श्रीवर्धन किनारपट्टीवर शस्त्रांची बोट सापडणं धोक्याचं आहे कारण तिथला स्मगलिंगचा इतिहास…
रायगडमधील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे . या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्या. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
यामुळे १९९३ च्या मुंबई सिरीयल बॉम्बस्फोटाच्या आठवणी देखील जाग्या झाल्या आहेत.
यामुळंच राज्यात मुंबई, पुणे यास शहरांबरोबरच कोकण किनारपट्टीवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर या घटनेला १९९३च्या बॉम्बस्फोटात समुद्र मार्गानेच मुंबईमध्ये तस्करी करण्यात आली होती आणि मुंबईला जवळपास संपवण्याचाच प्लॅन झाला होता. तर बघूया हा पूर्ण प्लॅन नक्की कसा झाला होता.
12 मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोटने मुंबई हादरली.
यामध्ये 250 हून अधिक लोक ठार झाले आणि सुमारे 700 जण जखमी झाले. हा भारतीय भूमीवरील तोपर्यंतचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला होता. त्याचबरोबर हा पहिलाच दहशतवादी हल्ला होता ज्यात RDX चा स्फोटक म्हणून वापर करण्यात आला होता.
या साखळी बॉम्बस्पोटमध्ये पहिला बॉम्ब बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या (बीएसई) तळघरात दुपारी दीडच्या सुमारास झाला. पुढच्या काही तासांत माहीम कॉजवे येथील फिशरमन कॉलनी, एअर इंडिया बिल्डिंग, झवेरी बाजार, हॉटेल जुहू सेंटॉर, प्लाझा सिनेमा, हॉटेल सी रॉक, सेंच्युरी बाजार, कथा बाजार, वरळी आणि पासपोर्ट कार्यालयातील बॉम्बस्फोट झाले.
बॉम्बस्फोटाच्या मागे कोण होतं याबद्दल शंका कुशंका व्यक्त केल्या जात असताना मुंबई पोलिसांनी अवघ्या ४८ तासात या प्रकरणाचा छडा लावला होता.
तत्कालीन पोलिस उपायुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिस दलाची 150 हून अधिक सदस्यांची टीम तयार करण्यात आली होती. स्फोटांच्या दिवशी पोलिसांना माहीममध्ये RDX असलेली एक स्कूटर आणि ग्रेनेड आणि शस्त्रांनी भरलेली मारुती व्हॅन सापडली. माहीम येथे राहणाऱ्या रुबिना मेमनच्या नावावर व्हॅनची नोंदणी करण्यात आली होती. तिच्या पत्त्यावर पोहोचल्यावर पोलिसांना त्या पत्त्यावरच घर बंद असल्याचं आढळलं. तिथलं कुटुंब बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस आधी ते भारत सोडून गेलं होतं.
घराच्या आत गेल्यानंतर मारिया यांच्या टीमला स्फोट न झालेल्या स्कूटरशी जुळणारी एक चावी सापडली आणि यामुळंच बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपीची ओळख पटली. त्यांचं अब्दुल रझाक मेमन आणि त्याची पाच मुले, टायगर, याकुब, सुलेमान, एसा, युसूफ आणि अयुब. यातील मास्टरमाइंड टायगर मेमन हा सगळ्यात मोठा मुलगा दाऊदसाठी तस्कर आणि गुंड म्हणून काम करत होता.
त्यानंतर जवळपास दोन महिने पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले आणि या छाप्यांमध्ये सापडलेली शस्त्रास्त्र पोलिसांना चक्रावून टाकणारी होती.
दीड महिना चाललेल्या तपासात मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वेगवेगळे प्रकरणात एकूण 2313 किलो आरडीएक्स, 1132 किलो जिलेटिन, 63 एके-56 रायफल, 496 हँड ग्रेनेड, एके-56 च्या 39000 जिवंत राउंड्स जप्त करण्यात आले.
मग शोध सुरु झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रात्रे कुठून आली आणि आणि समोर आलं शेखाडी हे गाव. शेखाडी हे श्रीवर्धन किनाऱ्यावरील बाकीच्या मासेमारी करणाऱ्या गावांसारखंच एक गाव होतं. पण ते अजून एका कारणासाठी फेमस होतं ते म्हणजे स्मगलिंग. श्रीवर्धन किनार्यावर तस्करी नवीन नव्हती. सोन्या चांदीच्या स्मगलिंगच्या खेपा रेग्युलर्ली शेखाडी किनाऱ्यावर उतरत होत्या. मात्र आता तिथून स्फोटकं आयात झाली होती.
मुंबईच्या पाण्यात सीमाशुल्क आणि तटरक्षक दलाच्या असेलली गस्त पाहता टायगर मेमनने सुरक्षादलांची जास्त नजर नसलेल्या श्रीवर्धन किनाऱ्याची निवड केली होती.
त्यातच श्रीवर्धनच्या 50-60 किमीच्या किनारपट्टीवर केवळ एक सीमाशुल्क अधीक्षक, तीन निरीक्षक आणि काही कर्मचारी एवढीच व्यवस्था होती. बोट उतरवण्यासाठी सोयीची जेटी, शांत पाणी आणि जास्त चौकशी नं करणारे गावकरी हे अतिरिक्त फायदे होते. याच कारणासाठी टायगर मेमन आधीपासूनच या मार्गाचा अवलंब करत होता. त्यामुळॆ श्रीवर्धनच्या किनाऱ्याच्या या खुबीचा त्याला नेमकी आयडिया होती.
त्यामुळंच दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि मोहम्मद डोसा यांनी त्यांच्या तस्करीचे नेटवर्क या नयनरम्य कोकण किनारपट्टीवर पसरवलं होतं.
यामध्ये तिथल्या काही लोकल तस्करांचाही यामध्ये हात होता. त्यांना लँडिंग एजेंट म्हटलं जायचं. लँडिंग एजेंटचं काम असायचं त्यांच्या मासेमारीच्या बोटीमध्ये मोठ्या जहाजांमधून किंवा दुसऱ्या देशाच्या बोटींमधून स्मगलिंगचा माल उतरवायचा आणि तो किनारपट्टीवर आणायचा.
यामुळंच शेखाडी, मेहंदडी, बागमांडला आणि म्हसळा या परिसरातील स्थानिक इतर गावांपेक्षा संपन्न होते असं बोललं जायचं. टायगर मेमन, मुस्तफा डोसा या तस्करांसाठी काम करून आलेल्या पैशात अनेक स्थानिक खुश होते अशा चर्चा असायचा.
मात्र १९९३ च्या बॉम्बस्फोटाशी संबंध आल्यानंतर मात्र याला हे नेटवर्क बऱ्यापैकी एक्सपोज झालं होतं आणि स्मगलिंगच्या घटनाही रोडवल्या.
हे ही वाच भिडू :
- स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांपर्यंत अलिबाग शहरामध्ये वीजच नव्हती. त्यालाही एक कारण होतं..
- पाटलांनी शाहरुखला खडसावलं, माझ्या परवानगीशिवाय अलिबागमध्ये पाय टाकू शकत नाहीस
- भिडू आजपासून अलिबाग से आया है क्या म्हणायचं नाही !!