथं काय आपला मेळ लागत नसतोय. बाकी लै ताण आला आसन तर तीन तास बनसोबत जाऊन या. बरं वाटन. कसं बबन म्हणीन तसं.

3 Comments
  1. योगेश says

    वास्तव लिहलय रे…भारी

  2. dnyaneshwar says

    मस्त

  3. sagar badhe says

    Super

Leave A Reply

Your email address will not be published.