आर्थिक वर्षाचा शेवट मार्च महिन्यातच का करायचा असतो, कोणत शास्त्र असत ते ?

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतकी विविधता की या विविधतेत माणूस कन्फ्यूज होवून चक्कर येवून पडू शकतो. म्हणजे कस गुडीपाडवा आली की नववर्ष. दिवाळीला देखील लोकं नववर्षांच्या शुभेच्छा देतात. जानेवारी आला की जगासोबत नववर्ष. बाकी अध्येमध्ये देखील एखादा माणूस आजपासून नववर्ष चालू होतं सांगून जातच असतो.

अशातलच एक नववर्ष म्हणजे १ एप्रिल. ३१ डिसेंबरपेक्षा जास्त टेन्शन असणारा महिना म्हणजे मार्च एन्डिंग. मार्च एन्डिंगच नाव सांगून भलेभले लोकं उधारा गोळा करायच्या कामाधंद्याला लागतात. 

पण नेहमी एक प्रश्न पडतो. निदान शासनाने तरी हि मार्च एन्डिंगची गोष्ट जानेवारीला घेवून जाण्यात काय हरकत आहे. मुळात हे आर्थिक वर्ष नावाने अधलामधला मार्च महिना कुणी ठरवला असेल. एप्रिलपासून नव्याने चालू करण्याचे किडे कुणाचे असतील.

या भानगडीचा शोध घेतल्यानंतर उत्तर मिळतं ते, इंग्रजांच्या राजवटीत. 

देशात बऱ्यापैकी जे काही जुनं आहे त्याला इंग्रज जबाबदार असतात. आणि इंग्रज नसतील तर मग त्या गोष्टीला नेहरूंना जबाबदार ठरवलं जातो, असो विदाऊट पॉलिटिक्स नेमका प्रकार काय आहे ते विस्कटून सांगतो.

तर मॅटर असा आहे की, भारतावर ब्रिटीशांची हुकूमत होती. त्यांनी काय केलं तर देशभरात एक आर्थिक सिस्टीम लागू केली. कारण इंग्रज प्रामाणिक होते. पैशांची लुटालूट करत असताना देखील ते हिशोब ठेवायचे. या हिशोबांसाठी त्यांना एका आर्थिक वर्षांची गरज असायची. म्हणजे वर्षाचा हिशोब वर्षाला क्लियर करणे. यासाठी त्यांनी आसरा घेतला तो ऑलरेडी इंग्लंडमध्ये चालू असणाऱ्या आर्थिक वर्षाचा. 

इंग्लंड मध्ये आर्थिक वर्षाची सुरवात एक एप्रिलपासूनच व्हायची. त्याच कारण सांगितलच जातं ते ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगरीय कॅलेंडर मधला घोळ. सुरवातीला इंग्लंडमध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरलं जातं असे. यात चार वर्षातून एक येणाऱ्या लीप वर्षाचा अर्थात 29 फेब्रुवारीचा समावेश नव्हता. त्यानंतर एका धर्मपरिषदेत हा मुद्दा उपस्थित झाला आणि ग्रेगरीय कॅलेंडरची सुरवात करण्यात आली. अस कळतं की तेव्हा लोकांना लक्षात आलं की आपण दहा दिवस मागे पडलोय. मग नव्या कॅलेंडरमध्ये ते दहा दिवस भरून काढण्यात आले.

असो, मुद्याच सांगायचं म्हणजे या तारखांच्या घोळात वर्षाचा पहिला दिवस पुर्वी २५ मार्च असायचा तो ५ एप्रिल झाला. त्यानंतर एप्रिल हाच आर्थिक हिशोब ठेवण्याचा कालावधी पकडला जावू लागला. 

नंतरच्या काळात जानेवारीपासून आर्थिक वर्षाला सुरवात करण्यात यावी अशी सुचना देखील मांडण्यात आली, पण लोक म्हणाले आमचं ख्रिसमस असतय. 31 डिसेंबरची बसायची तयारी असते. त्या काळात हिशोबाच काम जमणार नाही. लोकांच्या विरोधामुळे मार्च एन्ड तर मार्च एन्ड हा विचार करुन एप्रिल सुरवात तर एंन्डिंग मार्चला असा सरळ हिशोब लावण्यात आला.

पुढे काय, ब्रिटीश भारतात आले आणि इथला हिशोब मांडताना देखील त्यांनी एप्रिलपासून मांडण्यास सुरवात केली. बर इथे कायदे लागू करताना ब्रिटीश डोकं वापरत असतं. इथल्या मातीत कायदा आणताना त्यांनी कारण सांगितलं ते भारतीय शेती व्यवसायाचं. खरीप हंगाम ऑक्टोंबरला संपतो आणि रब्बी एप्रिलपर्यन्त. दोन्हीचा हिशोब मांडून देणंघेणं बंद करुन पुन्हा पावसाची वाट बघत लावणी करता येईल असं कारण सांगण्यात आलं. लोकांना ते पटलं आणि आपल्यासाठी ब्रिटीश किती छान वागतात या धर्तीवर हा व्यवहार चालू राहिला. पुढे तो तसाच चालू राहिला तो आजतागायत चालूच आहे.

हे ही वाचा भिडू.   

Leave A Reply

Your email address will not be published.