फिरोज आणि इंदिरा यांची भांडणे वाढली होती पण फक्त एका कारणामुळे त्यांचा घटस्फोट टळला

फिरोज गांधी हे काँग्रेसचे दिग्गज प्रतिनिधी होते. राजकीय चर्चांमध्ये ज्या ज्या वेळी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला जातो तेव्हा फिरोज गांधींचं नाव आपसूक येतं म्हणजे येतंच. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या लव्हस्टोरी पासून चर्चा सुरु होते आणि पुढे झालेलं प्रकरण उलगडत जातं, पण एकवेळ एकदम सुरेख चालणारी हि जोडी एकदम घटस्फोटापर्यंत आली होती पण तो घटस्फोट झाला नाही त्यामागचं काय कारण होतं  ते जरा डिटेलमध्ये बघू.

जवाहरलाल नेहरू आणि फिरोज गांधी हे काँग्रेसमध्ये कार्यरत असल्यापासून एकमेकांना चांगले ओळखायचे. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी हे लहानपणापासूनचे मित्र होते. पण लंडनमध्ये शिकत असताना त्यांची जवळीक वाढली. याच काळात फिरोज गांधींनी इंदिराजींना प्रपोज केला पण त्यांनी फिरोज गांधींचा हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. 

इंदिरा गांधींच्या आईचं निधन झालं आणि त्या फारच कष्टी झाल्या होत्या तेव्हा फिरोज गांधी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. यानंतर दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढली, शेवटी इंदिरा गांधींनी नेहरुंजवळ हे प्रकरण सांगितलं पण नेहरूंनी याला नकार दिला. नेहरूंना फिरोज गांधीशी इंदिराजींनी लग्न करणं पचत नव्हतं, त्यांनी इंदिराजींना डॉक्टर, गोळ्या यांचा हवाला दिला पण शेवटी हट्टाला पेटलेल्या इंदिराजींचा विवाह फिरोज गांधींशी झाला.

लग्न झाल्यावर काही काळ गेला. पण कालांतराने दोघांमध्ये वाद होऊ लागले. दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ लागला. हे प्रकरण जास्तच तापलं तेव्हा इंदिरा गांधी अलाहबादमध्ये आपल्या वडिलांच्या पक्षाचं काम करायला आलेल्या फिरोज गांधींचं घर सोडून अलाहाबादला आपल्या माहेरी आल्या. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्यात हे प्रकरण जास्तच गरम झालं होतं. 

या नात्यात वितुष्ट येण्याचं कारण सांगितलं जात होतं कि फिरोज गांधी यांचं बायको असतानादेखील बाहेर अफेअर चालू आहे, रोज नवीन नवीन बातम्या या सदरात खपल्या जात होत्या आणि यामुळे इंदिरा गांधी वैतागल्या होत्या.

विशेषतः एका मुस्लिम मंत्र्याच्या मुलीशी त्यांचं अफेअर आहे आणि ते दोघे लग्न करणार आहेत अशी चर्चा सुरु झाली होती.

यावरून इंदिरा गांधीनी ज्या ज्या वेळी त्यांना जाब विचारला तेव्हा फिरोज गांधी आपली बाजू मांडत असत आणि पुन्हा या दोघांमध्ये भांडण सुरु होत असे. शेवटी या प्रकरणाचा निकाल लावायचं ठरलं. रोजचे एकमेकांवर होणारे वाद विवाद, आरोप प्रत्यारोप यातून शेवटी दोघांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं.

या दाम्पत्याला दोन मुलं होते राजीव गांधी आणि संजय गांधी. घटस्फोट घेण्याचं ठरलं तेव्हा फिरोज गांधींनी इंदिराजींना सांगितलं कि दोन मुलांमधला थोरला मुलगा मी सांभाळील आणि धाकटा तू सांभाळ.

हि मागणी तेव्हा कुणालाही पटत नव्हती. शेवटी नेहरूंनी हस्तक्षेप केला आणि फिरोज गांधींना समजावून हे प्रकरण थांबवलं. पण हे प्रकरण थांबलं तरी कुरबुरी सुरूच होत्या.

८ सप्टेंबर १९६० रोजी फिरोज गांधीच निधन झालं. पण इंदिरा गांधींना विचारलं कि कुणाच्या जाण्याने तुम्हाला जास्त धक्का बसला, बऱ्याच जणांची अपेक्षा होती कि साहजिकच नेहरूंचं नाव असेल पण इंदिरा गांधींनी सांगितलं कि फिरोज गांधीच्या जाण्याने मला जास्त धक्का बसला. आणि हे उत्तर सगळ्यांनाच अवाक करणारं होतं. 

इंदिराजी म्हणतात आमच्यात भलेही किती वाद होते पण मला तो आवडायचा बंद झाला होता पण फिरोजवर माझं खरं प्रेम होतं हे नक्की.

हे हि वाच भिडू :

1 Comment
  1. योगेश गांधी says

    त्यांचे खरे नाव फिरोज दारूवाला होते. हे ही एक कारण ज्यामुळे नेहरूंनी त्याला नकार दिला. शेवटी महात्माजीनी आपले आडनाव त्यांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.